Reliance Jio update : मुंबईत रिलायन्स जिओची सेवा काही काळासाठी खंडित, नेटकऱ्यांचा संताप अनावर
Reliance Jio update : अचानकपणे इंटरनेट सेवा बंद पडल्याने जिओ यूजर्सना बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागला.
Reliance Jio update : साधारण दुपारी 12 वाजल्यापासून रिलाईन्स जिओची (Reliance Jio) सेवा तात्पुरती बंद झाली. अचानक बंद झालेल्या नेटवर्कनुळे जिओ यूजर्सना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. अचानकपणे खंडित झालेल्या या सेवेने अनेक कामेही ठप्प पडली होती. तसेच कॉलिंग आणि मेसेजिंगमध्येही अडथळे निर्माण होत होते. त्यामुळे ऐन कामाच्या वेळी जिओची सेवा बंद पडल्याने अनेक वापरकर्त्यांनी ट्वीट करत जिओला तक्रार केली.
ट्विटरवर अनेक जिओ वापरकर्त्यांनी नोंदवले की ते त्यांच्या जिओ नंबरसह कोणतेही सेल्युलर कॉल करू शकत नाहीत. दरम्यान, नॉन-जिओ नंबर असलेल्यांकडे देखील जिओ नंबर असलेल्यांना कॉल पॅच करता आला नाही.
नेटवर्कवर ग्राहक नोंदणीकृत नसल्याचा मेसेज मिळाल्याची तक्रार वापरकर्त्यांनी केली होती. कंपनीच्या एका अधिकाऱ्याने तांत्रिक बिघाड झाल्याचे मान्य केले आणि ते पुनर्संचयित करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. तरी याबाबत नेमके कारण कळू शकले नाही. परिणामी अनेक वापरकर्त्यांना इतरांशी बोलण्यासाठी मॅसेजिंग अॅप व्हॉट्स्अॅप मधील कॉलिंग फीचरसारख्या पर्यायांवर अवलंबून राहावे लागले.
Hi! You may face an intermittent problem of using internet services or making or receiving calls on your mobile connection. This is temporary and our team is working to resolve this at the earliest - Sagar
— JioCare (@JioCare) February 5, 2022
या संदर्भात जिओच्या अधिकृत कस्टमर केअर (costomer care) हॅंडलने ट्विटला प्रतिसाद दिला होता की ही तात्पुरती समस्या आहे. आणि ती लवकरच सोडवली जाईल असे सांगितले.
महत्वाच्या बातम्या :
- EV Charging Station : सहज उभारता येईल इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन, 'या' पोर्टलवर मिळणार परवाना
- Budget 2022 : यंदा येणार 5G , अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची घोषणा
- मारुती सेलेरियो आणि वॅगनआर मध्ये जबरदस्त स्पर्धा, जाणून घ्या कोणती कार आहे दमदार?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha