Next Chief of Air Staff : एअर मार्शल वी आर चौधरी हवाई दलाचे नवे प्रमुख
एअर मार्शल आरकेएस भदौरिया यांच्या निवृत्तीनंतर मिग-29 के फायटर पायलट एअर मार्शल वी आर चौधरी हवाई दलाचे नवे प्रमुख होणार आहेत.
New Chief of Air Staff: एअर मार्शल आरकेएस भदौरिया (Air Chief Marshal RKS Bhadauria) यांच्या निवृत्तीनंतर मिग-29 के फायटर पायलट एअर मार्शल वी आर चौधरी (Air Marshal VR Chaudhari) हवाई दलाचे नवे प्रमुख होणार आहेत. सरकारने मार्शल वी आर चौधरी यांच्या नावाची घोषणा केली आहेत. वायुसेना प्रमुख आरकेएस भदौरिया 30 सप्टेंबरला निवृत्त होणार आहेत. त्यानंतर 1 ऑक्टोबरपासून मार्शल वी आर चौधरी प्रमुख पदाची सूत्रे स्विकारणार आहेत. मार्शल वी आर चौधरी हे 27 वे प्रमुख आहेत.
मार्शल वी आर चौधरी हे सध्या हवाई दलाचे उपाध्यक्ष आहेत. वी आर चौधरी 1982 साली हवाई दलात भरती झाले. मिग-29 फायटर जेटचे ते वैमानिक होते. सध्या ते हवाई दलाचे उपाध्यक्ष आहेत. या अगोदर ते एअरफोर्स अकॅडमीचे इन्स्ट्रक्टर देखील होते.
In Pics : ऑक्सीजन वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी एअर फोर्सकडून रिकाम्या ऑक्सिजन कंटेनरची विमानाने वाहतूक
Government of India has decided to appoint Air Marshal VR Chaudhari, presently Vice Chief of Air Staff as the next Chief of Air Staff. Current Chief of Air Staff Air Chief Marshal RKS Bhadauria retires from Service on 30th Sep 2021: Defence Ministry pic.twitter.com/AQFo9i72ku
— ANI (@ANI) September 21, 2021
एअर चीफ मार्शल भदौरिया यांनी 2019 साली हवाई दलाच्या प्रमुखपदाची सूत्रे स्विकारली होती. भदौरिया जून 1980 मध्ये भारतीय हवाई दलात आले. राष्ट्रीय रक्षा अकादमीचे माजी विद्यार्थी भदौरिया यांना सर्वश्रेष्ठ प्रदर्शनासाठी ‘स्वॉर्ड ऑफ ऑनर’या पुरस्काराने गौरविण्यात आले होते. तब्बल चार दशके त्यांनी देशाची सेवा केली आहे. या दरम्यान भदौरिया यांनी जगुआर स्क्वाड्रन आणि एका प्रमुख हवाई दलाच्या स्टेशनचे देखील नेतृत्त्व केले आहे. 1999 साली‘ऑपरेशन सफेद सागर’मध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती.