हवाई दलाची ताकद आणखी वाढणार, 10 राफेल विमानं लवकरच भारतात दाखल होणार
भारताचा फ्रान्सबरोबर 36 राफेल लढाऊ विमानांचा करार झाला आहे. यापैकी 11 राफेल विमानंआतापर्यंत भारतात पोहोचले आहेत.
नवी दिल्ली : राफेल लढाऊ विमानाने भारतीय सैन्याची ताकद आणखी वाढली आहे. चीनवर नजर ठेवण्यासाठी भारत राफेल विमानाचा वापर करत आहे. त्याचबरोबर लवकरच आणखी 10 राफेल लढाऊ विमाने भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात सामील होणार आहेत. येत्या 2-3 दिवसांत तीन राफेल लढाऊ विमाने भारतात पोहोचतील अशी सरकारी सूत्रांची माहिती आहे.
एप्रिलच्या दुसर्या आठवड्यात राफेल लढाऊ विमाने आणि त्यांचे ट्रेनर व्हर्जन भारतात दाखल होऊ शकतात. त्याचबरोबर या 10 राफेल विमानांचे भारतात आगमन झाल्यानंतर भारतीय हवाई दलात राफेल विमानांची संख्या वाढणार आहे. आतापर्यंत 11 राफेल विमानं भारतात आहेत आणि आणखी 10 विमाने आल्यानंतर भारताकडील राफेल विमानांची संख्या 21 वर जाणार आहे.
Olivier Dassault Death : राफेल कंपनीच्या मालकाचे हेलिकॉप्टर अपघातात निधन
भारत आणि फ्रान्समध्ये 36 राफेल लढाऊ विमानांचा करार झाला आहे. या विमानांसाठी 59,000 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. यापैकी 11 राफेल विमानंआतापर्यंत भारतात पोहोचले आहेत. ते अंबाला येथील सुवर्ण अॅरो स्क्वॉड्रॉनचा भाग आहेत. त्याचबरोबर पश्चिम बंगालमध्ये आता आणखी 10 राफेल विमानं तैनात करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.
पश्चिम बंगालच्या हशिमारा येथे राफेल विमानं तैनात करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. उत्तर बंगालमध्ये चीन भूतान ट्रायझँक्शनच्या जवळ आहे. चीन सोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर राफेलच्या मदतीने भारत चीनवर नजर ठेवून आहे. अशा परिस्थितीत नवीन राफेल विमानांचीही चीनवर लक्ष ठेवण्यास मदत होईल.
फ्लाईट लेफ्टनंट शिवांगी सिंह राफेलच्या पहिल्या महिला वैमानिक!
राफेल लढाऊ विमानाची वैशिष्ट्ये
1. राफेल असं लढाऊ विमान आहे, जे प्रत्येक मोहीमेवर पाठवलं जाऊ शकतं. भारतीय वायूसेना अनेक वर्षांपासून राफेलच्या प्रतीक्षेत होती.
2. हे विमान एका मिनिटात 60 हजार फूट उंचीपर्यंत जाऊ शकतं. याची इंधन क्षमता 17 हजार किलो आहे.
3. राफेल विमान हरतऱ्हेच्या हवामानात एकाच वेळी अनेक कामं करण्यास सक्षम आहे. त्यामुळे ते मल्टिरोल फायटर एअरक्राफ्ट म्हणूनही ओळखलं जातं.
4. यामध्ये स्काल्प मिसाईल आहे, जे हवेतून जमिनीवर मारा करण्यास सक्षम आहे.
5. राफेलची मारक क्षमता 3700 किलोमीटरपर्यंत आहे, तर स्काल्पची रेंज 300 किलोमीटर आहे.
6. हे अँटी शिप हल्ल्यापासून अणुबॉम्ब हल्ल्यापर्यंत, क्लोज एअर सपोर्ट आणि लेजर डायरेक्ट लॉन्ग रेंज मिसाईल अॅटॅकमध्येही अव्वल आहे.
7. राफेल विमान 24,500 किलोपर्यंत वजन घेऊन जाऊ शकतं आणि 60 तासांचं अतिरिक्त उड्डाणही करु शकतं.
8. राफेल विमानाचा वेग 2,223 किलोमीटर प्रति तास आहे.