एक्स्प्लोर

Maval Assembly constituency: मावळमध्ये पुन्हा घबाड सापडलं, दुसऱ्यांदा मोठी रोकड जप्त, व्यावसायिकांकडे इतका पैसा येतो कुठून?

Maval Assembly constituency: मावळमध्ये निवडणुकीच्या दरम्यान तपासामध्ये दुसऱ्यांदा रोकड जप्त करण्यात आली आहे. त्यामुळे आता निवडणुकीसाठी पैसे वाटप केले जात असल्याच्या चर्चा देखील रंगल्या आहेत.

पुणे: राज्यभरात निवडणुकीच्या रणधुमाळीत अनेक ठिकाणी तपासामध्ये मोठ्या प्रमाणावर रोकड सापडत आहे. अशातच मावळ विधानसभा मतदारसंघामध्ये काल (सोमवारी) पुन्हा एकदा रोकड सापडल्याने खळबळ उडाली. देहूरोड परिसरात एका फॉर्च्युन गाडीत 3 लाख 20 हजार रुपये आढळून आले. विवेक काळोखे आणि सागर बसे हे दोघे पैसे वाटप करायला आलेत, अशी तक्रार प्रशासनाकडे करण्यात आली होती. त्यानुसार पोलीस आणि निवडणूक कर्मचाऱ्यांनी गाडीची तपासणी केल्यावर ही रोख रक्कम आढळली. मात्र गाडीत कोणत्याच पक्षाशी संबंधित चिन्ह अथवा वस्तू आढलेल्या नाहीत. त्यामुळं ही रक्कम कोणाची आहे, याबाबत पोलिसांनी अद्याप ही कोणता खुलासा केलेला नाही. 

काळोखे आणि बसे दोघे ही बांधकाम व्यावसायिक आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली. त्यामुळं या दोघांना समजपत्र देऊन, ही रक्कम शासनाकडे जमा करून घेण्यात आली आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरु आहे. रविवारी सुद्धा सचिन मुर्हे या बांधकाम व्यवसायिकाच्या कार्यलयात 36 लाख 90 हजारांची रोकड आढळली, त्यानंतर घरी जाऊन तपासणी करण्यात आली. तर घरी सुद्धा 15 लाखांची रोकड सापडली. मुर्हे सुद्धा पोलीस आणि निवडणूक कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसामोर निरुत्तर झाल्याचं दिसून आलं. या दोन्ही प्रकरणांनी मावळ विधानसभेचे राजकारण पुन्हा ढवळून निघालेलं आहे. मावळ विधानसभेत पैशांचं वाटप होत असल्याचे आरोप होत आहेत, तक्रारींची शहानिशा केल्यावर दोन ठिकाणी रोकड ही आढळल्यानं खळबळ उडालेली आहे. तपासणीत कोणत्या ही पक्षाशी संबंधित वस्तू आढळले नसल्यानं ही रोकड नेमकी कोणाची आहे, याबाबत पोलिसांनी अद्याप खुलासा केलेला नाही.

