Kartiki Ekadashi 2024 Wishes : कार्तिकी एकादशीच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; करा विठुनामाचा जागर, पाठवा 'हे' शुभेच्छा संदेश
Kartiki Ekadashi 2024 Wishes : आज कार्तिकी एकादशी, या दिवशी आषाढी एकादशीला निद्रावस्थेत गेलेले देव पाच महिन्यांनी कार्तिकीला उठतात. त्यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व आहे, या दिवशी विठुचा जागर करत तुम्ही प्रियजनांना हे शुभेच्छा संदेश पाठवू शकता.
Kartiki Ekadashi 2024 Wishes : आज कार्तिकी एकादशी. हा दिवस प्रबोधिनी एकादशी, देवउठणी एकादशी म्हणून देखील ओळखला जातो. असं म्हणतात की, आषाढी एकादशीला देव झोपी जातात आणि ते पाच महिन्यांनंतर कार्तिकी एकादशीला जागे होतात, म्हणून या दिवसाला देवउठणी एकादशी म्हणतात. यंदा ही एकादशीची तिथी 12 नोव्हेंबरला आली आहे. या दिवशी भगवान विष्णू निद्रावस्थेतून जागे होतात आणि चातुर्मास संपतो.
कार्तिकी एकादशीला भगवान विष्णूची विधीपूर्वक पूजा केली जाते. पंढरपूरमध्ये या दिवशी मोठा उत्सव असतो. या एकादशीनंतर लग्नसराईच्या शुभ मुहूर्ताला सुरुवात होते. या दिवशी विठुरायाची पूजा केली जाते, या निमित्त तुम्ही तुमच्या प्रियजनांना खास शुभेच्छा (Kartiki Ekadashi 2024 Wishes In Marathi) संदेश पाठवू शकता.
कार्तिकी एकादशी शुभेच्छा संदेश (Kartiki Ekadashi Wishes In Marathi)
देवउठनी एकादशीला उठता भगवान विष्णू
संपतो चातुर्मास अन् वाजतो सनई चौघडा
तुळशी झाली वधू शालीग्राम स्वरूप वर
पाहता मंगल होई त्रिभुवन
कार्तिकी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा!
ताल वाजे, मृदूंग वाजे, वाजे हरीचा वीणा !!
माउली निघाले पंढरपूर, मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला !!
!! जय जय राम कृष्ण हरी !!
कार्तिकी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा!
जातां पंढीरीसी सुख वाटे जीवा
आनंदे केशवा भेटतांचि
या सुखा उपमा नाही त्रिभुवनी
पहिली शोधोनी अवघी तीर्थे
कार्तिकी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
युगे अठ्ठावीस विटेवरी उभा
वामांगी रखुमाईदिसे दिव्य शोभा
प्रबोधिनी एकादशीच्या सर्वांना शुभेच्छा!
भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची,
उभी पंढरी आज नादावली
तुझे रुप ओठी तुझे रुप ध्यानी
जीवाला तुझी आस का लागली
प्रबोधिनी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा
तूझा रे आधार मला, तूच रे पाठिराखा
तूच रे माझ्या पांडुरंगा, चूका माझ्या देवा
घे रे तुझ्या पोटी, तुझे नाम ओठी सदा राहो
कार्तिकी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
पंढरीची वारी जयाचिये कुळी
त्याची पायधुळी लागो मन
प्रबोधिनी एकादशीच्या
विठू भक्तांना हार्दिक शुभेच्छा!
सुख दु:ख अंतरीचे घे विठ्ठला विश्वाची तूच घेसी,
मनाच्या विटाळा चंदनाचा लेप देहाची पंढरी तूच करीशी ।।
कार्तिकी एकादशीच्या सर्वांना शुभेच्छा!
उत्तिष्ठ गोविन्द त्यज निद्रां जगत्पतये ।
त्वयि सुप्ते जगन्नाथ जगत् सुप्तं भवेदिदम् ॥
तुम्हा सगळ्यांना देवउठनी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
सावळे सुंदर रूप मनोहर ।
राहो निरंतर हृदयी माझे ।।
कार्तिकी एकादशीच्या भक्तीमय शुभेच्छा!
हेही वाचा: