Child Health : तुमच्या मुलांमध्ये लठ्ठ वाढतोय? धोकादायक आजार होण्याची शक्यता, 'या' आवश्यक सुधारणा करा
Child Health : लहान मुलांमधील लठ्ठपणा खूप धोकादायक ठरू शकतो. यामुळे अनेक गंभीर आजारांचा धोका वाढतो, यावर डॉक्टरांचं काय म्हणणं आहे? जाणून घेऊया..
Child Health : मुलांच्या वजनाची सर्वात जास्त चिंता पालकांना असते. कारण जर मुलांचे वजन कमी असेल तर पालक त्यांना विविध खाद्यपदार्थ देण्याचा प्रयत्न करतात. जेणेकरून त्यांचे वजन वाढेल. अंगाने धष्टपुष्ट मुलं दिसायला जरी चांगली दिसत असली, तरीसुद्धा जर तुमच्या मुलांमध्ये लठ्ठपणा वाढत चालला असेल तर येथे काळजी करण्याची गोष्ट आहे. कारण या लठ्ठपणामुळे विविध आजार होण्याची शक्यता असते. लहान मुलांमधील लठ्ठपणा खूप धोकादायक ठरू शकतो. यामुळे अनेक गंभीर आजारांचा धोका वाढतो
बालपणातील लठ्ठपणा ही एक गंभीर समस्या
बालपणातील लठ्ठपणा ही एक गंभीर समस्या आहे, जी खराब आहार आणि जीवनशैलीमुळे पसरत आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार (WHO), 2016 मध्ये, जगभरात 5 वर्षांखालील अंदाजे 41 दशलक्ष मुलं ही लठ्ठपणाने ग्रस्त होती. या मुलांमध्ये प्रामुख्याने शहरी भागात राहणाऱ्या मुलांचा समावेश होता. लठ्ठपणामुळे मुलांच्या आरोग्याची मोठी हानी होते. लठ्ठपणा हा अनेक गंभीर आणि प्राणघातक आजारांसाठी जोखमीचा घटक आहे, त्यामुळे याला वेळीच प्रतिबंध करणे चांगले. लठ्ठपणामुळे मुलांना कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते ते जाणून घेऊया.
अनेक गंभीर आजारांचा धोका वाढतो
लहान मुलांमधील लठ्ठपणा खूप धोकादायक ठरू शकतो. यामुळे अनेक गंभीर आजारांचा धोका वाढतो, यामुळे ते लहान वयातच लठ्ठपणाचे बळी ठरू शकतात. डॉक्टरांच्या मते, चांगली गोष्ट म्हणजे बालपणातील लठ्ठपणा टाळता येतो आणि कमीही करता येतो. यासाठी जीवनशैलीत अनेक महत्त्वाचे बदल करावे लागतील. या लेखात आपण लठ्ठपणामुळे मुलांमध्ये कोणत्या आजारांचा धोका वाढतो हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि ते कसे टाळता येईल याबद्दलही डॉक्टरांकडून माहिती घेण्यात आलीय.
लठ्ठपणामुळे कोणत्या आजारांचा धोका वाढतो?
हृदयाचे आजार- लठ्ठपणामुळे हृदयविकाराचा धोका अनेक पटींनी वाढतो. लठ्ठपणामुळे रक्तदाब आणि सूज वाढू लागते आणि हे दोन्ही घटक हृदयविकारांना आमंत्रण देतात. याव्यतिरिक्त, लठ्ठपणामुळे कोलेस्टेरॉलची पातळी देखील वाढते, ज्यामुळे रक्तवाहिन्या ब्लॉक होऊ शकतात आणि हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका लक्षणीय वाढतो. त्यामुळे लठ्ठपणामुळे मुलांमध्ये हृदयविकाराचा धोका खूप जास्त असतो.
मधुमेह- लठ्ठपणा हे मधुमेहाचे प्रमुख कारण आहे. लठ्ठपणाचा धोका असलेल्या मुलांमध्ये मधुमेहाचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो. मधुमेहामध्ये शरीरातील रक्तातील साखरेची पातळी वाढू लागते, ज्यामुळे शरीरातील इतर अवयव जसे की डोळे, यकृत, किडनी, नसा इत्यादींना इजा होऊ शकते. याव्यतिरिक्त, लठ्ठपणामुळे सूज देखील वाढते, ज्यामुळे इन्सुलिन संवेदनशीलता प्रभावित होते.
हाडांशी संबंधित समस्या- लठ्ठपणामुळे मुलांच्या सांध्यावर आणि हाडांवर खूप दबाव येतो, ज्यामुळे सांधेदुखीसारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे अनेकदा चालण्यात अडचण येते आणि हाडे जड होतात. इतकेच नाही तर लठ्ठपणामुळे व्हिटॅमिन डीची कमतरता देखील होऊ शकते, ज्यामुळे हाडे आणि स्नायू कमकुवत होऊ शकतात.
कर्करोगाचा धोका- लठ्ठपणामुळे अनेक प्रकारच्या कर्करोगाचा धोका देखील वाढतो, जसे की स्तनाचा कर्करोग, कोलन कर्करोग आणि एंडोमेट्रियल कर्करोग इ.
स्लीप ॲप्निया- लठ्ठपणामुळे घशाजवळही चरबी वाढते, त्यामुळे श्वसनमार्गातून हवा योग्य प्रकारे जाऊ शकत नाही आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. विशेषतः झोपेत असताना ही समस्या उद्भवते, ज्याला स्लीप एपनिया म्हणतात.
उच्च रक्तदाब : लठ्ठपणामुळे उच्च रक्तदाबाचा धोकाही वाढतो. त्यामुळे, लठ्ठ मुलांमध्ये उच्च रक्तदाबाचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो, ज्यामुळे मधुमेह आणि हृदयविकाराचा धोका वाढतो आणि ते अधिक गंभीर होऊ शकतात.
फॅटी लिव्हर : लठ्ठपणामुळे मुलांमध्ये फॅटी लिव्हरचा धोकाही वाढतो. लठ्ठपणामुळे यकृतामध्ये अतिरिक्त चरबी जमा होऊ लागते. त्यामुळे फॅटी लिव्हर आणि त्याच्याशी संबंधित इतर आजारही होऊ शकतात.
हेही वाचा>>>
Child Health : पालकांनो.. सुट्टीत मुलांना टीव्ही, मोबाईलपासून दूर ठेवायचंय? तर फक्त हे काम करा, जाणून घ्या
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )