एक्स्प्लोर

भारतरत्न भूपेन हजारिका यांच्या बंधूंचे निधन; मृत्यू नेमका कशामुळे झाला? कुटुंबानं सांगितलं कारण

Samar Hazarika Dies After Prolonged Illness: सुप्रसिद्ध आसामी संगीतकार समर हजारिका यांचे वयाच्या ७५व्या वर्षी निधन.

Samar Hazarika Dies After Prolonged Illness: मनोरंजनसृष्टीतून एक दुख:द बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध गायक भूपेन हजारिका यांचे धाकटे भाऊ आणि सुप्रसिद्ध आसामी संगीतकार समर हजारिका यांचे मंगळवारी निधन झाले. वयाच्या 75 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील काही महिन्यांपासून ते आजारपणाशी झुंज देत होते, अशी माहिती कुटुंबियांनी दिली. नुकतेच त्यांना उपचारानंतर  रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आले होते.  दरम्यान, मंगळवारी त्यांची प्रकृती पुन्हा खालवली. त्यांचा या आजारपणातच मृत्यू झाला.   त्यांच्या निधनानंतर सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. 

समर हजारिका सर्वात लहान

समर हजारिका यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. समर हजारिका हे 10 भावंडांपैकी सर्वात लहान होते. त्यांच्या निधनानंतर आसामी संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे.  अनेक कलाकार आणि चाहत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

कुटुंबाचा समृद्ध संगीत वारसा पुढे नेण्यात त्यांचा मोलाचा वाटा

समर हजारिका यांनी आपल्या कारकि‍र्दीत  रेडिओ, अल्बम तसेच  चित्रपटांसाठी असंख्य गाणी गायली, तसेच संगीतही दिले. कुटुंबाचा समृद्ध संगीत वारसा पुढे नेण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी विशेषत: आपल्या मोठ्या भावाचा भारतरत्न डॉ. भूपेन हजारिका यांचा वैचारिक आणि सांस्कृतिक वारसा पुढे नेला. संगीत विश्वात त्यांचे खूप मोठे योगदान आहे. संगीत विश्वातील दिग्गजांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. 

मुख्यमंत्र्यांकडून पोस्टद्वारे शोक व्यक्त

केवळ सिनेसृष्टी नाही तर, राजकीय वर्तुळातूनही त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.  आसामचे मुख्यमंत्री  हिमंता बिस्वा सरमा यांनी समर हजारिका यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलंय. त्यांनी ट्विटरमध्ये पोस्ट करून दुःख व्यक्त केलं आहे. "समर हजारिका यांच्या भावपूर्ण आवाजाने प्रत्येक प्रसंग उजळून निघाला होता. त्यांचे आसामच्या सांस्कृतिक आणि संगीत विश्वात खूप मोठे योगदान आहे. डॉ. भूपेन हजारिका यांचा समृद्ध वारसा पुढे नेण्यात समर हजारिका यांचा मोठा वाटा होता.

भूपेन हजारिकांची जन्मशताब्दी साजरी करण्याच्या  आमच्या प्रयत्नांमध्येही त्यांचे अत्यंत मोलाचे योगदान होते", अशी  भावना मुख्यमंत्र्यांनी पोस्टद्वारे व्यक्त केली. त्यांच्या निधनानंतर संगीत विश्वात एक पोकळी निर्माण झाली असल्याचं बोललं जात आहे. 

 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

क्रिकेटच्या 'देवा'सोबत बॉलिवूडच्या शहंशाहची जुंपली; फिंगर क्रिकेटमध्ये रंगला मजेशीर सामना, नेमकी कुणी मारली बाजी?

'सैराट'चा परशा राजकीय मैदानात उतरणार? आकाश ठोसर लातूरच्या काँग्रेस रॅलीमध्ये, PHOTO व्हायरल

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Yetech Aata Mi Naandayla: '50 ATKT अन् गावभर लागले नापासाचे होर्डिंग्ज' अभिनेता हर्षद अतकारीने सांगितला मजेशीर किस्सा
'50 ATKT अन् गावभर लागले नापासाचे होर्डिंग्ज' अभिनेता हर्षद अतकारीने सांगितला मजेशीर किस्सा
Kedar Shinde on Kombdi Palali: 'कोंबडी पळाली' गाणं शूटसाठी माझ्याकडे नव्हते पैसे, भरत मदतीला धावला, तुफान नाचला; केदार शिंदेंनी सांगितला भन्नाट किस्सा
'कोंबडी पळाली' गाणं शूटसाठी माझ्याकडे नव्हते पैसे, भरत मदतीला धावला, तुफान नाचला; केदार शिंदेंनी सांगितला भन्नाट किस्सा
Bigg Boss 20 Actress: 'बिग बॉस 20'फेम अभिनेत्रीचा शॉकिंग खुलासा, चुलत भावानेच 'नको तिथे स्पर्श केला'; प्रेग्नेंसीच्या भीतीने खाल्ली पपई
'बिग बॉस 20'फेम अभिनेत्रीचा शॉकिंग खुलासा, चुलत भावानेच 'नको तिथे स्पर्श केला'; प्रेग्नेंसीच्या भीतीने खाल्ली पपई
Genelia and Riteish Deshmukh: 'मी तुझ्या बाबांच्या कुशीत रडले'; जेनेलिया देशमुखची हृदयस्पर्शी पोस्ट, लेकाचा फोटो शेअर करत म्हणाली...
'मी तुझ्या बाबांच्या कुशीत रडले'; जेनेलिया देशमुखची हृदयस्पर्शी पोस्ट, लेकाचा फोटो शेअर करत म्हणाली...

