एक्स्प्लोर

संभाजीनगरसाठी इच्छुक उमेदवार विनोद पाटील फडणवीसांच्या सागर बंगल्यावर, मुख्यमंत्र्यांचीही घेतली भेट

Lok Sabha Election 2024 : विनोद पाटील आणि फडणवीसांमध्ये संभाजीनगरच्या लोकसभेच्या जागेबाबत चर्चा झाली असल्याची देखील माहिती मिळत आहे.

Lok Sabha Election 2024 : छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातील (Chhatrapati Sambhaji Nagar Lok Sabha Constituency) महायुतीचा उमेदवार (Mahayuti  Candidate) ठरला नसल्याने अजूनही निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट झाले नाहीत. अशात महायुतीकडून इच्छुक असलेले मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील (Vinod Patil) यांनी रात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची सागर बंगल्यावर भेट घेतली आहे. याचवेळी निलेश राणे (Nilesh Rane) देखील सागर बंगल्यावर (Sagar Bungalow) पोहचल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, विनोद पाटील आणि फडणवीसांमध्ये संभाजीनगरच्या लोकसभेच्या जागेबाबत चर्चा झाली असल्याची देखील माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे फडणवीसांच्या भेटीबरोबरच विनोद पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची देखील भेट घेतली आहे. 

छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दुसरीकडे विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांना देखील एमआयएमकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, महायुतीत संभाजीनगरची जागा शिंदे गटाकडे की, भाजपकडे यावर निर्णय होत नसल्याने अजूनही उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही. दरम्यान, महायुतीत शिंदे गटाकडून संभाजीनगरमधून निवडणूक लढवण्यासाठी विनोद पाटील इच्छुक आहेत. यासाठी त्यांनी शिंदे गटासह भाजप नेत्यांच्या भेटीगाठी देखील सुरु केल्याचे पाहायला मिळत आहे.  तर, रात्री त्यांनी फडणवीस यांच्यासह मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली आहे. 

महायुतीकडून इच्छुकांची यादी...

  • भागवत कराड (भाजप) 
  • अतुल सावे (भाजप)
  • संदिपान भुमरे (शिंदेसेना)
  • विनोद पाटील (मराठा आरक्षण याचिकाकर्ते)

मराठा उमेदवार देण्याच्या हालचाली?

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर हा विषय गावागावत जाऊन पोहचला आहे. त्यातच संभाजीनगर जिल्हा पहिल्यापासून मराठा आंदोलनाचा केंद्र बिंदू राहिला आहे. पहिला मराठा क्रांती मोर्चा देखील याच संभाजीनगर शहरात निघाला होता. त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून मराठा उमेदवार देण्यासाठी महायुतीकडून प्रयत्न केले जात असल्याची माहिती मिळत आहे. अशात विनोद पाटील देखील महायुतीकडून इच्छुक आहे. त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळणार का? हे पाहणे महत्वाचे असणार आहे. 

विनोद पाटलांबद्दल मराठा समाजात दोन गट? 

लोकसभा निवडणुकीत प्रत्येक लोकसभा मतदारसंघात एक मराठा अपक्ष उमेदवार देण्याबाबत मनोज जरांगे यांच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला होता. अशात विनोद पाटील देखील लोकसभेच्या मैदानात उतरणार आहेत. मात्र, ते महायुतीकडून उमेदवार म्हणून निवडणूक लढवू शकतात. पण, विनोद पाटील यांच्याबाबत देखील जिल्ह्यात मराठा समाजाचे दोन गट आहेत. एक गट विनोद पाटील यांच्या समर्थनात आणि दुसरा गट त्यांच्या विरोधात आहे. त्यामुळे आता विनोद पाटील यांच्या उमेदवारीनंतरच सर्व काही स्पष्ट होणार आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

Video : संभाजीनगरात मराठा समाजाच्या बैठकीत राडा; घोषणाबाजी, हाणामारीमुळे तणावाची स्थिती!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Walmik Karad : गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
वाल्मिक कराडला 7 दिवसांची कोठडी, बीड कोर्टाबाहेर राडा; निदर्शने, घोषणाबाजी, गृहमंत्री जिल्ह्यात या
वाल्मिक कराडला 7 दिवसांची कोठडी, बीड कोर्टाबाहेर राडा; निदर्शने, घोषणाबाजी, गृहमंत्री जिल्ह्यात या
इकडं भारतात असलेल्या माजी पीएम शेख हसीनांवर गुन्ह्यांचा पाऊस, पासपोर्टही रद्द अन् तिकडं खालिदा जियांची शिक्षा माफ झाली!
इकडं भारतात असलेल्या माजी पीएम शेख हसीनांवर गुन्ह्यांचा पाऊस, पासपोर्टही रद्द अन् तिकडं खालिदा जियांची शिक्षा माफ झाली
लय भारी! मुंबईतून धावली देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन; कुल प्रवास, वाऱ्याचा वेग, चाचणी यशस्वी
लय भारी! मुंबईतून धावली देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन; कुल प्रवास, वाऱ्याचा वेग, चाचणी यशस्वी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Beed Walmik Karad Supporter : महिला समर्थकांचा ठिय्या, जरांगे आणि धस विरोधात घोषणाWalmik Karad Case Beed Court : वाल्मिक कराडच्या रिमांडची सुनावणी आता बीड जिल्हा न्यायालयातWalmik karad beed court : वाल्मीक कराडला बीड न्यायालयात आणण्यापूर्वी पोलीस बंदोबस्त वाढवलाWalmik Karad Pimpari Chinchwad Flat : वाल्मिक कराडचा पिंपरी-चिंचवडमधील फ्लॅट सील करुन लिलाव करणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Walmik Karad : गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
वाल्मिक कराडला 7 दिवसांची कोठडी, बीड कोर्टाबाहेर राडा; निदर्शने, घोषणाबाजी, गृहमंत्री जिल्ह्यात या
वाल्मिक कराडला 7 दिवसांची कोठडी, बीड कोर्टाबाहेर राडा; निदर्शने, घोषणाबाजी, गृहमंत्री जिल्ह्यात या
इकडं भारतात असलेल्या माजी पीएम शेख हसीनांवर गुन्ह्यांचा पाऊस, पासपोर्टही रद्द अन् तिकडं खालिदा जियांची शिक्षा माफ झाली!
इकडं भारतात असलेल्या माजी पीएम शेख हसीनांवर गुन्ह्यांचा पाऊस, पासपोर्टही रद्द अन् तिकडं खालिदा जियांची शिक्षा माफ झाली
लय भारी! मुंबईतून धावली देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन; कुल प्रवास, वाऱ्याचा वेग, चाचणी यशस्वी
लय भारी! मुंबईतून धावली देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन; कुल प्रवास, वाऱ्याचा वेग, चाचणी यशस्वी
Ajit Pawar : अजितदादांचे बीडमध्ये एकाच दिवसात दोन निर्णय; धनंजय मुंडे अडचणीत, संतोष देशमुखांच्या तालुक्यात कोणता निर्णय घेतला?
अजितदादांचे बीडमध्ये एकाच दिवसात दोन निर्णय; धनंजय मुंडे अडचणीत, संतोष देशमुखांच्या तालुक्यात कोणता निर्णय घेतला?
Santosh Deshmukh : संतोष देशमुखांच्या अपहरणाची वेळ आणि तीन मारेकऱ्यांची फोनाफोनीची वेळ मिळतीजुळती; एसआयटीने वेळ तारीख सादर केली
संतोष देशमुखांच्या अपहरणाची वेळ आणि तीन मारेकऱ्यांची फोनाफोनीची वेळ मिळतीजुळती; एसआयटीने वेळ, तारीख सादर केली
Beed Walmik Karad Supporter : महिला समर्थकांचा ठिय्या, जरांगे आणि धस विरोधात घोषणा
Beed Walmik Karad Supporter : महिला समर्थकांचा ठिय्या, जरांगे आणि धस विरोधात घोषणा
Mark Zuckerberg : झुकेरबर्ग म्हणाले, कोरोनानंतर मोदी सरकारचा पराभव; संसदीय समितीने मानहानी नोटीसचा इशारा देताच META India ने मागितली माफी!
झुकेरबर्ग म्हणाले, कोरोनानंतर मोदी सरकारचा पराभव; संसदीय समितीने मानहानी नोटीसचा इशारा देताच META India ने मागितली माफी!
Embed widget