![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Amarnath Yatra 2022 : 11 एप्रिलपासून नोंदणी, 30 जूनपासून यात्रेला सुरुवात
सर्व भाविक आणि इच्छुक प्रवासी 11 एप्रिलपासून अमरनाथ यात्रा 2022 साठी नोंदणी करु शकतात. 30 जूनपासून पवित्र अमरनाथ यात्रेला सुरुवात होणार आहे, असं श्री अमरनाथ श्राईन बोर्डाने सांगितलं.
![Amarnath Yatra 2022 : 11 एप्रिलपासून नोंदणी, 30 जूनपासून यात्रेला सुरुवात Amarnath Yatra 2022 Advance registration for pilgrimage to begin from April 11, yatra will commence on June 30 Amarnath Yatra 2022 : 11 एप्रिलपासून नोंदणी, 30 जूनपासून यात्रेला सुरुवात](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/07/9893fb9e2929572a933c46d15877eb72_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
जम्मू काश्मीर : बाबा बर्फानीचे दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेली अमरनाथ यात्रा 30 जूनपासून सुरु होत आहे. यासाठी 11 एप्रिलपासून भाविकांना नोंदणी करता येणार आहे. श्री अमरनाथ श्राईन बोर्डाने (SASB) बुधवारी (6 एप्रिल) ही माहिती दिली.
श्री अमरनाथ श्राईन बोर्डाने (SASB) ट्वीट करुन सांगितलं की, सर्व भाविक आणि इच्छुक प्रवासी 11 एप्रिलपासून अमरनाथ यात्रा 2022 साठी नोंदणी करु शकतात. 30 जूनपासून पवित्र अमरनाथ यात्रेला सुरुवात होणार आहे. 43 दिवस चालणाऱ्या या यात्रेचा समारोप 11 ऑगस्ट 2022 रोजी होणार आहे.
नोंदणीचे प्रकार:
1. आगाऊ नोंदणी
2. ऑनलाईन नोंदणी
3. गट (ग्रुप) नोंदणी
4. अनिवासी भारतीय नोंदणी
5. ऑनस्पॉट नोंदणी
यात्रेसाठी ऑनलाईन नोंदणी कशी करावी?
- अमरनाथ यात्रेला जाऊ इच्छिणारे http://jksasb.nic.in/register.aspx या वेबसाईटला भेट देऊन सहजपणे नोंदणी करु शकतात.
- हेलिकॉप्टरच्या प्रवासाच्या अतिरिक्त दोन मार्गांवर दररोज दहा हजार यात्रेकरु जाऊ शकतील. त्याची नोंदणी SASB मोबाईल अॅपद्वारे केली जाऊ शकते.
- याशिवाय वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी तुम्ही www.shriamarnathjishrine.com या वेबसाईटला भेट देऊ शकता. त्यावर वेबसाईटवर डॉक्टर आणि आरोग्य संस्थांची यादी देण्यात आली आहे.
यात्रेसाठी आवश्यक कागदपत्रे:
1. दिलेल्या फॉरमॅटनुसार भरलेला अर्ज
2. डॉक्टर किंवा वैद्यकीय संस्थेकडून निर्धारित वेळेत वैद्यकीय प्रमाणपत्र
3. पासपोर्ट साईजचे 4 फोटो
यात्रेकरुंची वयोमर्यादा:
- 13 ते 75 वर्षे वयोगटातील लोक अमरनाथला जाऊ शकतात.
- 6 महिन्यांपेक्षा जास्त गर्भधारणा असलेल्या महिलांना प्रवास करण्याची परवानगी नाही.
महत्त्वाची माहिती:
- 5 पेक्षा जास्त परंतु 50 पेक्षा कमी व्यक्ती ग्रुप नोंदणीसाठी अर्ज करु शकतात.
- त्याच वेळी, निवडलेल्या दिवस आणि मार्गाच्या कोट्याच्या आधारे स्थलांतरित (एनआरआय) भाविकांची नोंदणी सुनिश्चित केली जाईल.
- स्थलांतरितांसाठी (एनआरआय) वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक आहे. ते त्यांचे प्रमाणपत्र COJKITD@PNB.CO.IN वर मेल करु शकतात.
- आगाऊ नोंदणीच्या अनुपस्थितीत, भाविक जम्मू आणि श्रीनगरमध्ये ऑनस्पॉट म्हणजेच जागेवरच नोंदणी करु शकतात.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)