(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Uttarakhand : भूकंपाच्या झटक्याने उत्तराखंड हादरलं, भूकंपाची तीव्रता 4.6 रिश्टर स्केल
Earthquake in Uttarakhand: उत्तराखंड आज सकाळी भूकंपाच्या धक्क्यांनी हादरुन गेलं. जोशीमठ (Joshimath) पासून 31 किलोमीटर अंतरावर सकाळच्या सुमारास भूकंपाच्या धक्क्याने नागरिक घाबरुन गेले.
Earthquake in Uttarakhand: उत्तराखंड (Uttarakhand Earthquake) आज सकाळी भूकंपाच्या धक्क्यांनी हादरुन गेलं. जोशीमठ (Joshimath) पासून 31 किलोमीटर अंतरावर सकाळच्या सुमारास भूकंपाच्या धक्क्याने नागरिक घाबरुन गेले. भूकंपाचे झटके जाणवताच लोक घराच्या बाहेर पडले. या भूकंपामुळं कुठल्याही प्रकारचं नुकसान झालेलं नसल्याची माहिती मिळाली आहे मात्र भूकंपाचे झटके खूप मोठ्या प्रमाणात होते, अशीही माहिती आहे.
उत्तराखंड में जोशीमठ से 31 किलोमीटर पश्चिम दक्षिण पश्चिम (WSW) में आज सुबह 05:58 बजे रिक्टर स्केल पर 4.6 तीव्रता का भूकंप आया: नेशनल सेंटर फॉर सीस्मोलॉजी
— ANI_HindiNews (@AHindinews) September 11, 2021
नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीच्या माहितीनुसार या भूकंपाची तीव्रता 4.6 रिश्टर स्केल इतरी होती. उत्तराखंडच्या जोशीमठपासून 31 किलोमीटर अंतरावर पश्चिम दक्षिण पश्चिम (WSW) मध्ये आज पहाटे 5.58 वाजता हा भूकंप झाला असल्याची माहिती आहे. या भूकंपाचे हलके धक्के आजूबाजूच्या राज्यालाही बसले असल्याची माहिती आहे.
Haiti Earthquake : हैती भूकंपानं हादरलं; 700 हून अधिक नागरिकांचा मृत्यू, तर 2800 जण गंभीर जखमी
गुरुवारी हिमाचल प्रदेशमध्ये भूकंप झाला होता. या भूकंपाचे केंद्र चंबा जिल्ह्यात असल्याची माहिती मिळाली होती. जमिनीच्या आत पाच किलोमीटरवर हा भूकंप झाला होता ज्याची तीव्रता 3.6 रिश्टर स्केल इतकी होती.
भूकंप होतात तरी कसे?
पृथ्वीच्या गाभ्याच्या आणि कवचाच्या मध्ये असलेले मेटल द्रवरुप असते. अर्धवट द्रवरुप असल्याने ते पृथ्वीच्या बाह्य कवचाला चिकटते. त्यामुळे पृथ्वीचे मॅग्नेटिक फील्ड बदलते. त्याचा थेट परिणाम पृथ्वीच्या परिवलनावर होतो आणि पृथ्वीची गती काही मिलिसेकंदांनी कमी होते. दिवसाच्या आकारातही बदल होतो. यामुळे चुंबकीय तरंग निर्माण होऊन भूकंप होतात.
भूकंप झाल्यास कोणती काळजी घ्यावी?
तुम्ही एखाद्या इमारतीत असताना भूंकपाचे तीव्र धक्के जाणवू लागले तर तात्काळ एखाद्या मजबूत फर्निचरचा आसरा घेऊन त्याखाली जाऊन लपा. किंवा एखाद्या कोपऱ्यात उभे राहून तुमचा चेहरा आणि डोकं झाकण्याचा पुरेसा प्रयत्न करा.
शक्य झाल्यास तात्काळ इमारतीतून बाहेर पडा आणि मोकळ्या मैदानात जाण्याचा प्रयत्न करा.
तुम्ही एखाद्या वाहानात बसले असल्यास तत्काळ वाहन थांबवा आणि आतच बसून राहा
जर तुम्ही ढिगाऱ्याखाली अडकले असाल तर चुकूनही काडेपेटी जाळू नका. तसंच अजिबात हलण्याचा प्रयत्न करु नका.
ढिगाऱ्याखाली अडकल्यानंतर एखाद्या पाईप किंवा भिंतीवर हळूहळू हात मारा. जेणेकरुन बचाव पथक तुमच्यापर्यंत पोहचू शकेल.