(Source: ECI/ABP News/ABP Majha)
TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 12 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 12 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
आज पंतप्रधान मोदी पुणे दौऱ्यावर, एसपी कॉलेजच्या मैदानावर प्रचार सभा, पुण्यासह चंद्रपूर आणि चिमूरमध्येही सभा.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज घाटकोपर पुर्वचे उमेदवार पराग शाह यांच्यासाठी सभा, त्यानंतर उत्तर मुंबईतील उमेदवारांच्या प्रचारार्थ शाह घेणार सभा
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राहुल गांधी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, बुलढाण्यातील उमेदवारांच्या प्रचारार्थ चिखली आणि खामगावमध्ये सभेचं आयोजन.
आदित्य ठाकरे यांची आज माहीम विधानसभा मतदारसंघात जाहीर सभा, अमित ठाकरेंच्या विरोधात उभे असलेल्या महेश सावंत यांच्या प्रचारासाठी दादरच्या कुंभारवाडा येथे सभेचं आयोजन
विधानसभा निवणुकीच्या पार्श्वभूमीवर आज माहिममध्ये रंगणार आरोप प्रत्यारोप, आदित्य ठाकरेंची सभा असतानाच संध्याकाळी श्रीकांत शिंदेंची प्रभादेवीमध्ये सभा, श्रीकांत शिंदे, राज ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर काय बोलणार याकडे लक्ष
मुख्यमंत्री शिंदेंच्या सभांचा आज धडाका, महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जळगाव, बुलढाणा, अमरावती, वाशिममध्ये सभा.