एक्स्प्लोर
लडाखमध्ये हिमवादळात तिघांचा मृत्यू, 10 जण अडकले
खराब वातावरणामुळे बचावकार्यात अनेक अडथळे निर्माण होत आहेत. गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये मोठया प्रमाणावर बर्फवृष्टी सुरु आहे. लडाखमधील पारा -20 ते -30 अंश सेल्सिअस आहे. याशिवाय खारदुंगलामध्ये थंड हवा वाहत आहेत. त्यामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत.
लडाख : जम्मू-काश्मीरच्या लडाखमधील खारदुंगला भागात बर्फाच्या वादळात तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे, तर दहा जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. हिमकडा कोसळल्याने ही दुर्घटना घडली आहे. घटनेनंतर बचावकार्य सुरु झालं आहे.
हिमवादळात अनेक गाड्या फसल्याची माहिती मिळत आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार एक स्कॉर्पिओ गाडी आणि अन्य काही गाड्या हिमवादळात फसल्या आहेत. घटनेची माहिती मिळाल्यानंतर एसडीआरएफ, सेना आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी बचावकार्य सुरु केलं आहे.
खराब वातावरणामुळे बचावकार्यात अनेक अडथळे निर्माण होत आहेत. गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये मोठया प्रमाणावर बर्फवृष्टी सुरु आहे. लडाखमधील पारा -20 ते -30 अंश सेल्सिअस आहे. याशिवाय खारदुंगलामध्ये थंड हवा वाहत आहेत. त्यामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत.
हवामान विभागानं जम्मू-काश्मीरच्या नऊ जिल्ह्यात हिमस्खलन होऊ शकते असा अंदाज वर्तवला होता. तसेच 19 ते 25 जानेवारीदरम्यान लडाख परिसरात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. सध्या बर्फाखाली अडकलेल्या लोकांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी एसडीआरएफ, सेना आणि जम्मू काश्मीर पोलीस प्रयत्न करत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement