एक्स्प्लोर
अमित शाह आता दिल्लीत, भाजपचा मोठा निर्णय
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना गुजरातमधून राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे.

नवी दिल्ली : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना गुजरातमधून राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. सोबतच केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनाही गुजरातमधूनच राज्यसभेवर पाठवलं जाणार आहे. भाजपच्या संसदीय बोर्डाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
अमित शाह सध्या गुजरात विधानसभेत आमदार आहेत. अमित शाह यांना दिल्लीत आणल्यानंतर आता त्यांची केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारानंतर मंत्रिमंडळातही वर्णी लागू शकते, असा अंदाज लावला जात आहे. मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण अमित शाह यांना आता दिल्लीच्या राजकारणात आणण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे.
राज्यसभेच्या एकूण 10 जागांसाठी निवडणूक होणार आहे. यापैकी तीन गुजरातमधून, सहा पश्चिम बंगालमधून आणि एक जागा मध्य प्रदेशातून आहे.
मध्य प्रदेशात केंद्रीय मंत्री अनिल दवे यांच्या निधनानंतर जागा खाली झाली आहे. तर पश्चिम बंगाल आणि गुजरातमध्ये नव्या जागांसाठी निवडणूक होणार आहे.
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
पुणे
व्यापार-उद्योग
हिंगोली
Advertisement
Advertisement
























