एक्स्प्लोर

AAP Supports UCC : समान नागरी कायद्याच्या मुद्द्यावर मोदी सरकारला मोठा पाठिंबा, आम आदमी पक्षाकडून तत्वत: समर्थन, पण...

AAP Supports UCC : आम आदमी पक्षाने समान नागरी कायद्याचं तत्वत: समर्थन केलं आहे. सर्व धर्मांशी चर्चा करुन सहमतीनेच हा कायदा करण्यात यावा, असं आम आदमी पक्षाचे सरचिटणीस संदीप पाठक म्हणाले.

AAP Supports UCC : समान नागरी कायदा (Uniform Civil Code) लागू करण्याबाबत चर्चा सुरु असतानाच मोदी सरकारला या मुद्द्यावर आम आदमी पक्षाचा पाठिंबा मिळत असल्याचं दिसत आहे. आम आदमी पक्षाने (Aam Aadmi Party) समान नागरी कायद्याचं तत्वत: समर्थन केलं आहे. सर्व धर्मांशी चर्चा करुन सहमतीनेच हा कायदा करण्यात यावा, असं आम आदमी पक्षाचे सरचिटणीस संदीप पाठक म्हणाले. समान नागरी कायद्याचं आम्ही तत्वतः समर्थन करतो, हा कायदा असावा असं घटनेच्या कलम 44 मध्ये देखील लिहिलं आहे. मात्र सर्व धर्मियांची याला संमती हवी. या मुद्द्यावर सर्व धर्म आणि राजकीय पक्षांशी चर्चा झाली पाहिजे. सर्वांच्या संमतीनंतरच त्याची अंमलबजावणी व्हायला हवी, अशी आपची भूमिका आहे, असं संदीप पाठक यांनी म्हटलं.

एकीकडे समान नागरी कायद्याला तत्वत: समर्थन देताना आम आदमी पक्षाचे नेते संदीप पाठक यांनी यूसीसीबाबत केंद्रातील भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. जेव्हाही निवडणुका येतात तेव्हा भाजप गुंतागुंतीचे आणि जटील मुद्दे घेऊन येतात, असं आप नेते संदीप पाठक म्हणाले. पाठक पुढे म्हणाले, 'समान नागरी कायदा लागू करणं आणि हा प्रश्न सोडवावा याच्याशी भाजपचा काहीही संबंध नाही. देशात फूट पाडून निवडणुका लढवता याव्यात यासाठी भाजप केवळ गोंधळाची स्थिती निर्माण करते. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 9 वर्षात काम केलं असतं तर कामाला पाठिंबा मिळाला असता, पंतप्रधानांना कामासाठी पाठिंबा मिळत नाही, त्यामुळे ते समान नागरी कायद्याचा आधार घेणार, अशी टीकाही संदीप पाठक यांनी केली.

दरम्यान समान नागरी कायदा आणणे हा राजकीय डाव असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले. तसेच निवडणुका डोळ्यासमोर ठेवून समान नागरी कायदा आणण्याचा प्रकार आहे, असंही त्यांनी म्हटलं.

समान नागरी कायद्याचं महत्त्व काय?

देशाच्या घटनेत मार्गदर्शक तत्वांमध्ये समान नागरी कायद्याचा उल्लेख आहे
मार्गदर्शक तत्वांचं पालन सरकारकडून अपेक्षित असतं, ती बंधनकारक नसतात
देशात सर्वधर्मीयांसाठी क्रिमिनल लॉ एकच आहे, पण पर्सनल लॉ मात्र वेगवेगळा आहे
त्यामुळे हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन, पारसी यांचे विवाहाबद्दलचे, घटस्फोटाबद्दलचे, वारसाहक्काबदलचे, दत्तकविधानाबद्दलचे कायदे वेगळे आहेत
त्या त्या धार्मिक समजुतींनाही या पर्सनल लॉमध्ये विशेष स्थान आहे. 
पण समान नागरी कायदा आल्यास या सगळ्यामध्ये समानता येईल

VIDEO : Arvind Kejriwal : Uniform Civil Code चं Aam Admi Party कडून समर्थन पण... ABP Majha

हेही वाचा

Uniform Civil Code : समान नागरी कायद्याला मुस्लिमांचा विरोध का?; पर्सनल लॉ बोर्डाच्या बैठकीत काय निर्णय झाला?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

'शहा सेनेचे' लोक भाजपच्या लोकांना ठेचताना दिसत आहेत, त्याकडे लक्ष द्या, आम्ही मुंबई आणि मराठी रक्षणासाठी रस्त्यावर आहोत; सीएम फडणवीसांच्या ‘ठेचून काढू’वर राऊतांचा गर्भित इशारा
'शहा सेनेचे' लोक भाजपच्या लोकांना ठेचताना दिसत आहेत, त्याकडे लक्ष द्या, आम्ही मुंबई आणि मराठी रक्षणासाठी रस्त्यावर आहोत; सीएम फडणवीसांच्या ‘ठेचून काढू’वर राऊतांचा गर्भित इशारा
बाईचं नाव रविंद्र असतं का? बोटावरील शाई नाही, लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर उद्धव ठाकरेंचा घणाघात
बाईचं नाव रविंद्र असतं का? बोटावरील शाई नाही, लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर उद्धव ठाकरेंचा घणाघात
Election Commission Voter Ink: बोटावरील शाई पुसली जातेय, राज ठाकरे संतापले; निवडणूक आयोग म्हणाले, पुन्हा मतदान करता येणार नाही, कारण...
शाई पुसली जातेय, राज ठाकरे संतापले; निवडणूक आयोग म्हणाले, पुन्हा मतदान करता येणार नाही, कारण...
अकोल्यात पडदाशीन यंत्रणेचा बोजवारा, बुरखाधारी महिलांना ओळख न पटवताच सोडलं; मतदान केंद्रावर गोंधळ
अकोल्यात पडदाशीन यंत्रणेचा बोजवारा, बुरखाधारी महिलांना ओळख न पटवताच सोडलं; मतदान केंद्रावर गोंधळ

