एक्स्प्लोर

गोवा काँग्रेसचे दोन आमदार भाजपच्या विमानात, मध्यरात्री राजकीय हालचाली

मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची प्रकृती स्थिर असली तरी त्यांचा आजार गंभीर असल्याने भाजपा आणि सत्ताधारी आघाडीतूनही पर्यायी नेतृत्वाचा शोध सुरु झाला आहे.

पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर आजारी असल्याने गोव्यात आता नेतृत्वबदलाची चर्चा सुरु झाली आहे. काँग्रेसने काल दिवसभर विधीमंडळ गटाच्या बैठकीच्या नावाखाली काँग्रेस आमदारांना एकत्र ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न केला असला, तरी काँग्रेसचे किमान दोन आमदार गळाला लावण्यात आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यशस्वी झाले आहेत. भाजप श्रेष्ठींसमोर काँग्रेसच्या आमदारांना चर्चेला नेण्यासाठी रात्री 9.30 च्या विमानाने राणे दिल्लीला रवाना झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यानंतर काँग्रेसचे मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे आणि शिरोड्याचे आमदार सुभाष शिरोडकर हे आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्यासह मध्यरात्रीच्या विमानाने दिल्लीला रवाना झाले. मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची प्रकृती स्थिर असली तरी त्यांचा आजार गंभीर असल्याने भाजपा आणि सत्ताधारी आघाडीतूनही पर्यायी नेतृत्वाचा शोध सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांच्यासोबत गोव्यातील काँग्रेसचे दोन आमदार काल मध्यरात्री भाजप श्रेष्ठींच्या भेटीसाठी दिल्लीला रवाना झाल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. गोव्याला नव्या मुख्यमंत्र्यांची तातडीने गरज आहे, याची कल्पना गोवा फॉरवर्ड पक्ष आणि मगोप यांनाही आली आहे. सरकारमधील तीन मंत्री 17 किंवा 18 रोजी दिल्लीत भाजपाध्यक्ष अमित शहा यांना भेटून राजकीय स्थिती त्यांच्यासमोर ठेवतील.  पर्रिकर दोनापावल येथील निवासस्थानी आहेत. ते 24 तास डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. सत्तेतील घटक पक्ष पर्यायी मुख्यमंत्री कोण असेल, याची चर्चा करीत आहेत. या शर्यतीत आरोग्यमंत्री विश्वजित राणे पुढे आहेत. मात्र, मगोपचे मंत्री सुदिन ढवळीकर यांची त्यांना मंजुरी नसल्याचे समजते.  गोवा फॉरवर्डचे नेते आणि मंत्री विजय सरदेसाई यांचा राणे यांना पाठिंबा असल्याचे सांगितले जात आहे. राणे हे काँग्रेसमधून आलेले असल्याने त्यांचे समर्थक आमदारही भाजपच्या वाटेवर आहेत. सुभाष शिरोडकर आणि दयानंद सोपटे हे काँग्रेसचे दोन आमदार आज दिल्लीमध्ये भाजप प्रवेश करण्याची शक्यता आहे. काँग्रेसकडे 16 आमदार आहेत. काँग्रेस सर्वात मोठा पक्ष असल्याने त्या पक्षाचे दोन आमदार फोडावेत, असा प्रयत्न भाजपा करीत आहे. सुभाष शिरोडकर आणि दयानंद सोपटे यांच्यासाठी भाजपाने पायघड्या टाकल्या आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी  काल राष्ट्रपतींच्या कार्यालयाला निवेदन सादर करून, काँग्रेसला सरकार स्थापनेची संधी द्यावी, परस्पर विधानसभा करु नये, अशी मागणी केली असली तरी काँग्रेसचे संख्याबळ घटवून त्यांच्या विरोधाची धार कमी करण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. त्याचच भाग म्हणून आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी काँग्रेसच्या दोन्ही आमदारांना नियोजनबद्धरित्या रात्री दिल्लीला नेले. स्वत: राणे हे 9.30 च्या विमानात बसले. त्यानंतर 10 वाजता दिल्लीला जाणाऱ्या दुसऱ्या विमानाचे तिकीट सोपटे यांच्या नावे होते. विमानाकडे जाण्याच्या गेट बंद होण्याच्या वेळी सोपटे यांचे नाव तीनवेळा पुकारण्यात आले. पण सोपटे तेथे पोहोचले नाहीत. शेवटी रात्री 11 च्या सुमारास सोपटे विमानतळावर पोहोचले. त्यानंतर सुमारे 15 मिनिटांनी शिरोड्याचे आमदार सुभाष शिरोडकर दिल्लीला जाण्यासाठी विमानतळावर पोहोचले. त्याच विमानाने दिल्लीला जाण्यासाठी थोड्या वेळात आयुषमंत्री श्रीपाद नाईकही विमानतळावर दाखल झाले. दरम्यान, सध्या भाजपकडे 14, तर काँग्रेसकडे 16 आमदार आहेत. गोवा फॉरवर्ड आणि मगोकडे प्रत्येकी 3 आमदार आहेत. तसेच सत्तेत सध्या 3 अपक्ष आमदार आहेत. सत्ताधारी गटाचे सध्याचे संख्याबळ 23 आहे. येत्या दोन दिवसांत नेतृत्व बदल झाल्यानंतर बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपला वेळ दिल्यानंतरही भाजपचे 3 आमदार विधानसभेत उपस्थित राहण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे सत्ताधारी गटाचा आकडा 20 पर्यंत खाली येईल. दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे दोन आमदार कमी झाल्यास 14 आमदार शिल्लक राहतील. