एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

राष्ट्रपतींच्या उद्गारांनी कलेचं चीज, चित्रकार महेश लाड कृतकृत्य

घटनात्मक दृष्टीनं देशात सर्वोच्च प्रतिष्ठा असलेल्या वास्तूत त्यामुळे पहिल्यांदाच छत्रपती शिवरायांचं तैलचित्र लागणार आहे

नवी दिल्ली : राष्ट्रपतींच्या उद्गागारांनी माझ्या कलेचं चीज झालं. आमचे पूर्वज महाराजांच्या दरबारी होते, आज आपल्यालाही तो मान मिळाला, केवळ या एका भावनेनं आमचं सगळं कुटुंब समाधानी आहे, अशा शब्दात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना भेट दिलेल्या शिवरायांच्या प्रतिमेचे चित्रकार महेश लाड यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. शिवरायांच्या या प्रतिमेनं राष्ट्रपती भवनात जी कमतरता जाणवत होती, ती पूर्ण झाली, असे भावनिक उद्गार काल राष्ट्रपतींनी दिल्लीतल्या भव्य शिवजयंती सोहळ्यात काढलेले होते. या सोहळ्यात शिवरायांची भव्य प्रतिमा भेट दिल्यानंतर कृतार्थतेनं त्यांनी या भावना व्यक्त केल्या होत्या. अतिशय उच्च प्रतीचं हे तैलचित्र राष्ट्रपती भवनाची शोभा वाढवत राहील, असेही राष्ट्रपती म्हणाले होते. घटनात्मक दृष्टीनं देशात सर्वोच्च प्रतिष्ठा असलेल्या वास्तूत त्यामुळे पहिल्यांदाच छत्रपती शिवरायांचं तैलचित्र लागणार आहे. हे तैलचित्र ज्या कलाकाराच्या हातून साकार झालं, त्या महेश लाड यांच्याशी 'एबीपी माझा'नं एक्स्क्लुझिव्ह बातचीत केली.

शिवरायांच्या प्रतिमेमुळे राष्ट्रपती भवनातील कमतरता पूर्ण : कोविंद

"राष्ट्रपतींच्या या उद्गागारांनी माझ्या कलेचं चीज झालं. आमचे पूर्वज महाराजांच्या दरबारी होते, आज आपल्यालाही तो मान मिळाला या केवळ एका भावनेनं आमचं सगळं कुटुंब समाधानी आहे" अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. राष्ट्रपतींसाठी चित्र बनवायला सांगितलं, यापेक्षा जे चित्र बनवत आहोत, ते महाराजांचं आहे, याच भावनेनं आनंदून गेलो होतो असं लाड यांनी म्हटलं. राष्ट्रपतींना भेट द्यायचंय म्हटल्यावर त्या चित्राच्या सत्यतेवर भर देणं भाग होते. त्याबाबत खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्याशी चर्चा केल्यानंतर ब्रिटीश लायब्ररीमध्ये महाराजांचे जे एकमेव पोर्ट्रेट आहे, त्याची निवड करायचं पक्कं झालं, असं महेश लाड यांनी सांगितलं. राष्ट्रपतींना भेट दिलेल्या महाराजांच्या प्रतिमेत सोन्याचे कण मढवण्यात आलेत, म्हणजे ही प्रतिमा सुवर्णजडित आहे. तसंच यात काही इतर उच्च दर्जाच्या स्टोन्सचाही वापर करण्यात आला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
Supreme Court : 104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
SKOCH Award :'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Konkan Project Special Report : नाणार आणि बारसू प्रकल्पांचं काय होणार?Murlidhar Mohol Special Report : मुरलीधर मोहोळ यांच्या नावाची का होतेय चर्चा?Maharashtra Election EVM Special Report : महाराष्ट्राचा निकाल, EVM वरून वाद, Baba Adhav यांचं आंदोलनSaudala Shirdi Special Report : शिव्या देणार त्याला 500 रुपये दंड बसणार!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
Supreme Court : 104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
SKOCH Award :'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
सरकारी नोकरीची संधी, 'असिस्टंट ऑफिसर' पदासाठी 50 जागांवर भरती, एनटीपीसीमध्ये आजच करा अर्ज
सरकारी नोकरीची संधी, 'असिस्टंट ऑफिसर' पदासाठी 50 जागांवर भरती, एनटीपीसीमध्ये आजच करा अर्ज
अहमदनगरमध्ये चेष्टा मस्करी जीवावर बेतली, मित्राकडून मित्राचा अनावधानाने खून; गुन्हा दाखल
अहमदनगरमध्ये चेष्टा मस्करी जीवावर बेतली, मित्राकडून मित्राचा अनावधानाने खून; गुन्हा दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स एका क्लिकवर, शनिवार 30 नोव्हेंबर 2024
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स एका क्लिकवर, शनिवार 30 नोव्हेंबर 2024
Shardul Thakur : कोण होतास, काय झालात तू, आयपीएलमध्ये कोणीच भाव देईना; शार्दूल ठाकूर सुद्धा 'पृथ्वी शॉ' होण्याच्या मार्गावर?
कोण होतास, काय झालात तू, आयपीएलमध्ये कोणीच भाव देईना; शार्दूल ठाकूर सुद्धा 'पृथ्वी शॉ' होण्याच्या मार्गावर?
Embed widget