अर्धनग्न कपडे, प्रायव्हेट पार्ट दाखवत अश्लील हावभाव; VIDEO व्हायरल होताच 3 पोलीस निलंबित
Shocking Incident in Gariyaband: गरियाबंद जिल्ह्यातील उरमल गावात आयोजित ऑर्केस्ट्रा कार्यक्रमात अश्लील नृत्य व्हायरल झाले.

Shocking Incident in Gariyaband: छत्तीसगडच्या गरियाबंद जिल्ह्यातून एक खळबळ उडवणारी बातमी समोर येत आहे. एका अश्लील व्हायरल व्हिडिओमुळे प्रशासन आणि पोलीस यंत्रणेच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सोशल मीडियावर एक अश्लील व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओत काही महिलांनी अश्लील नृत्य सादर केले. दरम्यान, या कार्यक्रमावेळी उपविभागीय अधिकारी (एसडीओ) आणि पोलीस अधिकाऱ्यांची उपस्थिती दिसून आली. पोलीस उपस्थित राहूनही त्यांनी या कार्यक्रमावर आक्षेप घेतलेला नाही. या प्रकरणी प्रशासनाने कठोर कारवाई केली असून, एका एसडीओला त्यांच्या पदावरून हटवण्यात आले. तर, तीन पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले असल्याची माहिती आहे. महिलांच्या या अश्लील नृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
ही घटना गरियाबंद जिल्ह्यातील देवभोग पोलीस स्टेशन हद्दीतील उरमल गावातून उघडकीस आली आहे. गेल्या आठवड्यात या भागात ऑर्केस्ट्रा संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाले. या कार्यक्रमात ओडीशातील काही बार डान्सर्सनी अश्लील नृत्य सादर केले. या कार्यक्रमासाठी मैनपूरचे एसडीएम तुलसीदास मरकम यांची परवानगी घेण्यात आली होती, अशी माहिती आहे.
नर्तकांनी स्टेजवर अर्धनग्न कपडे घालून अश्लील नृत्य सादर केले. कार्यक्रमात एसडीएम तुलसीदास मरकम आणि अनेक पोलिस अधिकारी उपस्थित होते. त्यांनी 5 ते 10 जानेवारीपर्यंत या कार्यक्रमासाठी परवानगी दिली होती. दरम्यान, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाने त्वरित कारवाई केली. गरियाबंदचे जिल्हाधिकारी भगवान सिंह उईके यांनी एसडीएम तुलसीदास मरकम यांना त्यांच्या पदावरून हटवले.
व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांवर कारवाई
गरियाबंदमध्ये एसडीएम तुलसीदास मरकम यांच्या उपस्थितीत झालेल्या अश्लील नृत्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाने त्वरित कारवाई केली. गरियाबंदचे जिल्हाधिकारी भगवान सिंह उईके यांनी एसडीएम तुलसीदास मरकम यांना त्यांच्या पदावरून हटवले. तसेच एसडीएमविरुद्ध चौकशी समिती स्थापन करण्यात आली असून, आजपासून चौकशीला सुरूवात होईल. याशिवाय, तीन पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. हेड कॉन्स्टेबल दिलोचन रावते, कॉन्स्टेबल शुभम चौहान आणि कॉन्स्टेबल जय कंसारी यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती आहे. त्यांच्याविरोधात विभागीय कारवाई सुरू करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
भारतरत्न भूपेन हजारिका यांच्या बंधूंचे निधन; मृत्यू नेमका कशामुळे झाला? कुटुंबानं सांगितलं कारण
























