BJP Candidate list 2024 : मोदी सरकारकडून पहिल्या यादीत 34 मंत्र्यांना उमेदवारी जाहीर, पण नितीन गडकरींचे नाव घोषित नाही!
BJP Candidate list 2024 : भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे (Vinod Tawde) यांनी आज (दि.2) लोकसभेसाठी 195 उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीत एकूण 34 मंत्र्यांना उमेदवारी घोषित करण्यात आली.
BJP Candidate list 2024 : भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे (Vinod Tawde) यांनी आज (दि.2) लोकसभेसाठी 195 उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीत एकूण 34 मंत्र्यांना उमेदवारी घोषित करण्यात आली. मात्र, पहिल्या यादीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत.
पहिल्या यादीतून 28 महिलांना उमेदवारी जाहीर
भाजपने आज जाहीर केलेल्या यादीत एकूण 28 महिलांना उमेदवारी दिली आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या पुन्हा एकदा अमेठी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवताना दिसणार आहेत. तर भाजपने हेमा मालिनी यांनाही उमेदवारी घोषित केली आहे. हेमा मालिनी या मथुरा लोकसभा मतदारसंघातून निडवणूक लढवणार आहेत.
नरेंद्र मोदी पुन्हा एकदा वारणसी मतदारसंघातून मैदानात
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा वाराणसी लोकसभा मतदारसंघातून निवडणूकीच्या मैदानात उतरणार आहेत. तर अमित शाह यांना गांधीनगरमधून उमेदवारी घोषित करण्यात आली. दरम्यान, असे असले तरी नितीन गडकरी यांना पहिल्या यादीत स्थान दिले नसल्याने चर्चांना उधाण आले आहे. त्यांना दुसऱ्या यादीत उमेदवारी घोषित करण्यात येणार का? किंवा भाजपचे यामागे काही धक्कातंत्र आहे? यावर राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.
भाजपने 195 जागांवर उमेदवार घोषित केले
भाजप नेते विनोद तावडे यांनी आज 195 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत दोन माजी मुख्यमंत्र्याची नावे देखील आहेत. 47 जागांवर युवा उमेदवार देण्यात आलेत. तर 28 जागांवर अनुसुचित जातींतील उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. शिवाय 57 जागांवर ओबीसींना उमेदवारी देण्यात आली आहे. स्मृती इराणी पुन्हा एकदा अमेठीतून निवडणूक लढणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीतून तर अमित शाह गांधीनगर मधून निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत.
विनोद तावडे जाहीर करत आहेत उमेदवारांची नावं
भाजप नेते विनोद तावडे (Vinod Tawde) यांना महाराष्ट्रात विधानसभेचं तिकिट नाकारण्यात आले होते. दरम्यान, तेच तावडे आज मोदींसह भाजपच्या उमेदवारांची नावे जाहीर करत आहे. निष्ठावान नेत्यांना संधी दिली जात नाही, या आरोपांना भाजपने यामाध्यमातून उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या