धक्कादायक! बेपत्ता युवकाचा विहिरीत आढळला मृतदेह, वाशिम जिल्ह्यात खळबळ, पोलीस घटनास्थळी दाखल
वाशिम जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. बेपत्ता युवकाचा एका विहिरीत मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली आहे. दुर्गेश माहोरे असं या 32 वर्षीय युवकाचं नाव आहे.
Washim News : वाशिम जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. बेपत्ता युवकाचा एका विहिरीत मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली आहे. दुर्गेश माहोरे असं या 32 वर्षीय युवकाचं नाव आहे. वाशिमच्या कारंजा शहरातील खाटीकपुरा परिसरातील हा रहवासी होता. शहरालगतच्या विहिरीत मृतदेह आढळून आला आहे. दरम्यान, या मृत्यूबाबत अद्याप अधिकची माहिती मिळाली नाही. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली
दुर्गेश माहोरे काल पासून बेपत्ता होता. कुटुंबियांने शोधाशोध केली असता दुर्गेश आढळून न आल्याने आज शोध सुरू असताना आज दुपारी शहराजवळ परिसरातील विहिरीत त्यांचा मृतदेह एका व्यक्तीला आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह बाहेर काढून पुढील तपासासाठी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. या प्रकरणी शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. मृत्यूचे नेमके कारण मात्र कळू शकले नाही.
2 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा इटियाडोह जलाशयात मृतदेह आढळला, धुळवडीच्या दिवसापासून तरुण होता बेपत्ता
Before You Go
Crime Patrol Style Theft Special Report : 'क्राईम पेट्रोल' पाहून रचला चेन स्नॅचिंगचा कट; पोलिसांनी मुसक्या आवळल्या
महत्त्वाच्या बातम्या