व्हिडीओ

Pune Shivajinagar Court Incident: पुण्यात गोळीबार, हल्लेखोर किती? कसं घडलं? प्रत्यक्षदर्शी म्हणाले..
Kurla Phoenix Mall Madrasa Reality Check Mumbai News: मारहाण करणारी मुलं कुठून आली? कुर्ल्यातील 'त्या' मदरशाचा रियालिटी चेक
Anjali Ambedkar vs Sharad Pawar : 'बी टीम'वरून पलटवार 'वंचित'च्या टार्गेटवर पवार Special Report
Devendra Fadnavis Koyna Dam Water : मुंबईसाठी कोयनेचं पाणी,पाठिंबा आणि गाऱ्हाणी Special Report
Sanjay Raut : प्रकाश आबिटकर हे देखील त्यावेळी परत येऊ इच्छित होते, संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar : मोठी बातमी : देवेंद्र फडणवीसांना पुण्याचं पालकमंत्री केलं तर आणखी वाटोळं होईल, रोहित पवारांचा घणाघात
मोठी बातमी : देवेंद्र फडणवीसांना पुण्याचं पालकमंत्री केलं तर आणखी वाटोळं होईल, रोहित पवारांचा घणाघात
Sharad Pawar Health: शरद पवार ब्रीच कैंडी रुग्णालयात दाखल, प्रफुल पटेल पुन्हा भेटीला; रोहित पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया
शरद पवार ब्रीच कैंडी रुग्णालयात दाखल, प्रफुल पटेल पुन्हा भेटीला; रोहित पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया
पुण्यातील गोळीबार, मारहाणप्रकरणी सुनावणी; आरोपींना 6 दिवसांची पोलीस कोठडी, कोर्टात दोन्ही वकिलांचा युक्तिवाद
पुण्यातील गोळीबार, मारहाणप्रकरणी सुनावणी; आरोपींना 6 दिवसांची पोलीस कोठडी, कोर्टात दोन्ही वकिलांचा युक्तिवाद
मुख्यमंत्री होऊन पुढच्या वर्षी आषाढीला पंढरपुरात पूजा करावी; ज्योती वाघमारेंकडून पुन्हा एकनाथ शिंदेंच्या CM पदाचं वक्तव्य
मुख्यमंत्री होऊन पुढच्या वर्षी आषाढीला पंढरपुरात पूजा करावी; ज्योती वाघमारेंकडून पुन्हा एकनाथ शिंदेंच्या CM पदाचं वक्तव्य
Mumbai Mahim Firing Case: माहीम गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट; बिश्नोई गँगकडून धमकी देत 10 कोटींच्या खंडणीची मागणी; ज्वेलर्सचा खळबळजनक दावा
माहीम गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट; बिश्नोई गँगकडून धमकी देत 10 कोटींच्या खंडणीची मागणी; ज्वेलर्सचा खळबळजनक दावा
Rajgurunagar Accident CCTV: राजगुरुनगरजवळील राक्षेवाडीत एसटीला ओव्हरटेक करताना गाडी घसरली, चाकाखाली चिरडली गेली अन्..., एमपीएससी विद्यार्थिनीचा मृत्यू; अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद
राजगुरुनगरजवळील राक्षेवाडीत एसटीला ओव्हरटेक करताना गाडी घसरली, चाकाखाली चिरडली गेली अन्..., एमपीएससी विद्यार्थिनीचा मृत्यू; अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारची नवी योजना; 1 लाख रिक्षा वाटप करणार, प्रताप सरनाईकांनी दिली माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारची नवी योजना; 1 लाख रिक्षा वाटप करणार, प्रताप सरनाईकांनी दिली माहिती
Sharad Pawar: शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; सुप्रिया सुळेंनी दिली माहिती, म्हणाल्या, बाबांची तब्येत ठीक आहे
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; सुप्रिया सुळेंनी दिली माहिती, म्हणाल्या, बाबांची तब्येत ठीक आहे
Embed widget