मावळमध्ये 17 लाख 75 हजारांची रोकड जप्त

गेल्या काही दिवसांपुर्वी मावळ येथील शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत उर्से टोल नाका परिसरात स्थिर सर्वेक्षण पथकाने कारमधून 17 लाख 75 हजारांची रोकड जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी कारचालक पियुष जखोडीया (वय 34) यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. मावळमध्ये शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत उर्से टोलनाका येथे खोपोलीकडून पुण्याकडे जात असलेल्या कारची तपासणी करण्यात आली. त्यावेळी कारमध्ये रोकड सापडली. चालकाकडे चौकशी केल्यानंतर कापड व्यवसाय असून ते पुण्यात दिवाळी करता खरेदीस जात असल्याचे सांगण्यात आले. तपासात तफावत आढळल्याने रक्कम जप्त करण्यात आली होती. जप्त करण्यात आलेली रक्कम आयकर विभागाकडे हस्तांतरित केल्याचे मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांनी सांगितले आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Assembly Elections 2024 : अखेर माण खटावमधील दोन भावांचा संघर्ष मिटला, जयकुमार गोरेंच्या विजयासाठी बंधू शेखर गोरे प्रचाराच्या मैदानात
अखेर माण खटावमधील दोन भावांचा संघर्ष मिटला, जयकुमार गोरेंच्या विजयासाठी बंधू शेखर गोरे प्रचाराच्या मैदानात
Kartiki Ekadashi 2024 Wishes : कार्तिकी एकादशीच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; करा विठुनामाचा जागर, पाठवा 'हे' शुभेच्छा संदेश
कार्तिकी एकादशीच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; करा विठुनामाचा जागर, पाठवा 'हे' शुभेच्छा संदेश
Raj Thackeray: उद्धव ठाकरेंकडून बाण निघून गेला, आता फक्त खान उरलेत, वर्सोव्यात मुस्लीम उमेदवार, राज ठाकरेंची घणाघाती टीका
उद्धव ठाकरेंकडून बाण निघून गेला, आता खान उरलेत, वर्सोव्यात मुस्लीम उमेदवार, राज ठाकरेंची टीका
मोठी बातमी: सोलापुरात आडम मास्तरांच्या घरावर दगडफेक, काँग्रेस कार्यकर्त्यांवर गंभीर आरोप
मोठी बातमी: सोलापुरात आडम मास्तरांच्या घरावर दगडफेक, काँग्रेस कार्यकर्त्यांवर गंभीर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 12 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaTop 100 Headlines | सकाळी 6 च्या शंभर हेडलाईन्स | 6 AM 12 November 2024 | ABP MajhaCM Eknath Shinde : साकीनाक्यात मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवला, संतोष कटके नावाच्या व्यक्तीने अडवला ताफाABP Majha Headlines | 6.30 AM | एबीपी माझा हेडलाईन्स | 12 NOV 2024 TOP Headlines

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Assembly Elections 2024 : अखेर माण खटावमधील दोन भावांचा संघर्ष मिटला, जयकुमार गोरेंच्या विजयासाठी बंधू शेखर गोरे प्रचाराच्या मैदानात
अखेर माण खटावमधील दोन भावांचा संघर्ष मिटला, जयकुमार गोरेंच्या विजयासाठी बंधू शेखर गोरे प्रचाराच्या मैदानात
Kartiki Ekadashi 2024 Wishes : कार्तिकी एकादशीच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; करा विठुनामाचा जागर, पाठवा 'हे' शुभेच्छा संदेश
कार्तिकी एकादशीच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; करा विठुनामाचा जागर, पाठवा 'हे' शुभेच्छा संदेश
Raj Thackeray: उद्धव ठाकरेंकडून बाण निघून गेला, आता फक्त खान उरलेत, वर्सोव्यात मुस्लीम उमेदवार, राज ठाकरेंची घणाघाती टीका
उद्धव ठाकरेंकडून बाण निघून गेला, आता खान उरलेत, वर्सोव्यात मुस्लीम उमेदवार, राज ठाकरेंची टीका
मोठी बातमी: सोलापुरात आडम मास्तरांच्या घरावर दगडफेक, काँग्रेस कार्यकर्त्यांवर गंभीर आरोप
मोठी बातमी: सोलापुरात आडम मास्तरांच्या घरावर दगडफेक, काँग्रेस कार्यकर्त्यांवर गंभीर आरोप
RSS वर बंदी, पोलीस भरतीत मुस्लिमांना प्राधान्य द्या, उलेमा बोर्डाने मविआला धाडलं पत्र, विहिंप आक्रमक
RSS वर बंदी, पोलीस भरतीत मुस्लिमांना प्राधान्य द्या, उलेमा बोर्डाने मविआला धाडलं पत्र, विहिंप आक्रमक
Mumbai Crime: गोराईत 7 तुकडे केलेला मृतदेह सापडला, हातावरच्या टॅटूने गूढ वाढलं, मुंबई पोलीस संभ्रमात
गोराईत 7 तुकडे केलेला मृतदेह सापडला, हातावरच्या टॅटूने गूढ वाढलं, मुंबई पोलीस संभ्रमात
Babanrao lonikar on Maratha Community: या गावात मराठा समाजाची मतं कांड्यावर मोजण्याइतकी... आष्टीतील VIDEO व्हायरल होताच बबनराव लोणीकर सावध, म्हणाले....
या गावात मराठा समाजाची मतं कांड्यावर मोजण्याइतकी... बबनराव लोणीकरांचा आष्टीतील VIDEO व्हायरल
Kartiki Ekadashi 2024: सोहळा कार्तिकीचा, गजर हरीनामाचा! कार्तिकी एकादशीनिमित्त पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत कुलकुंजवार यांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा
पंढरीत रंगला, सोहळा कार्तिकीचा; पुण्याच्या विभागीय आयुक्तांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न
Embed widget