एक्स्प्लोर
रिअॅलिटी शोमध्ये 'टॅलेंट' दाखवणाऱ्या तरुणाचा जळून मृत्यू
हैदराबाद : रिअॅलिटी शोमध्ये भाग घेण्यासाठी एका 19 वर्षीय तरुणाने केलेला स्टंट त्याच्या जीवावर बेतला आहे. तोंडात केरोसिन घेऊन आगीचा लोळ काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या हैदराबादच्या तरुणाचा उपचारादरम्यान हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.
एका रिअॅलिटी शोमध्ये स्वतःचं टॅलेंट दाखवण्याचा प्रयत्न संबंधित तरुण करणार होता. त्यासाठी तोंडातून आगीचे लोळ काढण्याचा व्हिडिओ तयार करण्याचा त्याचा मानस होता. शूटिंगसाठी त्याने शेजारच्या काही पोरांना गोळा केलं होतं. मात्र कुठल्याही शास्त्रशुद्ध प्रशिक्षणाशिवाय त्याने केलेला हा प्रयत्न त्याच्या चांगलाच अंगलट आला.
जलील उद्दीनने आधी स्वतःच्या तोंडात केरोसिन ओतून घेतलं. मात्र तो प्रयत्न फसल्यानंतर त्याने स्वतःच्या अंगावर केरोसिन ओतून जाळून घेण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती हाताबाहेर गेल्याचं लक्षात आल्यावर आजूबाजूच्या मुलांनी पळ काढला. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारांदरम्यान तीन दिवसांनी त्याचा मृत्यू झाला.
विशेष म्हणजे कुटुंबीयांना मुलाच्या इच्छेबाबत कोणतीही कल्पना नव्हती. मृत्यूपूर्वी जलीलने या प्रकाराला आपणच जबाबदार असल्याचं पोलिसांना लिहून दिलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement