(Source: ECI/ABP News/ABP Majha)
भारत-चीन सीमेवरील घटनेनंतरही राजकीय सभा, टीकेनंतर भाजपच्या व्हर्चुअल रॅली दोन दिवस स्थगित
भारत-चीन सीमेवर झालेल्या हिंसक झटापटीत 20 जवान शहीद झाल्यानंतरही भाजपचे राजकीय कार्यक्रम सुरुच होते. यावरुन टीका झाल्यानंतर भाजपने अखेर 48 तासांनंतर व्हर्चुअल रॅलीसह राजकीय कार्यक्रम दोन दिवस स्थगित केले आहेत.
नवी दिल्ली : भारत-चीन सीमेवर 20 जवान शहीद झाल्यानंतरही राजकीय सभा का सुरु आहेत असे प्रश्न उपस्थित होऊ लागल्यानंतर भाजपने अखेर पुढचे दोन दिवस आपले सर्व राजकीय कार्यक्रम स्थगित केले आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी आज (18 जून) यासंदर्भातली घोषणा केली. व्हर्चुअल रॅलीजसह भाजप आपले सर्व राजकीय कार्यक्रम दोन दिवसांसाठी पुढे ढकलत असल्याचं नड्डा यांनी स्पष्ट केलं.
मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मची नुकतीच वर्षपूर्ती झाली. त्यानिमित्त भाजपचे नेते वेगवेगळ्या राज्यांमध्ये व्हर्चुअल रॅलीज संबोधित करत आहेत. भारत-चीन सीमेवरची घटना 15-16 जूनच्या मध्यरात्री घडली. त्याच दिवशी संध्याकाळी जे पी नड्डा यांनी एका रॅलीला संबोधित केलं. शिवाय काल (17 जून) रात्री दहा वाजेपर्यंत ते उद्या (19 जून) होणाऱ्या आसामच्या रॅलीजच्या प्रसारातही व्यस्त होते. मात्र अखेर आज सकाळी या रॅलीज स्थगित करण्याचा निर्णय जाहीर झाला.
गालवान घाटी में मातृभूमि की रक्षा करते हुए अपना सर्वोच्च बलिदान देने वाले अमर शहीदों को हमेशा याद किया जाएगा। राष्ट्र उनका ऋणी है। मैं शहीदों श्रद्धांजलि अर्पित करता हूं। भाजपा ने अपने सभी राजनैतिक कार्यक्रमों, वर्चूअल सभाओं आदि को अगले दो दिनो तक स्थगित करने का निर्णय लिया है।
— Jagat Prakash Nadda (@JPNadda) June 18, 2020
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी काल सरकारला पाच प्रश्न विचारत हल्लाबोल केला होता. त्यात 20 जवानांच्या बलिदानानंतरही राजकीय सभा का सुरु आहेत, असाही प्रश्न होता. मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आत्तापर्यंत भाजपच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी व्हर्चुअल रॅलीज संबोधित केल्या आहेत. अमित शाह यांनी पश्चिम बंगाल, बिहार, ओदिशा इथल्या रॅलीजला संबोधित केलं. तर राजनाथ सिंह यांनी महाराष्ट्र रॅलीला संबोधित केलं होतं.
If it was so painful: 1. Why insult Indian Army by not naming China in your tweet? 2. Why take 2 days to condole? 3. Why address rallies as soldiers were being martyred? 4. Why hide and get the Army blamed by the crony media? 5. Why make paid-media blame Army instead of GOI? https://t.co/mpLpMRxwS7
— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 17, 2020