एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 24/03/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 24/03/2017
- पाच दिवसांनी डॉक्टरांचा संप मागे, उद्या सकाळी 8 वाजेपर्यंत कामावर रुजू होणार, मुंबई हायकोर्टात 'मार्ड'चं प्रतिज्ञापत्र https://goo.gl/xVeE2x
- डॉक्टरांच्या संपामुळे राज्यभरातील शासकीय रुग्णालयात 377 रुग्ण दगावले, मुंबई महापालिकेच्या वकिलांची हायकोर्टात माहिती https://goo.gl/4BKam0 तर ज्यांच्या पैशावर शिकता, त्यांना मरणाच्या दारात सोडू नका, मुख्यमंत्र्यांचा डॉक्टरांना सज्जड दम https://goo.gl/ZUSLXb
- नीट परीक्षेसाठी महाराष्ट्रात चार नवी केंद्र, अहमदनगर, अमरावती, कोल्हापूर आणि साताऱ्याचा समावेश, मराठवाड्यात मात्र एकही नवं केंद्र नाही https://goo.gl/W8Ix25
- मंत्रालयात मारहाण झालेल्या शेतकऱ्याच्या भेटीला अजित पवार, विरोधकांना चुकीची माहिती देणाऱ्या पोलिसांवर पवार संतापले, मुख्यमंत्र्यांचे उच्चस्तरीय चौकशीचे आदेश https://goo.gl/Q5d7xz
- लोकप्रतिनिधींनी पटकन हिंसक होणं अयोग्य, रवींद्र गायकवाड यांच्यावर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया https://goo.gl/RfYT3X तर गायकवाड यांच्या हवाई प्रवासाला फेडरेशन ऑफ इंडियन एअरलाईन्सची मनाई https://goo.gl/AieWxn
- भाजपचे दोन मंत्री गुढीपाडव्याच्या मुहूर्ताला 'मातोश्री'वर जाणार, युतीमधील तणाव निवळण्यासाठी शिवसेनेसोबत चर्चा करणार https://goo.gl/9toK38
- दिघावासियांचं भवितव्य अंधारात, बेकायदेशीर बांधकामं नियमित करण्यास हायकोर्टाचा नकार, कायद्यात बदल करण्याचीही सूचना http://abpmajha.abplive.in/
- पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी अतोनात छळ केला, चंदू चव्हाण यांची 'एबीपी माझा'ला एक्स्क्लुझिव्ह मुलाखत, पाठिंबा देणाऱ्या सरकार, जनतेचे आभार
- सूर्यफूल बियांच्या आयात शुल्कात 20 टक्क्यांची कपात, सोयाबीनच्या भावात घसरण, तर साखरेवरील आयात शुल्कातही कपातीचे संकेत https://goo.gl/31U2cS
- मुलगा नसल्याने टोमणे ऐकावे लागल्याचा राग, पुण्यात सख्ख्या काकीकडून पाच वर्षांच्या पुतण्याची हत्या https://goo.gl/EUgbTg
- अमेरिकेत आणखी एका भारतीयाची हत्या, न्यूजर्सीत महिला अभियंत्यासह लेकाचा राहत्या घरी निर्घृण खून https://goo.gl/U93AIw
- नेरळ ते माथेरान टॉय ट्रेन जूनपासून पुन्हा पर्यटकांच्या सेवेत, सुरक्षित आणि आरामदायी प्रवासासाठी मध्य रेल्वेचे प्रयत्न https://goo.gl/xWhBUk
- आयफोन 7 च्या 'रेड' लिमिटेड एडिशनचं आजपासून प्री-बुकिंग, भारतीय ग्राहकांना मात्र एप्रिलपर्यंत वाट पाहावी लागणार https://goo.gl/p3oSCb
- 100 टक्के फिट असेन तरच चौथ्या कसोटीत खेळेन, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या निर्णायक कसोटीआधी विराट कोहलीची प्रतिक्रिया, विराटऐवजी मुंबईकर श्रेयस अय्यरचा समावेश होण्याची शक्यता https://goo.gl/vfhG0s
- शशांक मनोहर आयसीसीच्या चेअरमनपदी कायम राहणार, प्रशासकीय बाबींची पूर्तता करण्यासाठी राजीनाम्याचा निर्णय तात्पुरता स्थगित https://goo.gl/xFgsi5
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement