Marathwada Drought : मराठवाड्यात टँकर 600 पार! जायकवाडीत फक्त 23 टक्के पाणीसाठा; विभागातील 399 गावात पाणी टंचाई
Marathwada Water Shortage : पुढील दोन महिन्यांत 1 हजारांपर्यंत टँकरचा आकडा जाईल अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
Marathwada Water Shortage : मराठवाड्यात दुष्काळाच्या (Marathwada Drought) झळा जाणवत असून, अनेक ठिकाणी पाणी टंचाई (Water Shortage) निर्माण झाली आहे. मराठवाडा (Marathwada) विभागात सध्या 23 टक्केच पाणीसाठा (Water Storage) शिल्लक आहे. मार्च अखेरीस पाणीटंचाई भासू लागल्याने पुढील काळ आणखीच कठीण होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अनेक गावात टँकरने (Tanker) पाणीपुरवठा (Water Supply) सुरु झालाय. मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांमधील 399 गावं, 91 वाड्यांना 606 टँकरने पाणीपुरवठा केला जातोय. ज्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhaji Nagar) सर्वाधिक टँकरचा आकडा सध्या पाहायला मिळत आहे. त्या खालोखाल जालना (Jalna) शहराचा क्रमांक आहे. या दोन जिल्ह्यांत 565 टँकरने पाणीपुरवठा होत असून, पुढील दोन महिन्यांत 1 हजारांपर्यंत टँकरचा आकडा जाईल अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
मराठवाड्यात यंदा अपेक्षित पाऊस झाला नसल्याने पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी विहीर आणि बोअरवेलचे पाणी आटले असून, मराठवाड्यात सध्या फक्त 23 टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती समोर येत आहे. अनेक महत्वाच्या प्रकल्पात देखील पाणीसाठा कमी झाला असून, काही प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. त्यामुळे आगामी काळात भीषण पाणी टंचाईचा मराठवाड्याला सामना करावा लागण्याची शक्यता आहे. विशेष मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणात फक्त 23 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.
मराठवाड्यातील परिस्थिती...
- मराठवाड्यात 23 टक्के पाणीसाठा शिल्लक
- मराठवाड्यातील अनेक गावात टँकर भागवतायत तहान
- मराठवाड्यात 606 टँकरने पाणीपुरवठा सुरु
- छत्रपती संभाजीनगरमध्ये 348 टँकरने पाणीपुरवठा
- जालन्यात 217 टँकरने पाणीपुरवठा
- बीड जिल्ह्यात 11 टँकरने पाणीपुरवठा
- लातूर जिल्ह्यात 1 टँकरने पाणीपुरवठा
- धाराशिव जिल्ह्यात 29 टँकरने पाणीपुरवठा
- मराठवाड्यात 902 विहिरींचे अधिग्रहण
मराठवाड्यात टँकरसाठी 332 तर त्याव्यतिरिक्त 570 अशा 902 विहिरींचे अधिग्रहण प्रशासनाने केले मराठवाड्यात 400 गावे आणि 91 वाड्या तहानल्या आहेत. यात संभाजीनगरमध्ये 230 गावे 42 वाड्या, जालन्यात 135 गावे, 48 वाड्या, बीड 16 गावे, लातूर 1 तर धाराशिव 18 गावे तहानली आहेत.
साडेतीन एकर उभ्या उसाच्या फडात जनावरे सोडली...
मराठवाड्यात गेल्यावर्षी काही जिल्ह्यात चांगला पाऊस झाला, मात्र धाराशिव जिल्ह्यात कमी पाऊस झाल्याने सध्या दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. विहिरीनी तळ गाठलाय, बहुतांशी प्रकल्पातील पाणी कमी झाल्याचा फटका शेतकऱ्यांना बसताना दिसतोय. धाराशिव जिल्ह्यातील सास्तुर गावातील माजीद युनूस केळगावे या शेतकऱ्याने आपल्या शेतातील पाणी आटल्याने साडेतीन एकर उभ्या उसाच्या फडात चरण्यासाठी जनावरे सोडून दिली आहेत. कारण आपल्या शेतात तीन बोअरवेल्ससाठी साडेतीन लाख रुपये खर्च करून देखील तिन्ही बोअरवेल्स कोरड्या पडल्याने पाण्या अभावी ऊस वाळून चाललाय. त्यामुळे वैतागलेल्या शेतकऱ्याने उभा ऊसात जनावरांना चरण्यासाठी सोडून दिले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :
मराठवाड्यात भाजपची मोठी खेळी! शिंदेसेनेला फक्त एकच जागा मिळणार?; संभाजीनगरही भाजपकडेच