एक्स्प्लोर
सरदार पटेलांचा पुतळा पाहण्यासाठी हजारो लोकांची गर्दी
जगातला सर्वात उंच पुतळा अशी ख्याती असलेल्या स्टॅच्यू ऑफ युनिटी या स्मारकाला पाहण्यासाठी हजारो लोकांची गर्दी होत आहे.

'स्टॅच्यू ऑफ युनिटी'
नर्मदा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 31 ऑक्टोबर रोजी सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यातील पुतळ्याचे अनावरण केले. जगातला सर्वात उंच पुतळा अशी ख्याती असलेल्या स्टॅच्यू ऑफ युनिटी या स्मारकाला पाहण्यासाठी हजारो लोकांची गर्दी होत आहे. शनिवारी हा पुतळा पाहण्यासाठी तब्बल 27 हजार पर्यटकांनी स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट दिली.
स्टॅच्यू ऑफ युनिटी हे स्मारक 1 नोव्हेंबरपासून सामान्यांसाठी खुले करण्यात आले. नर्मदा जिल्ह्यातील केवडिया येथील सरदार सरोवराच्या काठावर सरदार पटेलांची 182 मीटर उंचीची मूर्ती उभारण्यात आली आहे. मूर्तीमध्ये एक लिफ्टदेखील आहे. या लिफ्टचा दररोज 5 हजार लोक वापर करतात.
मूर्तीच्या आतमध्ये दर्शकांसाठी 135 मीटरची दर्शक दिर्घा आहे. एकावेळी 200 लोक या ठिकाणी बसू शकतात. नर्मदा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आर. एस. नीमाना यांनी शनिवारी 27 हजार लोकांनी स्मारकाला भेट दिल्याची माहिती दिली. रविवारी ही संख्या वाढेल अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
स्मारक कोणत्या वेळेत पाहू शकतो?
'स्टॅच्यू ऑफ यूनिटी' लोकांसाठी दररोज सकाळी 9 ते सांयकाळी 6 वाजेपर्यंत खुलं असेल. येथे जाण्यासाठी ऑनलाइन बुकींग ही करु शकतात. त्यासाठी https://www.soutickets.in या वेबसाईटवर टिकीट बुक करु शकतात. जगातील सर्वात उंच पुतळ्यात अनावरण होताच, पहिल्या दोन दिवसांच्या सर्व तिकीटांची विक्री झाली आहे.
तिकीटदर काय असेल?
15 वर्षाखालील मुलांसाठी 60 रुपये तर प्रौढांसाठी 120 रुपये तिकीट आकारला जाणार आहे. तर स्टॅच्यूच्या दोन्ही बाजु पाहण्यासाठी 350 रुपये तिकीट असेल. तर बसने स्टॅच्यूपर्यंत पोहचण्यासाठी 30 रुपये तिकीट असणार आहे.
संबधित बातम्या - पटेल यांच्यात कौटिल्याची कूटनीती, छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य : नरेंद्र मोदी
33 महिन्याच्या कालावधीत पुर्ण झाला स्टॅच्यू ऑफ यूनिटी
जगातील सर्वात उंच असलेल्या स्टॅच्यू ऑफ युनिटीचं काम 33 महिन्यात पुर्ण झाला आहे. जमीनीपासून 182 मिटर उंचीचा असलेली सरदार पटेलांचा पुतळा चीनमधील स्प्रिंग मंदिरातील बुद्धाची मूर्ति आणि अमेरिकेतील स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा उंच आहे
संबधित बातम्या - स्टॅच्यू ऑफ युनिटीसारखाच रामाचा भव्य पुतळा अयोध्येत उभा राहणार?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
करमणूक
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
