(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Airtel : अचानक एअरटेलचे नेटवर्क गेले, यूजर्सचा संताप, कंपनीनं व्यक्त केली दिलगिरी
अचानक एअरटेलचे नेटवर्क गेले आहे. त्यामुळे एअरटेलच्या यूजर्सना अनेक अडचणींचा सामना करावा करावा लागत आहे.
Airtel : 11 वाजल्यापासून एअरटेलचे नेटवर्क गेले आहे. त्यामुळे भारतातील एअरटेलच्या यूजर्सना अनेक अडचणींचा सामना करावा करावा लागत आहे. अचानक खंडीत झालेल्या सेवेमुळे कॉलिंग आणि मेसेजिंगमध्येही अडथळे निर्माण होत होते. कामाच्या वेळेमध्येच एअरटेलची सेवा बंद पडल्याने ग्राहक संताप व्यक्त करत आहेत. तसेच अनेकजन एअरटेलकडे तक्रार देखील करत आहेत. दरम्यान या सर्व प्रकारावर एअरटेल कंपनीने दिलगिरी व्यक्त केली आहे. मागच्या पाच दिवसापूर्वी जिओची सेवा देखील तात्पुरती बंद झाली होती. अचानक बंद झालेल्या नेटवर्कनुळे जिओ यूजर्सना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता.
अचानक नेटवर्कची समस्या निर्माण झाल्याने मोठ्या संख्येने युजर्सनी ट्विटरवर तक्रारी मांडल्या आहेत. दुपारी 11 वाजल्यापासून अचानक नेटवर्क गेल्याने अनेक समस्या येत आहेत. कॉलिंग आणि मेसेज जात नसल्याने काम करणे अवघड झाले आहे. सोशल मीडियावर वापरकर्त्यांनी मांडलेल्या अहवालानुसार या समस्येचा दूरसंचार नेटवर्कवरील ब्रॉडबँड आणि सेल्युलर वापरकर्त्यांवर परिणाम झाल्याचे दिसत आहे.
दरम्यान,एअरटेलची सेवा अचानक ठप्प झाल्यामुळे ग्राहकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. याबाबत एअरटेलने दिलगिरी व्यक्त केली आहे. भारती एअरटेल सेवा लवकरच सुरळीत करण्याचे प्रयत्न कले. तांत्रिक कारणांमुळे सेवा ठप्प झाल्याची माहिती भारती एअरटेलने दिली आहे.
मागील सहा दिवसापूर्वी (5 फेब्रुवारीला) जिओची सेवा तात्पुरती बंद झाली होती. अचानक बंद झालेल्या नेटवर्कनुळे जिओ यूजर्सना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. अचानकपणे खंडित झालेल्या या सेवेने अनेक कामेही ठप्प पडली होती. तसेच कॉलिंग आणि मेसेजिंगमध्येही अडथळे आले होते. ऐन कामाच्या वेळी जिओची सेवा बंद पडल्याने अनेक वापरकर्त्यांनी ट्वीट करत जिओला तक्रार केली होती. त्यानंतर आता एअरटेलची सेवा ठप्प झाली आहे, त्यामुळे एअरटेलच्या यूजर्स संताप व्यक्त करताना दिसत आहेत.