एक्स्प्लोर
हिमाचल प्रदेशमध्ये बस नदीत कोसळली, 43 जणांचा मृत्यू

शिमला : हिमाचल प्रदेशमधील शिमला जिल्ह्यातील टॉन्स नदीत बस कोसळल्याची भीषण दुर्घटना घडली आहे. सकाळी 8 ते 9 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या भीषण दुर्घटनेत 43 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती पीटीआयने दिली आहे. तर काही जण वाहून गेल्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. शिमला जिल्ह्यात टॉन्स नदी आहे. या नदीत प्रवाशांनी भरलेली बस कोसळली. बसमध्ये 50 हून अधिक प्रवाशी होते, अशी माहिती मिळते आहे. बचावकार्यासाठी संबंधित प्रशासनाची पथकं घटनास्थळी दाखल झाली आहेत.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रिकेट
बुलढाणा
राजकारण























