(Source: Poll of Polls)
Jayakwadi Dam Update : जायकवाडी धरणातील पाण्याची आवक बंद, सध्या धरणात उरला एवढा पाणीसाठा?
Jayakwadi : आज सकाळी आलेल्या आकडेवारीनुसार जायकवाडी धरणात सध्या पाण्याची आवक पूर्णपणे बंद झाली आहे.
छत्रपती संभाजीनगर : गेल्या आठवड्यात नाशिक जिल्ह्यात झालेल्या जोरदार पाऊस आणि जायकवाडी धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे जायकवाडी धरणात पाण्याची आवक सुरु झाली होती. त्यामुळे पाणीसाठ्यात देखील वाढ होताना पाहायला मिळत होती. मात्र, पुन्हा पावसाने खंड दिल्याने जायकवाडी (Jayakwadi ) धरणात येणारी आवक देखील बंद झाली आहे. आज सकाळी आलेल्या आकडेवारीनुसार जायकवाडी धरणात सध्या पाण्याची आवक पूर्णपणे बंद झाली आहे. तर, दुसरीकडे उजव्या कालव्यात 900 क्युसेक आणि डाव्या कालव्यात 1200 क्युसेकने धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
जायकवाडी धरणातील आजची पाणीसाठा परिस्थिती
जायकवाडी धरणाची पाणी पातळी फुटामध्ये : 1507.00 फूट
जायकवाडी धरणाची पाणी पातळी मीटरमध्ये : 459.334 मीटर
एकूण पाणीसाठा दलघमी : 1468.849 दलघमी
जिवंत पाणीसाठा दलघमी : 730.743 दलघमी
जायकवाडी धरणाची पाणीसाठा टक्केवारी : 33.66 टक्के
जायकवाडी धरणात पाण्याची आवक : 00
जायकवाडी धरण बाष्पीभवन : 0.48
उजवा कालवा विसर्ग :900 क्युसेक
डावा कालवा विसर्ग : 1200क्युसेक
मागील वर्षी आजच्या दिवशीचा पाणीसाठा
मागील वर्षी आजच्या दिवशीचा उपयुक्त पाणीसाठा दलघमी : 2108.841 दलघमी
मागील वर्षी आजच्या दिवशीची उपयुक्त टक्केवारी : 97.14 टक्के
1 जून 2023 पासुन एकूण पाण्याची आवक : 326.749 दलघमी
1 जून 2023 पासुन एकूण सोडलेला विसर्ग : 1.041 दलघमी
चिंता वाढली...
यंदा मान्सून उशिरा दाखल झाला. त्यात ऑगस्ट महिना कोरडा गेला. त्यामुळे यंदा मराठवाड्यात अपेक्षित पाऊस झालेला नाही. अनेक भागात सध्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून, अशा ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. त्यातच आता सप्टेंबर महिना अर्धा संपला आहे. त्यामुळे पावसाचे अंदाज 20 दिवस उरले आहेत. अशात जर जोरदार पाऊस झाला नाही, तर प्रश्न अधिकच गंभीर बनण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी तर पिकं करपून गेली आहे. त्यामुळे उरलेल्या पिकांना वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धरपड पाहायला मिळत आहे.
पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार!
छत्रपती संभाजीनगर, जालना शहराला पिण्यासाठी पाणीपुरवठा जायकवाडी धरणातून केला जातो. सोबतच मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यातील शेतीला देखील याच धरणातून पाणी सोडले जाते. मात्र, सध्या जायकवाडी धरणात फक्त 33 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तसेच नाशिक जिल्ह्यात देखील यंदा जोरदार असा पाऊस झालेला नाही. त्यामुळे पुढील 15 ते 20 दिवसांत जोरदार पाऊस न झाल्यास मराठवाड्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनू शकतो.
इतर महत्वाच्या बातम्या:
Jayakwadi Dam : जायकवाडी धरणातील पाण्याची आवक घटली, अशी आहे आजची आकडेवारी?