Health Tips | आल्याचा चहा पिताय? उद्भवू शकतात 'या' समस्या
आल्याचे अनेक औषधी फायदे आहेत. व्हिटॅमिन ए, सी, ई आणि बी-कॉम्प्लेक्सचा एक उत्तम स्त्रोत म्हणून आलं ओळखलं जातं. त्याचबरोबर मॅग्नेशिअम, फॉस्फरस, आर्यन, झिंक, कॅल्शिअम आणि बीटा कॅरेटीन मुबलक प्रमाणात असतात.
Health Tips : आल्याचा चहा पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. आल्याचा आहारात समावेश केल्यानं स्नायूंना होणाऱ्या वेदनांपासून सुटका होते. तसेच शरीराची सूज कमी करण्यासाठीही मदत होते. याव्यतिरिक्त गरोदर महिलांना होणारा अॅसिडीटीचा त्रास आणि उलटी यांसारख्या समस्या दूर करण्यासाठीही मदत होते. वजन कमी होणं, रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि हृदयाचं आरोग्य राखण्यासाठीही आल्याचा चहा फायदेशीर ठरतं.
आल्याचे अनेक औषधी फायदे आहेत. व्हिटॅमिन ए, सी, ई आणि बी-कॉम्प्लेक्सचा एक उत्तम स्त्रोत म्हणून आलं ओळखलं जातं. त्याचबरोबर मॅग्नेशिअम, फॉस्फरस, आर्यन, झिंक, कॅल्शिअम आणि बीटा कॅरेटीन मुबलक प्रमाणात असतात. तसेच आल्यात अॅन्टीफंगल, अॅन्टीबॅक्टेरिअल आणि अॅन्टीवायरल गुणधर्म भरपूर असतात. पण आरोग्यासाठी फायदेशीर असणाऱ्या याच आल्याच्या अतिसेवनामुळे अनेक समस्यांचाही सामना करावा लागू शकतो.
Jaggery Tea Benefits | जाणून घ्या गुळाचा चहा पिण्याचे फायदे आणि अतिसेवनामुळं होणारे तोटे- पोटाची जळजळ
अॅसिडीटीमुळे पोटात जळजळ होते. 2020 मधील सिस्टेमॅटिक रिव्ह्यूनुसार, संशोधकांनी पोटात होणारी जळजळ गंभीर साईड-इफेक्ट्समुळे होत असल्याचं स्पष्ट केलं. दरम्यान, याआधी 2014 मध्ये करण्यात आलेल्या संशोधनानुसार, 1 ग्रॅम ते 1.5 ग्रॅमपर्यंत आल्याचं दररोज सेवन केल्यानं पोटातील समस्या दूर करण्यासाठी मदत होऊ शकते. परंतु, 2020 मधील संशोधनात आल्याच्या अधित सेवनाने पोटात जळजळ होत असल्याचं निष्पन्न झालं आहे.
- पचनक्रिया सुरळीत न होणं
नॅशनल सेंटर फॉर कम्पलेमेंट्री अॅन्ड इंटेगरेटिव्ह हेल्थच्या रिसर्चमध्ये सांगण्यात आल्यानुसार, आलं पोटदुखी, गॅस, ब्लोटिंग आणि इतर पोटाच्या अनेक समस्यांचं कारण ठरू शकतं.
- ब्लिडिंग
आल्याच्या सेवनाने रक्तस्त्राव वाढू शकतो. असं होण्यामागील कारण म्हणजे, आलं प्लेटलेट थ्रोम्बोक्सेनला रोखतं. चिंतेचा विषय म्हणजे रक्त पातळ करणाऱ्या औषधांसोबत आल प्रतिक्रिया करु शकतं. तसेच अनेकदा शस्त्रक्रिया करण्यापूर्वी रुग्णांना आल्याचं सेवन करणं टाळण्याचा सल्ला दिला जातो.
- दिवसभरात जास्त प्रमाणात आल्याचा चहा प्यायल्यानं अस्वस्थता आणि झोप न येण्याची समस्या उद्भवू शकते. झोपण्याअगोदर आल्याचा चहा प्यायल्यानं छातीत जळजळ होण्याची शक्यता असते.
- आल्याच्या चहाचं अधिक सेवन केल्याने पोटात अॅसिडची होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुमची पचनक्रिया खराब होऊ शकते. आल्याचा चहा वारंवार पिल्याने जळजळ, डायरिया आणि मळमळ होण्याची समस्या होऊ शकते.
- सकाळी अनोशापोटी आल्याचा चहा पिल्याने पोट बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे सकाळी आल्याचा चहा घेणं टाळा.
- Jaggery Tea Benefits | जाणून घ्या गुळाचा चहा पिण्याचे फायदे आणि अतिसेवनामुळं होणारे तोटे
- Weight Loss | वजन वाढलंय? उपाय शोधताय?, 'हा' सोपा उपाय ट्राय करा
- Weight Loss: आता शरीराचं वाढलेलं वजन कमी करणार 'जपानी वॉटर थेरपी'
- सॅनिटायजरच्या चुकीच्या वापराने मुलं होऊ शकतात अंध! अभ्यासातून माहिती समोर
- वजन कमी करायचंय?; दररोज करा आवळ्याच्या ज्यूसचं सेवन, होतील फायदेच फायदे
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )