एक्स्प्लोर

अमित शाहांनी गडकरींचा आदर्श घेऊन राजीनामा द्यावा : काँग्रेस

गैरव्यवहाराचे आरोप झाल्यानंतर नितीन गडकरींनी ज्या प्रकारे राजीनामा दिला होता, त्याचप्रमाणे अमित शाहांनीही भाजपच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

नवी दिल्ली : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, बंगारु लक्ष्मण, नितीन गडकरी या भाजपच्या माजी अध्यक्षांचा आदर्श घेऊन अमित शाहांनी आता आरोपानंतर तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. नितीन गडकरी हे अध्यक्ष असताना त्यांच्यावर पूर्ती कंपनीतल्या गैरव्यवहाराचे आरोप झाले. त्यावर गडकरींनी तातडीने राजीनामा दिला. या प्रकरणी पुढे कुठली केसही चालली नाही. जर भाजप केवळ आरोपानंतर गडकरींचा राजीनामा घेऊ शकते, तर त्यांनी आता अमित शाहांचाही नैतिकदृष्ट्या राजीनामा घ्यावा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. अमित शहांचे पुत्र जय शहा यांच्या कंपनीची उलाढाल एका वर्षात 16 हजार पटींनी कशी वाढली, याबद्दलचं वृत्त ‘द वायर’ या वेबपोर्टलने दिलं होतं. या स्फोटक बातमीनंतर राजधानी दिल्लीतलं वातावरण चांगलंच तापलं आहे. अवघ्या 50 हजार रुपयांचा टर्न ओव्हर असलेली कंपनी एका वर्षात 16 हजार पटींनी आपली उलाढाल कशी काय वाढवू शकते, असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला. असा काही मूलमंत्र असेल तर तो स्टार्ट अप इंडिया योजनेत संघर्ष करणाऱ्या तरुणांना देऊन त्यांना उन्नती मार्गावर न्यावं असा टोला लगावला आहे. भाजपमधल्या राजीनाम्याच्या इतिहासाचीही आठवण काँग्रेसने करुन दिली. जैन डायरीत केवळ नाव आल्यानंतर लालकृष्ण अडवाणी हे तातडीने पदावरुन दूर झाले. बंगारु लक्ष्मण हे कॅमेऱ्यात लाच घेताना आढळल्यावर त्यांनाही पद गमवावं लागलं होतं. अगदी ताजं उदाहरण हे नितीन गडकरींचं आहे. गडकरींनाही पूर्तीमध्ये केवळ आरोपांवरुन राजीनामा द्यावा लागला होता. भाजपमधली ही परंपरा लक्षात घेऊन आता अमित शाहांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसने आज दिल्लीतल्या पत्रकार परिषदेत केली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावरABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 19 January 2024Women kho kho world cup 2025 : पहिल्याच खो खो विश्वचषकात भारतीय महिला संघ विश्वविजेताDhananjay Munde Shirdi : अभिमन्यू, अर्जून आणि आश्वासन! खदखद, विनवणी, मुंडेंची कहाणी..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Embed widget