एक्स्प्लोर

पोटात अन्न, ⁠अंगावर गरम वस्त्र नसताना मराठे देशासाठी लढले; त्यावेळी एक असतो तर सेफ असतो; पानिपतच्या रणभूमीवर देवेंद्र फडणवीसांचे वक्तव्य

Devendra Fadnavis: ⁠पोटात अन्न नसताना थंडीत अंगावर गरम वस्त्र नसताना मराठे लढले. त्यावेळी आम्ही एक असतो तर सेफ असतो असे गौरद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पानिपतच्या रणभूमीवरुन केले आहे. 

Devendra Fadnavis पानिपत: छत्रपती शिवाजी महाराजांनी या देशाचा इतिहास बदलला आहे. शिवाजी महाराजांना आई जिजाऊनी संस्कार दिले. ⁠शिवाजी महाराज राजा होण्यासाठी नाही तर देश धर्मासाठी लढले. ⁠शिवाजी महाराजांनी जाती पाती विसरून सर्वांना एकत्र केलं. त्यांनी मुघलांना पराजित करून स्वराज्य स्थापन केलं. ⁠आमचं हिंदू स्वराज्य, मराठी स्वराज्य त्यानंतर कधीही थांबलं नाही. मराठ्यांनी सगळ्या देशावर साम्राज्य स्थापन केलं. किंबहुना शिवाजी महाराज नसते तर संस्कृती, संस्कार देशात उरले नसते. ⁠मराठ्यांकडे मुलुख होता पण तरीही ते लढले. अब्दाली उत्तरेत राज्य करेल. परंतु मराठ्यांनी संकुचित विचार केला नाही. ⁠मराठ्यांनी मातृभूमीचा विचार केला. ⁠पोटात अन्न नसताना थंडीत अंगावर गरम वस्त्र नसताना मराठे लढले. त्यावेळी आम्ही एक असतो तर सेफ असतो असे गौरद्गार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis)पानिपतच्या रणभूमीवरुन केले आहे. 

पानिपतच्या लढाईत मराठ्यांनी गाजवलेल्या पराक्रमाची आठवण म्हणून आज पानिपत युद्ध स्मारकावर शौर्य दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला  राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आणि अन्य प्रमुख पाहुण्यांनी उपस्थिती लावली. यावेळी बोलताना फडणवीसांनी हे वक्तव्य करत इतिहासातील पराक्रमाला उजाळा दिला आहे.

आपल्याला विभाजित करणाऱ्यांपासून सावध रहा- देवेंद्र फडणवीस

पानिपतच्या लढाईत लाखोंची कत्तल झाली. आम्ही मोहीम हरलो, लढाई मात्र जिंकलो. ⁠दहा वर्षात महादजी शिंदेंनी भगवा फडकवला, ⁠मराठ्यांनी देशात हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. मात्र ⁠त्यावेळी आम्ही एक असतो तर सेफ असतो, आमचं स्वप्न अखंड भारताचे होतं. त्यामुळे ⁠आपल्याला विभाजित करणाऱ्यांपासून सावध रहा. ⁠भविष्यात महाराष्ट्र सरकार इथे कार्यक्रमाचे आयोजन करेल. ⁠इथे शिवाजी महाराजांची प्रतिमा असली पाहिजे. हे केवळ मराठीचे राज्य नव्हते, तर संपूर्ण देशाचे हिंदवी स्वराज्य होते. ⁠गेल्यावर्षी इथे येण्याचा कार्यक्रम ठरवलेला, पण आयत्यावेळी रद्द झाला. ⁠बहुतेक वीरांची इच्छा होती उपमुख्यमंत्री नाही, मुख्यमंत्र्यांनेच इथे येऊन आम्हाला नमन केल पाहिजे. असेही देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले. 

हे ही वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! राज्यातील शाळांसाठी CBSE पॅटर्न; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय, शिक्षणमंत्र्यांची माहिती
मोठी बातमी! राज्यातील शाळांसाठी CBSE पॅटर्न; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय, शिक्षणमंत्र्यांची माहिती
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6PM 14 January 2025Walmik Karad Supporters: कराडवर लोकांचं प्रेम, परळी थांबलीय, कार्यकर्त्याने अंगावर पेट्रोल ओतलंAjit Pawar On Walmik Karad | दोषींवर योग्य ती कारवाई केली जाणार, मुंडेंबाबत प्रश्न अजितदादा म्हणाले...ABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 5PM 14 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! राज्यातील शाळांसाठी CBSE पॅटर्न; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय, शिक्षणमंत्र्यांची माहिती
मोठी बातमी! राज्यातील शाळांसाठी CBSE पॅटर्न; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय, शिक्षणमंत्र्यांची माहिती
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
मोठी बातमी! ST कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 खाटांचे रुग्णालय; परिवहन मंत्र्यांची घोषणा
मोठी बातमी! ST कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 खाटांचे रुग्णालय; परिवहन मंत्र्यांची घोषणा
Walmik Karad MCOCA : लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
Walmik Karad Mcoca: हिवाळी अधिवेशनात वात पेटवली अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
हिवाळी अधिवेशनात 'आका' 'आका' बोलत रान पेटवलं, अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
Walmik Karad MCOCA : वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Embed widget