एक्स्प्लोर

Shivdeep Lande: बिहारचा सिंघम IPS शिवदीप लांडेंचा पोलीस सेवेतून राजीनामा, कारण गुलदस्त्यात, पुढे काय करणार?

Bihar Shivdeep Lande: शिवदीप लांडे यांनी बिहारमधील अरारिया, पूर्णिया आणि जमलपूरमध्येही पोलीस अधीक्षक म्हणून प्रभावी काम केले होते. बिहारमध्ये ते एक लोकप्रिय पोलीस अधिकारी म्हणून प्रसिद्ध आहेत.

पाटणा: बिहारचे सिंघम अशी ओळख असलेले मराठमोळे आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांनी पोलीस सेवेतून राजीनामा दिला आहे. शिवदीप लांडे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली. या पोस्टमध्ये शिवदीप लांडे (Shivdeep Lande) यांनी म्हटले आहे की, माझ्या प्रिय बिहार, गेली 18 वर्षे सरकारी पदाच्या माध्यमातून सेवा केल्यानंतर मी आता माझ्या पदाचा राजीनामा देत आहे. माझ्या या सगळ्या कार्यकाळात मी बिहार राज्याला स्वत:पेक्षा आणि कुटुंबापेक्षा सर्वोच्च मानले आहे. माझ्या सेवेच्या काळात माझ्याकडून कोणतीची चुकभूल झाली असेल तर मी त्यासाठी क्षमस्व आहे. मी भारतीय पोलीस सेवेतून राजीनामा दिला आहे. मात्र, मी बिहारमध्येच (Bihar) राहणार आहे. यापुढेही बिहार हीच माझी कर्मभूमी असेल, असे शिवदीप लांडे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये नमूद केले आहे.

शिवदीप लांडे हे मध्यतरी मुंबईत महाराष्ट्र पोलिस सेवेतही कार्यरत होते. लांडे हे शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांचे जावई आहेत. त्यांनी मुंबईत अमली पदार्थ विरोधी पथकात कार्यरत असतानाही प्रभावी कामगिरी करत ड्रग्ज तस्करांचे कंबरडे मोडले होते. तर गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त असताना अनेक महत्वाचे गुन्हे उघडकीस आणले होते. 

2006 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले शिवदीप लांडे हे सध्या बिहारच्या स्पेशल टास्क फोर्समध्ये अधीक्षक होते. त्यांच्या बेधडक कामाच्या पद्धतीमुळे ते बिहारमध्ये चांगलेच प्रसिद्ध आहेत. शिवदीप लांडे यांची काही काळासाठी महाराष्ट्रात बदली झाली होती तेव्हा मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही खेद व्यक्त केला होता. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांची लांडे यांना सोडण्याची इच्छा नव्हती. मात्र, सिंघम शिवदीप लांडे यांना स्वगृही म्हणजे महाराष्ट्रात परतायचे असल्याने त्यांना मुभा देण्यात आली होती. 

कोण आहेत शिवदीप लांडे?

 शिवदीप लांडे 2006 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. शिवदीप यांनी  इलेक्ट्रीकल इंजिनिअरची पदवी शिक्षण घेतलं आहे. 29 ऑगस्ट 1976 रोजी बुलडाणा जिल्ह्यातील बडसिंगी इथं शिवदीप यांचा जन्म झाला. घरची परिस्थिती अत्यंत बिकट. शिवदीप यांना एक मोठी बहिण आणि लहान भाऊ आहे. शिवदीप यांचं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झालं. त्यानंतर त्यांनी सरकारी कोट्यातून अमरावती विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगची पदवी मिळवली. यानंतर शिवदीप यांनी नोकरीनिमित्त थेट मुंबई गाठली. मुंबईत त्यांनी अनेक कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून काम केलं. मात्र समाजाप्रती काही करण्याची तळमळ त्यांना शांत बसू देत नव्हती. त्यामुळे त्यांनी यूपीएससीची तयारी केली. यूपीएससीमध्ये पास झालेल्या शिवदीप लांडे यांना कलेक्टर बनण्याची इच्छा होती. पण रँक न मिळल्याने त्यांना आयपीएस स्वीकारावं लागलं.

पहिली पोस्टिंग

शिवदीप लांडे यांची प्रशिणार्थी पोलीस अधीक्षक म्हणून बिहारच्या मुंगेरजवळच्या जमालपूर इथं नियुक्ती झाली होती. हा परिसर नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जात होता. पोलिसांवर फायरिंग करणाऱ्या नक्षलवाद्यांचा परिसर म्हणून या भागाला ओळखलं जात होतं. इथेच 2005 साली नक्षलवाद्यांनी पोलीस अधीक्षक सुरेंद्र बाबूंची हत्या केली होती. त्यामुळे पोलीस या ठिकाणी जाण्यास घाबरत होते. मात्र पहिल्याच नियुक्तीत शिवदीप यांनी आपल्या कामाची छाप पाडून, स्थानिकांचा विश्वास मिळवला. प्रत्येक आठवड्यात ते या परिसरात जाऊन स्थानिकांच्या गाठीभेटी घेत. त्यामुळे स्थानिकांचं त्यांना सहकार्य मिळालं. त्याचा परिणाम गुन्हेगारी कमी होण्यात झाली. शिवदीप यांनी बिहारमध्ये अनेक धडक कारवाया करून गुन्हेगारी संपुष्टात आणली.  धडक कारवाई रोखण्यासाठी त्यांच्यावर राजकीय दबाव टाकण्यात आला. त्यांची बदलीही करण्यात आली. मात्र, शिवदीप यांच्या बदलीविरोधात बिहारी जनता रस्त्यावर उतरली होती. 

