एक्स्प्लोर

येवल्यात आंदोलकांची पोलिसांवर दगडफेक, पोलिसांकडून हवेत गोळीबार

मनमाड : नाशिक जिल्ह्यातील येवल्यात पिंपळगाव जलाल टोलनाका परिसरात पोलिसांवर दगडफेक करण्यात आली आहे. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी हवेत केलेल्या गोळीबारात एक जखमी झाला आहे, तर दगडफेकीत चार ते पाच पोलीस जखमी झाले आहेत. सध्या या परिसरात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी आज 1 जूनपासून संपाचं हत्यार उपसलं आहे. आज येवल्याजवळील पिंपळगाव जलाल टोलनाक्याजवळ सकाळपासून शेतमालाच्या गाड्या अडवून त्यातील तांदूळ गहू हरभरा हा माल रस्त्यावर फेकला जात होता. दुपारनंतरही हा प्रकार सुरुच राहिला. हा सर्व प्रकार करणारे स्वत:ला शेतकरी भासवून लूट करत होते. पोलिसांनी लूट करणाऱ्यांना आटकाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. अखेर पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी हवेत गोळीबार केला. यात एक व्यक्ती जखमी झाला आहे. दरम्यान सकाळपासून बंद असलेला मनमाड येवला मार्ग बंद होता. संध्याकाळी उशिरा हा रस्ता सुरु करण्यात आला. याठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मात्र अजून अवजड वाहनं सोडली जात नाहीत. मनमाड ते येवला किंवा कोपरगावपर्यंतच्या ढाब्यावर शेतमालानं भरलेले ट्रक थांबवण्यात आले आहेत. या टोलनाक्यावर सकाळपासून रस्त्यांवर लूट करुन शेतमालाचं नुकसान करण्यात आलं आहे, तर शंभरहून अधिक गाड्यांची तोडफोडही करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 12 August 2026: आजची आषाढ अमावस्या 7 राशींसाठी भाग्याची! दुर्मिळ शुभ योग जुळले, विठुरायाच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजची आषाढ अमावस्या 7 राशींसाठी भाग्याची! दुर्मिळ शुभ योग जुळले, विठुरायाच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शिंदे-फडणवीसांनी चूक सुधारावी, अन्यथा कधी न बघितलेले दिवस बघावे लागतील; मनोज जरांगे पुन्हा भडकले
शिंदे-फडणवीसांनी चूक सुधारावी, अन्यथा कधी न बघितलेले दिवस बघावे लागतील; मनोज जरांगे पुन्हा भडकले
Tukaram Mundhe FDA : तुकाराम मुंढेंचा औषध कंपन्यांवर हातोडा! 'या' 10 आयुर्वेदिक कंपन्यांचा परवाना कायमस्वरुपी रद्द
तुकाराम मुंढेंचा औषध कंपन्यांवर हातोडा! 'या' 10 आयुर्वेदिक कंपन्यांचा परवाना कायमस्वरुपी रद्द

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget