Chhattisgarh Naxal: छत्तीसगडच्या अबूजमाडच्या जंगलात 46 लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या सहा माओवाद्यांना कंठस्नान; मोठ्या प्रमाणावर शस्त्र आणि स्फोटके जप्त करण्यात यश
Chhattisgarh Naxal Encounter : छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यात अबूजमाडच्या जंगलात सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये भीषण चकमक झाली आहे.

Chhattisgarh Naxal Encounter : छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यात अबूजमाडच्या जंगलात सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये भीषण चकमक झाली आहे. या झालेल्या चकमकीत सहा माओवादी मारले गेले असून सुरक्षा दलांना मोठ्या प्रमाणावर शस्त्र आणि स्फोटके जप्त करण्यात यश मिळाले आहे. 18 जुलै रोजी नारायणपूर जिल्ह्यातील अबूजमाड जंगलात माओवाद्यांच्या (Chhattisgarh Naxal) प्लाटून क्रमांक 1चे माओवादी (Naxal) असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर छत्तीसगड (Chhattisgarh) पोलिसांच्या एसटीएफ, डीआरजी आणि केंद्रीय सुरक्षा बलाने राबवलेल्या संयुक्त ऑपरेशनमध्ये माओवाद्यांसोबत जोरदार चकमक झाली.
दरम्यान, 18 जुलै रोजी रात्री उशिरापर्यंतच्या चकमकीनंतर 19 जुलै रोजी झालेल्या सर्च ऑपरेशनमध्ये घटनास्थळी सहा माओवाद्यांचे प्रेत तसेच मोठ्या प्रमाणावर एसएलआर आणि इतर बंदुकी आढळून आल्या. याशिवाय मोठ्या प्रमाणावर गोळ्या आणि स्फोटके हस्तगत करण्यात सुरक्षा दलांना(Chhattisgarh Police) यश मिळाले आहे. मारल्या गेलेल्या माओवाद्यांवर मिळून छत्तीसगड (Chhattisgarh) सरकारचे एकूण 46 लाख रुपयांचे बक्षीस होते. अशी माहिती आता पुढे आली आहे.
जप्त केलेले शस्त्र आणि स्फोटके (Chhattisgarh Naxal Encounter)
1. AK-47 राइफल – 01
2. SLR राइफल – 01
3. BGL लॉन्चर – 11
4. 12 बोर राइफल – 01
5. BGL शेल– 83
6. मोठ्या प्रमाणावर स्फोटके आणि माओवाद्यांच्या दैनंदिन वापरातल्या वस्तू.
मारल्या गेलेल्या माओवाद्यांवर छत्तीसगड सरकारचे 46 लाख रुपयांचे बक्षीस
1. राहुल पुनेम उर्फ लच्छू पुनेम (आयु 38 वर्ष) गाव: डल्ला, जिल्हा सुकमा... पद - DVCM, कमांडर, PLGA प्लाटून क्रमांक-01
2. उंगी टाटी ( 24 वर्ष) गाव: सुरपनागुड़ा, जिल्हा सुकमा, पद PM सदस्य, PLGA प्लाटून क्रमांक-01
3. मनीषा (आयु 25 वर्ष) गाव - वाला, जिल्हा नारायणपुर.. पद - PM, सदस्य, PLGA प्लाटून क्रमांक-01
4. टाटी मीना उर्फ सोमरी उर्फ छोटी (आयु 22 वर्ष) गाव - टोडका, जिल्हा बीजापुर... पद - PM, सदस्य, PLGA प्लाटून क्रमांक-01
5. हरीश उर्फ कोसा (आयु 25 वर्ष) - गाव कमलापुरम, जिला बीजापुर.. पद - PM, सदस्य, PLGA प्लाटून क्रमांक-01
6. कुड़ाम बुधरी (आयु 21 वर्ष) गाव - मालसकट्टा, जिल्हा नारायणपुर.. पद - PM, सदस्य, PLGA प्लाटून क्रमांक-01
मारल्या गेलेल्या सर्व माओवाद्यांवर मिळून छत्तीसगड सरकारचे 46 लाख रुपयांचे बक्षीस होते.
इतर महत्वाच्या बातम्या
























