प्रतापराव जाधव हरणारच, माजी मंत्र्यांनी 9 लाखांची पैज लावली, बुलढाण्यात कोण जिंकणार?
Buldhana Lok Sabha Constituency : लोकसभा निवडणुकीत बुलढाणा जिल्ह्यातील निकालात महायुतीचे उमेदवार खासदार प्रतापराव जाधव यांचा पराभव होणार यावर पैज लावण्यात आलीय.
Buldhana News : लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Election 2024) दोन टप्पे पार पडले आहे. राज्यात एकूण पाच टप्प्यांमध्ये लोकसभेची निवडणूक होणार आहे. मात्र दुसऱ्या टप्प्यात झालेली बुलढाण्यातील निवडणूक (Buldhana Election) सध्या चर्चत राहत आहे. ती म्हणजे येथील क्षणा-क्षणाला बदलणारे राजकारण, उम्मेदवारांकडून एकमेकांना मिळणाऱ्या धमक्यांमुळे.
आता निवडणुकीच्या निकालाकडे जितकं राजकीय पक्षांचं, नेत्यांचं लक्ष लागलेलं असतं. तितकंच लक्ष असतं कार्यकर्त्यांचं. त्यामुळे ‘तुमच्यासाठी कायपण’ असं म्हणणारे कार्यकर्ते काय करतील याचा नेम नाही. नुकत्याच झालेल्या निवडणुकीच्या निमित्ताने असाच किस्सा घडलाय. किस्सा आहे बुलढाणा जिल्ह्यातील एका माजी मंत्र्यांच्या विश्वासाचा.
लोकसभा निवडणुकीत बुलढाणा जिल्ह्यातील निकालात महायुतीचे उमेदवार खासदार प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांचा पराभव होणार यावर पैज लावण्यात आली आहे. यासाठी 3.15 लाख रुपयांची पैज असून पैज जिंकल्यावर पैज लावणाऱ्यास तब्बल 9.45 लाख रुपये मिळणार आहे. राज्याचे माजी महसूलमंत्री तथा बुलढाणा आणि अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री सुबोध सावजी (Subodh Saoji) यांनी ही पैज लावली आहे.
सुबोध सावजींच्या याधीच्या पैज आल्या होत्या चर्चेत
काँग्रेस नेते आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री सुबोध सावजी हे नेहमीच आपल्या अफलातून आंदोलन, थेट मारधाडीच्या धमक्या आणि जनतेच्या हितासाठी वाट्टेल ते करण्यासाठी जिल्ह्यात सावजींचे नाव घेतल्या जाते. यापूर्वी भाजपचे आमदार राम कदम यांच्या 'महिलांचे अपहरण' या वक्तव्यावरून कदम यांची जीभ तोडणाऱ्याला 5 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. तर संभाजी भिडे यांना जीवे मारण्याची धमकी ही दिली होती. “भिडे गुरुजींना अटक करा. अन्यथा मी त्यांचा मर्डर करेल”, अशी ती धमकी होती. त्यानंतर निर्ढावलेली यंत्रणा जागी होत नाही. हे पाहून सावजी यांनी थेट जिल्हा परिषदेतील पाणी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांचा खून करण्याची धमकी दिली होती. याशिवाय विहिरी आंदोलन करणे, बक्षिसे जाहीर करणे हे सुबोध सावजी यांच्याकडून केले जाते.
खासदार प्रतापराव जाधवांचा पराभव निश्चित असल्याचा दावा
मात्र आता पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहे आणि ते म्हणजे बुलढाणा लोकसभा मतदारसंघात झालेल्या महायुती महाविकास आघाडी आणि अपक्ष विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांचा पराभव निश्चित असल्याचा दावा आणि आत्मविश्वास असल्याने त्यांनी मुंबईच्या एका मित्रासोबत लाखोंची पैज लावली आहे.
सुबोध सावजी यांनी माध्यमांवर जाहीर केली पैज
विशेष म्हणजे ही पैज लावल्यानंतर माजी मंत्री सुबोध सावजी यांनी ती माध्यमांवर जाहीर सुद्धा करून टाकली. बुलढाणा लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार प्रतापराव जाधव यांचा पराभव झाल्यास माजी मंत्री सावजी यांनी लावलेल्या पैज प्रमाणे 9 लाख 45 हजार रुपये रोख मिळणार आहेत. प्रतापराव जाधव हे निवडून आले तर सावजींना 3 लाख 15 हजार रुपये रोख रक्कम आपल्या मित्राला लावलेल्या पैजनुसार द्यावे लागणार आहे. आता ही पैज बुलढाण्यात चांगलीच चर्चेत आली आहे. आता बुलढाण्याच्या निवडणुकीत महायुतीचे प्रतापराव जाधव बाजी मारणार की महाविकास आघाडीचे नरेंद्र खेडेकर विजयी गुलाल उधळणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
आणखी वाचा