एक्स्प्लोर
Advertisement
'अमृता माझ्या सांगण्याने काही करत नाहीत, त्यांचंही एक मत', देवेंद्र फडणवीसांकडून अमृतांची पाठराखण
एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत त्यांना अमृता फडणवीस यांच्याबद्दल प्रश्न विचारला होता. यावर बोलताना ते पुढे म्हणाले की, त्यांचंही मत आहे. एक व्यक्तिमत्व आहे. जाणीवपूर्वक टीकाही होईल. पण राजकीय जिवनात अशा गोष्टी सहन कराव्या लागतात, असे फडणवीस म्हणाले.
मुंबई : अमृता फडणवीस या माझ्या सांगण्याने काही करत नाहीत. मी सांगून थांबतही नाहीत. त्यांना खूप ट्रोल केलं गेलं असेल. त्यांचं ते वक्तव्य स्मारकावर टीका नव्हती. वृक्षतोडीवर ती प्रतिक्रिया होती, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी आपल्या पत्नीची पाठराखण केली आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत त्यांना अमृता फडणवीस यांच्याबद्दल प्रश्न विचारला होता. यावर बोलताना ते पुढे म्हणाले की, त्यांचंही मत आहे. एक व्यक्तिमत्व आहे. जाणीवपूर्वक टीकाही होईल. पण राजकीय जिवनात अशा गोष्टी सहन कराव्या लागतात, असे फडणवीस म्हणाले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या औरंगाबादेतील स्मारकासाठी झाडांची कत्तल होणार असल्याचं वृत्त येताच, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसांना शिवसेनेवर टीका केली होती. . प्रियदर्शनी मैदानात होणाऱ्या बाळासाहेबांच्या स्मारकासाठी हजारो झाडांची कत्तल होणार, असं समजताच अमृता फडणवीसांनी शिवसेनेला ढोंगी म्हणत, दलालीचा आरोप केला होता. यानंतर शिवसेना नेत्या प्रियंका चतुर्वेदींनीही त्याला प्रत्युत्तर दिलं होतं. बाळासाहेबांच्या स्मारकासाठी कोणतीही वृक्षतोड होणार नसल्याचं प्रियंका चतुर्वेदींनी स्पष्ट केलं आहे. Get Well Soon शिवसेना असे म्हणत अमृता फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका केली होती. हे फक्त कमिशनसाठी सुरू आहे. शिवसेनेचा ढोंगीपणा यातून समोर येतो असंही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं. यावरुन त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती.
'शिवसेनेला ढोंगीपणाचा आजार, गेट वेल सून' अमृता फडणवीस यांची टीका
यावर विचारल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी अमृता फडणवीस या माझ्या सांगण्याने काही करत नाहीत, असं म्हटलं आहे. सोबतच त्यांचंही मत आहे. एक वेगळं व्यक्तिमत्व आहे, असेही फडणवीसांनी म्हटलं आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाविषयीची माहिती
प्रकल्पाचा एकूण खर्च - 64 कोटी
उद्यानाचा परिसर - 17 एकर
पुतळ्यासाठी जागा - 1 हजार 135 चौरस मीटर
फुड पार्कसाठी जागा - 2 हजार 330 चौरस मीटर
म्युझियमसाठी जागा - 2 हजार 600 चौरस मीटर
ओपन एअर स्पेस - 3 हजार 690 चौरस मीटर
हे ही वाचा - Devendra Fadnavis Exclusive | आमच्यासोबत येण्याआधी अजित पवार शरद पवारांशी बोलले होते : देवेंद्र फडणवीस
प्रियदर्शनी उद्यानात हे सगळं उभं करायचं असेल तर किमान पाच हजार झाडं तोडावी लागतील, असे पर्यावरण तज्ज्ञांचे मत आहे. या मनमानीविरुद्ध पर्यावरण प्रेमींनी आवाज उठवला आहे. ग्रीन औरंगाबाद फोरमच्या माध्यमातून सकारात्मक आंदोलन सुरु झालं आहे. 6 वर्षांच्या मुलांपासून ते साठीतले आजोबाही झाडं वाचवण्यासाठी आंदोलनात सहभागी झाले. दरम्यान, उद्यान विभागाच्या कृपेनं भर उन्हात झाडं पाण्याअभावी काळी पडत होती, मरत होती. हे पाहून पर्यावरणप्रेमींनी वॉक अँड वॉटर (#WalkAndWater) हा अभिनव उपक्रम हाती घेतला. त्यामुळे अनेक झाडं वाचली.
हे ही वाचा - गोपीनाथ मुंडेंच्या स्मारकाबाबत खडसेंनी केलेला आरोप खोटा : देवेंद्र फडणवीस
दरम्यान, याप्रकरणी जनहित याचिका दाखल झाल्यानंतर मनपाने दुष्काळाचे कारण देत झाडं कमी झाल्याचे स्वतःच मान्य केले. पण याच कथित पाणी टंचाईच्या तीन वर्षांच्या काळात उद्यान विभागाने शहरात 66 हजार 69 झाडं लावली कशी? असा सवाल उपस्थित झाला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
सोलापूर
मुंबई
निवडणूक
Advertisement