व्हिडीओ

Raj Thackeray Mumbai : ..आणि शाई पुसा, परत जा… मतदान करुन बाहेर पडताच राज ठाकरे संतापले
Ashish Shelar PC : भ्रष्ट आणि अकार्यक्षण ठाकरे बंधूंना धडा शिकवण्याची ही शेवटची निवडणूक
Devendra Fadnavis On Voting : माझ्या हातावरील मार्कर पुसून दाखवा, राज ठाकरेंना फडणवीसांचं उत्तर
Rohit Pawar Pimpari Chinchwad : एका मताला ५००० चा भाव, मतदानाच्यादिवशी भाजपवर गंभीर आरोप
Ambadas Danve on BJP : भाजपला पैशांची मस्ती, उन्माद, संभाजीनगरात दानवेंच्या भावाचा संताप अनावर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'शहा सेनेचे' लोक भाजपच्या लोकांना ठेचताना दिसत आहेत, त्याकडे लक्ष द्या, आम्ही मुंबई आणि मराठी रक्षणासाठी रस्त्यावर आहोत; सीएम फडणवीसांच्या ‘ठेचून काढू’वर राऊतांचा गर्भित इशारा
'शहा सेनेचे' लोक भाजपच्या लोकांना ठेचताना दिसत आहेत, त्याकडे लक्ष द्या, आम्ही मुंबई आणि मराठी रक्षणासाठी रस्त्यावर आहोत; सीएम फडणवीसांच्या ‘ठेचून काढू’वर राऊतांचा गर्भित इशारा
बाईचं नाव रविंद्र असतं का? बोटावरील शाई नाही, लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर उद्धव ठाकरेंचा घणाघात
बाईचं नाव रविंद्र असतं का? बोटावरील शाई नाही, लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर उद्धव ठाकरेंचा घणाघात
Election Commission Voter Ink: बोटावरील शाई पुसली जातेय, राज ठाकरे संतापले; निवडणूक आयोग म्हणाले, पुन्हा मतदान करता येणार नाही, कारण...
शाई पुसली जातेय, राज ठाकरे संतापले; निवडणूक आयोग म्हणाले, पुन्हा मतदान करता येणार नाही, कारण...
अकोल्यात पडदाशीन यंत्रणेचा बोजवारा, बुरखाधारी महिलांना ओळख न पटवताच सोडलं; मतदान केंद्रावर गोंधळ
अकोल्यात पडदाशीन यंत्रणेचा बोजवारा, बुरखाधारी महिलांना ओळख न पटवताच सोडलं; मतदान केंद्रावर गोंधळ
निवडणूक आयुक्त कसला पगार घेता? दादागिरी करणारे हे भाईलोग नऊ वर्ष काय करत होते? राज्यात निवडणूक याद्यांचा गोंधळ, शाई सुद्धा पुसली जाते; राजनंतर उद्धव ठाकरेंचा सुद्धा संतापाचा उद्रेक
निवडणूक आयुक्त कसला पगार घेता? दादागिरी करणारे हे भाईलोग नऊ वर्ष काय करत होते? राज्यात निवडणूक याद्यांचा गोंधळ, शाई सुद्धा पुसली जाते; राजनंतर उद्धव ठाकरेंचा सुद्धा संतापाचा उद्रेक
Chhatrapati Sambhajinagar Voting 2026: छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपच्या अतुल सावेंच्या स्वर्गवासी वडिलांचे नाव मतदार यादीत, निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपच्या अतुल सावेंच्या स्वर्गवासी वडिलांचे नाव मतदार यादीत, निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार
मराठी माणसासाठी, महाराष्ट्राच्या मुंबईसाठी सगळ्यांनी आपली जबाबदारी पार पाडा, बाहेर पडा मतदान करा, 10 वर्षांनी आलेली संधी चुकवू नका; हेमंत ढोमेची भावनिक साद
मराठी माणसासाठी, महाराष्ट्राच्या मुंबईसाठी सगळ्यांनी आपली जबाबदारी पार पाडा, बाहेर पडा मतदान करा, 10 वर्षांनी आलेली संधी चुकवू नका; हेमंत ढोमेची भावनिक साद
मुंबई जिंकणं मराठी माणसाची पहिली लढाई, अशा अनेक लढायांना तोंड द्यावं लागेल, राज-उद्धव ठाकरेंच्या वादळाने मराठी माणूस जागा झाला, अस्मितेसाठी मतदान करेल; संजय राऊतांचा 'मनसे' विश्वास
मुंबई जिंकणं मराठी माणसाची पहिली लढाई, अशा अनेक लढायांना तोंड द्यावं लागेल, राज-उद्धव ठाकरेंच्या वादळाने मराठी माणूस जागा झाला, अस्मितेसाठी मतदान करेल; संजय राऊतांचा 'मनसे' विश्वास
Embed widget