Cabinet Extension: मंत्रिमंडळात मराठवाड्याचा दबदबा कायम; मंत्र्यांची संख्या वाढल्याने अपेक्षाही वाढल्या
Cabinet Extension Marathwada : आधीचे चार आणि आता दोन असे एकूण सहा मंत्रीपदं मराठवाड्याच्या वाट्याला आली आहेत.
Cabinet Extension Marathwada : शिवसेना-भाजप या सत्तधारी पक्षात आता राष्ट्रवादीची देखील भर पडली आहे. अजित पवारांनी 30 पेक्षा अधिक आमदारांना सोबत घेऊन सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला असून, एकूण 9 राष्ट्रवादीच्या आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. दरम्यान, यात मराठवाड्यातील (Marathwada) दोन आमदारांचा सहभाग असल्याने आधीचे चार आणि आता दोन असे एकूण सहा मंत्रीपद मराठवाड्याच्या वाट्याला आले आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळात मराठवाड्याचा दबदबा कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. तर संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) , अब्दुल सत्तार (Abdul Sattar) , तानाजी सांवत (Tanaji Sawat) , अतुल सावे (Atul Save) , धनंजय मुंडे (Dhananjay Munde) , संजय बनसोडे (Sanjay Bansode) असे सहा मराठवाड्यातील मंत्री मंत्रिमंडळात आहेत.
खात्यांची अदलाबदल...
अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यावर राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे सध्याच्या काही मंत्र्याच्या खात्यात अदलाबदल करून या नवीन मंत्र्यांना खातेवाटप करण्यात आले आहेत. ज्यात मराठवाड्यातील काही मंत्र्यांचा देखील सहभाग आहे. रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे आणि आरोग्यमंत्री तानाजी सांवत यांची खाते कायम आहेत. तर अब्दुल सत्तार यांचे कृषी खाते काढून धनंजय मुंडे यांच्याकडे देण्यात आले आहेत. अतुल सावे यांच्याकडून सहकार मंत्रीपद काढून घेण्यात आले असून, ते आता दिलीप वळसे पाटील यांना देण्यात आले आहेत. तर संजय बनसोडे यांना क्रीडा आणि युवक कल्याण, बंदरे खाते मिळाले आहेत.
मराठवाड्यातील कोणत्या मंत्र्याला कोणतं पद...?
- संदिपान भुमरे (रोजगार जमि योजना)
- अब्दुल सत्तार (अल्पसंख्याक विकास आणि औकाफ, पणन)
- अतुल सावे ( गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण)
- तानाजी सांवत (सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण)
- धनंजय मुंडे (कृषी)
- संजय बनसोडे (क्रीडा व युवक कल्याण,बंदरे)
शेतकरी आत्महत्यांचे आव्हान...
कधी कोरडा तरी कधी ओला दुष्काळ अशा वेगेवेगळ्या संकटाचा सामना मराठवाड्याला गेल्या काही वर्षात करावा लागत आहे. त्यामुळे मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण अधिक आहे. दरम्यान, आता मराठवाड्याला एकूण 6 मंत्रीपद मिळाले आहे. त्यातल्या त्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होणाऱ्या बीड जिल्ह्याला धनंजय मुंडे यांच्या रूपाने कृषी मंत्रीपद मिळाले आहे. त्यामुळे मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्याचे मोठे आव्हान या मंत्र्यांसमोर असणार आहे. त्यामुळे यात त्यांना कितपत यश येणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: