एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

प्रत्यक्षदर्शी एअर होस्टेस खासदार रवींद्र गायकवाड यांच्या बाजूने

नवी दिल्ली : एअर इंडियाच्या अधिकाऱ्याला चपलेने मारल्यानंतर शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. मात्र या संपूर्ण घटनेची साक्षीदार असलेली एअर इंडियाच्या एअर होस्टेसने रवींद्र गायकवाड यांची बाजू मांडली आहे. "शिवसेना खासदार ड्यूटी मॅनेजरचं गैरवर्तन थांबवण्याचा प्रयत्न करत होते. ड्यूटी मॅनेजरला शिडीवर ढकलण्याचा त्यांचा कोणताही इरादा नव्हता," असं एअर होस्टेसने सांगितलं. एअर होस्टेसच्या माहितीनुसार, "विमानातील सामान्य प्रवाशांप्रमाणे रवींद्र गायकवाड प्रवास करत होते. विमानाच्या क्रू मेंबरसोबत त्यांचं वर्तन सभ्य होतं. रवींद्र गायकवाड अचानक हिंसक होतील, याची अपेक्षा नव्हती. एअरलाईन्सच्या मॅनेजमेंट अधिकाऱ्याशी त्यांना बोलायचं होतं, म्हणून ते विमानातून उतरत नव्हते. त्यांना जे-क्लासचा बोर्डिंग पास दिला होता आणि त्याबदल्यात त्यांना इकॉनॉमी क्लासमध्ये बसवण्यात आलं होतं. या मार्गावरील विमानात सर्व जागा इकॉनॉमी सीटच होत्या." "याच कारणामुळे खासदार गायकवाड यांची ग्राऊंड स्टाफसोबत बाचाबाची झाली. यानंतर त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्याशी भेटण्याची मागणी केली, तेव्हा ड्यूटी मॅनेजर सुकुमार तिथे आले. ते प्रामाणिकपणे त्यांची ड्यूटी करत होते, पण त्यांच्या बोलण्याच्या पद्धतीने गोंधळ झाला. कदाचित खासदार रवींद्र गायकवाड यांनीही ती बाब चुकीच्या पद्धतीने घेतली. दोघांमधील बाचाबाचीचं रुपांतर मारहाणीत झालं," असंही एअर होस्टेसने सांगितलं. "यानंतर खासदाराने चप्पल काढली आणि ते सुकुमार यांना मारणार होते. त्यासोबतच गायकवाड सुकुमार यांना शिडीच्या दिशेने घेऊन जात होते. मला गायकवाड यांची भीती वाट नव्हती. कारण प्रवासादरम्यान ते मला ताई म्हणत होते. तसंच इतर महिला कर्मचाऱ्यांसोबतही विनम्रतेने वागत होते," असं एअर होस्टेसने सांगितलं. यामुळेच एयर होस्टेसने पुढे जाऊन खासदार गायकवाड यांना थांबवलं. एअर होस्टेसने कायदा हातात घेऊ नका, असं सांगितल्यानंतर गायकवाड यांनीही ऐकलं आणि सुकुमार यांना सोडलं. काय आहे प्रकरण? उस्मानाबादचे शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड हे पुण्याहून दिल्लीला जात होते. बिझनेस क्लासचं तिकीट असताना आपल्याला इकॉनॉमिक क्लासमध्ये बसायला सांगितलं, असा दावा गायकवाड यांनी केला. रवींद्र गायकवाड त्याची तक्रार दिल्लीत गेल्यावर करणार होते. दिल्लीत विमान पोहोचल्यानंतर त्यांनी तक्रार पुस्तिका मागवली, पण एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी त्यासाठी नकार दिला, असा दावा गायकवाड यांनी केला. VIDEO: खा. रवींद्र गायकवाडांची गुंडगिरी विमानातल्या कॅमेऱ्यात कैद विमानातून सर्व कर्मचारी उतरुन गेल्यानंतरही रवींद्र गायकवाड बसून राहिले. तक्रार करण्याचा त्यांचा हट्ट होता. त्यानतंर क्रू मेंबरने एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला बोलावलं. मात्र त्या कर्मचाऱ्याने अरेरावीची भाषा केली, असं रवींद्र गायकवाड यांचं म्हणणं आहे. … म्हणून मी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला 25 सँडल मारले : रवींद्र गायकवाड ‘मी शिवसेनेचा खासदार आहे, भाजपचा नाही,  मला तक्रार करायची आहे, असं मी म्हणालो. पण कोण खासदार, मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगतो,  अशा भाषेत संबंधित कर्मचाऱ्याने उद्धट भाषा वापरली. त्यानंतर मी उठून त्याची कॉलर धरली आणि 25 सँडल मारले’’, अशी कबुली रवींद्र गायकवाड यांनी दिली. कोण आहेत रवींद्र गायकवाड? – रवींद्र गायकवाड हे शिवसेनेचे उस्मानाबादचे खासदार आहेत – लोकसभा निवडणुकीत रवींद्र गायकवाड यांनी राष्ट्रवादीचे पद्मसिंह पाटील यांचा पराभव केला. – उस्मानाबाद आणि परिसरात रवी सर म्हणून ते परिचित आहेत – रवींद्र गायकवाड हे उमरगा मतदारसंघातून दोन वेळ विधानसभेवर निवडून गेले होते. – दुष्काळी भागात पाझर तलावासाठी त्यांनी काम केलं आहे. – तसंच उस्मानाबाद परिसरातील वीजेच्या प्रश्नासाठीही आवाज उठवला. संबंधित बातम्या मीडियाशी बोलू नका, उद्धव ठाकरेंकडून खा. गायकवाड यांना समज खा. रवींद्र गायकवाड अधिवेशनाला हजेरी लावणार? चप्पलमार खासदार रवींद्र गायकवाडांवर 'अमूल'चा चित्रातून निशाणा गायकवाडांना सेवा नाकारणाऱ्या एअरलाईन्सविरोधात हक्कभंग आणणार लोकप्रतिनिधींनी पटकन हिंसक होणं अयोग्य : एकनाथ शिंदे पुन्हा त्याच विमानाने जाणार, एअर इंडियाने अडवून दाखवावं : गायकवाड एअर इंडियाकडून खासदार रवींद्र गायकवाड यांच्या विरोधात तक्रार … म्हणून मी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला 25 सँडल मारले : रवींद्र गायकवाड शिवसेनेने एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याचा पुतळा जाळला
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra vidhansabha Results : रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित
रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित देशमुख
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Koregaon Assembly Elections 2024 : महेश शिंदेंचा कोरेगावात दणदणीत विजय, शशिकांत शिंदेंचा पुन्हा पराभव
महेश शिंदेंचा कोरेगावात दणदणीत विजय, शशिकांत शिंदेंचा पुन्हा पराभव
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Naresh Arora on Ajit Pawar win :अजितदादा एकदम साधा माणूस, कुठे सौम्य, कुठं कडक असावं ते त्यांना कळलंDhananjay Mahadik on Satej Patil | पुतण्याला निवडून आणता आलं नाही आणि मुख्यमंत्री बनायले निघालेNarayan Rane On Vidhan Sabha Result : महाराष्ट्रात आता तोंड दाखवू नका, उद्धव ठाकरेंवर सडकून टीकाAmruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra vidhansabha Results : रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित
रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित देशमुख
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Koregaon Assembly Elections 2024 : महेश शिंदेंचा कोरेगावात दणदणीत विजय, शशिकांत शिंदेंचा पुन्हा पराभव
महेश शिंदेंचा कोरेगावात दणदणीत विजय, शशिकांत शिंदेंचा पुन्हा पराभव
Karjat Jamkhed : हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
Maharashtra Vidhan Sabha Election results 2024: ठाकरे ब्रँण्ड संकटात, विधानसभेचे भुईसपाट करणारे निकाल, आता इगो सोडून राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
ठाकरे ब्रँण्ड संकटात, विधानसभेचे भुईसपाट करणारे निकाल, आता इगो सोडून राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
Uddhav Thackeray : महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, उद्धव ठाकरे यांनी पराभवाचं कारण सांगितलं...
महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, विधानसभा निवडणुकीच्या निकालावर ठाकरेंची दोन शब्दांची प्रतिक्रिया
Maharashtra Vidhansabha Election 2024 : काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
Embed widget