आणखी वाचा

मनसुख हिरण हत्या प्रकरण आम्ही सोडवलं, एटीएस डिआयजी शिवदीप लांडेंची फेसबुक पोस्ट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

थायलंड भूकंप दुर्घटनेत 144 जणांचा मृत्यू, 832 जखमी; इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या, बचावकार्य सुरू
थायलंड भूकंप दुर्घटनेत 144 जणांचा मृत्यू, 832 जखमी; इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या, बचावकार्य सुरू
MS Dhoni : महेंद्रसिंह धोनी नवव्या स्थानावर फलंदाजीला, चेन्नईच्या पराभवानंतर वर्ल्डकप विजेता खेळाडू संतापला अन् म्हणाला...
धोनी फलंदाजीसाठी नवव्या स्थानावर, टीमसाठी हे चांगलं नाही, वर्ल्डकप विजेत्या खेळाडूकडून नाराजी
BMC Transfer : मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणींनी यांनी भाकरी फिरवली, सहआयुक्त, सहायक आयुक्तांच्या बदल्या
मुंबई महापालिकेत खांदेपालट, सहआयुक्त, सहायक आयुक्तांच्या बदल्या, संपूर्ण यादी समोर
साताऱ्यातील रत्नशिव निंबाळकरला गाडीनं उडवलं,कोयत्यानं संपवलं, आरोपीला अटक करा, कुटुंबीयांना न्याय द्या : अंजली दमानिया
आज पुन्हा हलून निघाले, डोकं पुन्हा सुन्न झालं, साताऱ्यातील मृत रत्नशिवच्या कुटुंबीयांच्या भेटीनंतर अंजली दमानियांची पोस्ट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City 60 Superfast News :टॉप 60 सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 28 March 2025 : ABP Majha : 9 PmSantosh Deshmukh Case Update : देशमुख हत्या प्रकरण, आरोपी सुदर्शन घुलेने सांगितली संपूर्ण घटनाABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 28 March 2025Job Majha : Agricultural Scientists Recruitment Board मध्ये नोकरीची संंधी, शैक्षणिक पात्रता काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
थायलंड भूकंप दुर्घटनेत 144 जणांचा मृत्यू, 832 जखमी; इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या, बचावकार्य सुरू
थायलंड भूकंप दुर्घटनेत 144 जणांचा मृत्यू, 832 जखमी; इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या, बचावकार्य सुरू
MS Dhoni : महेंद्रसिंह धोनी नवव्या स्थानावर फलंदाजीला, चेन्नईच्या पराभवानंतर वर्ल्डकप विजेता खेळाडू संतापला अन् म्हणाला...
धोनी फलंदाजीसाठी नवव्या स्थानावर, टीमसाठी हे चांगलं नाही, वर्ल्डकप विजेत्या खेळाडूकडून नाराजी
BMC Transfer : मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणींनी यांनी भाकरी फिरवली, सहआयुक्त, सहायक आयुक्तांच्या बदल्या
मुंबई महापालिकेत खांदेपालट, सहआयुक्त, सहायक आयुक्तांच्या बदल्या, संपूर्ण यादी समोर
साताऱ्यातील रत्नशिव निंबाळकरला गाडीनं उडवलं,कोयत्यानं संपवलं, आरोपीला अटक करा, कुटुंबीयांना न्याय द्या : अंजली दमानिया
आज पुन्हा हलून निघाले, डोकं पुन्हा सुन्न झालं, साताऱ्यातील मृत रत्नशिवच्या कुटुंबीयांच्या भेटीनंतर अंजली दमानियांची पोस्ट
मुंबईत मोकळा श्वास, आणखी एक पर्यटनस्थळ; गुढी पाडव्याला नेचर वॉक वे सुरू होणार
मुंबईत मोकळा श्वास, आणखी एक पर्यटनस्थळ; गुढी पाडव्याला नेचर वॉक वे सुरू होणार
सलमान खानच्या हाती भगवं घड्याळ, आतमध्ये राम मंदिर, मौलाना चिडले; पण खास घड्याळाची किंमत किती?
सलमान खानच्या हाती भगवं घड्याळ, आतमध्ये राम मंदिर, मौलाना चिडले; पण खास घड्याळाची किंमत किती?
GST : 1 एप्रिलपासून जीएसटीच्या काही नियमात बदल, नुकसान टाळण्यासाठी बदलांबाबत जाणून घ्या
GST : 1 एप्रिलपासून जीएसटीच्या काही नियमात बदल, नुकसान टाळण्यासाठी बदलांबाबत जाणून घ्या
होय, अपहरण केलं, त्यासाठी स्विफ्ट भाड्यानं घेतली; सुदर्शन घुलेचा जबाब ABP माझाच्या हाती, सांगितली संपूर्ण स्टोरी
होय, अपहरण केलं, त्यासाठी स्विफ्ट भाड्यानं घेतली; सुदर्शन घुलेचा जबाब ABP माझाच्या हाती, सांगितली संपूर्ण स्टोरी
Embed widget