(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Amarnath Yatra 2022 : बाबा बर्फानी यांचा यंदाचा पहिला फोटो समोर, 30 जूनपासून सुरू होणार अमरनाथ यात्रा
Amarnath Yatra 2022 : गांदरबल पोलिसांच्या एका पथकाने अमरनाथ यात्रेच्या मार्गावरील सुरक्षेचं सर्वेक्षण केलं. यादरम्यान पथकानी गुहेतील बाबा बर्फानी यांचा फोटो शेअर केला आहे.
Amarnath Yatra 2022 : यंदा कोरोना संकटानंतर दोन वर्षांनी अमरनाथ यात्रा पार पडणार आहे. अमरनाथ यात्रा 30 जून ते 11 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. सध्या प्रशासनाकडून या यात्रेची जय्यत तयारी सुरू आहे. यात्रेकरुंच्या सोयीसाठी प्रशासनाकडून प्रत्येक लहान-मोठ्या गोष्टींची योग्य ती काळजी घेतली जात आहे. या पार्श्वभूमीवर गांदरबल पोलिसांच्या पथकाने यात्रेच्या गुहेपर्यंतच्या मार्गावरील सुरक्षेचं सर्वेक्षण केलंय. यावेळी पथकानी बाबा बर्फानी (Baba Barfani) यांचा पहिला फोटोही शेअर केला आहे.
अमरनाथ गुहा काश्मीरच्या बर्फाळ पर्वतांमध्ये वसलेली आहे. या गुहेत बर्फापासून बनवलेल्या शिवलिंगाची पूजा केली जाते. अमरनाथ गुहा हे भगवान शंकराच्या प्रमुख धार्मिक स्थळांपैकी एक मानलं जातं. यंदाच्या यात्रेची तयारी आणि व्यवस्थेबाबत 15 मे रोजी पहिली सुरक्षा आढावा बैठक झाली. यामध्ये उच्च प्रशासकीय आणि सुरक्षा अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत यात्रेकरूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी आणि त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशनचा वापर करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. श्री अमरनाथजी श्राइन बोर्डाचे सीईओ नितीश्वर कुमार यांनी सांगितले की, यंदाची यात्रा 43 दिवस चालणार आहे.
30 जून ते 11 ऑगस्ट यादरम्यान पार पडणार यात्रा
यंदाची अमरनाथ यात्रा 30 जून ते 11 ऑगस्ट या कालावधी दरम्यान होणार आहे. पोनी ऑपरेटरसाठी विमा संरक्षण कालावधी एका वर्षांपर्यंत वाढवण्यात आला आहे. 30 जूनपासून सुरू होणाऱ्या यात्रेसाठी पहिली सुरक्षा आढावा बैठक पार पडली. कोरोना महामारीमुळे मागील दोन वर्ष यात्रा रद्द करण्यात आली होती.
11 एप्रिलपासून नोंदणी प्रक्रियेला सुरूवात
अमरनाथ यात्रेला जाण्यास इच्छुक भाविकांसाठी 11 एप्रिलपासून नोंदणी सुरू झाली आहे. श्री अमरनाथजी श्राइन बोर्डाने ट्विट करून याबाबत माहिती दिली. 11 ऑगस्ट 2022 रोजी यात्रेची सांगता होणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या