नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याचे 'बिम्सटेक' देशांना निमंत्रण, 30 मे रोजी शपथविधी सोहळा
लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना फोन करुन नरेंद्र मोदींच अभिनंदन केलं. तर उत्तर कोरियाचे शासक किम जोंग यांनीही नरेंद्र मोदी यांच अभिनंदन केलं आहे.
![नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याचे 'बिम्सटेक' देशांना निमंत्रण, 30 मे रोजी शपथविधी सोहळा bimstec leaders invited for narendra modis oath ceremony as pm on 30 may latest update नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याचे 'बिम्सटेक' देशांना निमंत्रण, 30 मे रोजी शपथविधी सोहळा](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/05/27204555/Narendra-Modi.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 मे रोजी पंतप्रधानपदाची आणि गोपनियतेची शपथ घेणार आहेत. मोदींच्या शपथ ग्रहण सोहळ्यासाठी BIMSTEC देशांच्या राष्ट्राध्यक्षांना निमंत्रण देण्यात आलं आहे. BIMSTEC मध्ये भारतासह नेपाळ, भूतान, श्रीलंका, बांग्लादेश, म्यानमार आणि थायलंड देशांचा समावेश आहे.
नरेंद्र मोदी 30 मे रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. संध्याकाळी 7 वाजता राष्ट्रपती भवनात मोदींचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. यावेळी मंत्र्यांचा शपथविधी देखील पार पडणार आहे.लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना फोन करुन नरेंद्र मोदींच अभिनंदन केलं. भारत-पाकिस्तानच्या प्रगतीसाठी एकत्र काम करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. हिंसाचार आणि दहशतवाद यापासून मुक्त असलेले वातावरण निर्माण करणे गरजेचं असल्याचं नरेंद्र मोदींनी सांगितलं. उत्तर कोरियाचे शासक किम जोंग यांनीही नरेंद्र मोदी यांच अभिनंदन केलं आहे.
नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये सार्क देशांच्या प्रमुखांना शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण दिलं होतं. त्यावेळी पाकिस्तानचे तत्कालिन पंतप्रधान नवाझ शरीफ यांना या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावली होती.
लोकसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळवल्यानंतर 25 मे रोजी भाजपसह सर्व घटक पक्षांनी नरेंद्र मोदींची संसदीय पक्षनेतेपदी निवड केली. केंद्रीय सभागृहतील बैठकीदरम्यान भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांनी नरेंद्र मोदींच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. त्यानंतर भाजपचे दोन माजी अध्यक्ष राजनाथ सिंह आणि नितीन गडकरी यांनी या प्रस्तावावर मोहर उमटवली.
गडकरी आणि सिंह यांच्या समर्थनानंतर शिरोमणी अकाली दलचे नेते प्रकाश सिंह बादल, बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल युनायटेड (जेडीयू) चे अध्यक्ष नितीश कुमार यांनीदेखील अमित शाह यांच्या प्रस्तावास समर्थन दिले.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)