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चर्चिल आलेमाव जमेस धरून एकूण 15 जण विरोधात असू शकतात. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी 17 रोजी दिल्लीत बैठक बोलाविली आहे. या बैठकीला आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, नगर नियोजनमंत्री विजय सरदेसाई आणि सार्वजनिक बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांना आमंत्रित करण्यात आले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर हे देखील या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. बैठकीत नेतृत्व बदलाबाबत महत्त्वपूर्ण चर्चा होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना रविवारी दिल्लीतून एम्स इस्पितळातून घरी पाठविण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव रूपेश कामत यांनी जारी केलेल्या पत्रकात मात्र पर्रिकरांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. पर्रिकरांनी सोमवारी आपल्या कुटुंबीयांसोबत संवाद साधल्याचेही त्यांनी पत्रकात म्हटले आहे. संबंधित बातम्या  मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर गोव्यात परतले  GOA Assembly Election Result 2017: गोवा निवडणूक निकाल 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Pune Gang Rape : पुण्यात धनदांडग्या बापांच्या पोरांच्या विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
पुण्यात विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
Pune Crime News: फिल्मी स्टाईलने गुन्हेगाराला अटक करायला गेले पण...; आरोपीने पिंपरीच्या एपीआयच्या अंगावर घातली कार, जयपूरमधील थरार CCTVमध्ये कैद
फिल्मी स्टाईलने गुन्हेगाराला अटक करायला गेले पण...; आरोपीने पिंपरीच्या एपीआयच्या अंगावर घातली कार, जयपूरमधील थरार CCTVमध्ये कैद
भारतात कापसाचं सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होतं? महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक उत्पादन?
भारतात कापसाचं सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होतं? यादीत महाराष्ट्राचा नंबर कितवा?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोलाDevendra Fadanvis Shirdi Speech : साईनगरीत लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम; देवेंद्र फडणवीस यांचं भाषणPrashant Bamb Sambhajinagar : अजितदादांचे आमदारानं विरोधात शड्डू ठोकला, प्रशांत बंब काय म्हणाले?Yogesh Kadam Ratnagiri : माझ्यासमोर कोणतंच आव्हान नाही, मी विधानसभेला निवडून येणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Pune Gang Rape : पुण्यात धनदांडग्या बापांच्या पोरांच्या विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
पुण्यात विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
Pune Crime News: फिल्मी स्टाईलने गुन्हेगाराला अटक करायला गेले पण...; आरोपीने पिंपरीच्या एपीआयच्या अंगावर घातली कार, जयपूरमधील थरार CCTVमध्ये कैद
फिल्मी स्टाईलने गुन्हेगाराला अटक करायला गेले पण...; आरोपीने पिंपरीच्या एपीआयच्या अंगावर घातली कार, जयपूरमधील थरार CCTVमध्ये कैद
भारतात कापसाचं सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होतं? महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक उत्पादन?
भारतात कापसाचं सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होतं? यादीत महाराष्ट्राचा नंबर कितवा?
Devendra Fadnavis Office Attack: फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणाऱ्या महिलेचं नाव उघड करण्यास नकार,  'त्या' पोलिसांचीही चौकशी होणार?
पर्स आतमध्ये राहिल्याचे कारण सांगून मंत्रालयात शिरली, त्या महिलेने फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर काय-काय तोडलं?
Pune Crime News: पुण्यातील प्रोफेसरच्या मुलीवर सामूहिक अत्याचार, आरोपी बड्या बापाची मुलं,  धंगेकरांच्या पत्राने एकच खळबळ
पुण्यातील प्रोफेसरच्या मुलीवर सामूहिक अत्याचार, आरोपी बड्या बापाची मुलं, धंगेकरांच्या पत्राने एकच खळबळ
Hasan Mushrif on Satej Patil : सतेज पाटलांचा निकालानंतर भ्रमनिरास होईल, मंत्रिपद मिळालं नसल्याचं दुःख; हसन मुश्रीफांचा खोचक टोला
सतेज पाटलांचा निकालानंतर भ्रमनिरास होईल, मंत्रिपद मिळालं नसल्याचं दुःख; हसन मुश्रीफांचा खोचक टोला
Rajaram Sakhar Karkhana : कोजेनचा करंट आधीच लागलाय, प्रगती बघून बंटी घाबरलाय! वार्षिक सभेला राजाराम कारखाना सत्ताधारी अन् विरोधकांची पोस्टरबाजी
कोजेनचा करंट आधीच लागलाय, प्रगती बघून बंटी घाबरलाय! वार्षिक सभेला राजाराम कारखाना सत्ताधारी अन् विरोधकांची पोस्टरबाजी
Embed widget