एक्स्प्लोर

Buldhana News : शिंदे गटाने भाजपचं मांडलिकत्व पत्करलंय, त्यामुळे ते पूर्णपणे परावलंबी झालेत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची घणाघाती टीका

Loksabha Election 2024: शिंदे गटाने भाजपचे पूर्णतः मांडलीकत्व पत्करलेल आहे. त्यामुळे ते पूर्णपणे परावलंबी झाले असल्याची घणाघाती टीका ठाकरे गटाचे उमेदवार प्रा. नरेंद्र खेडेकर यांना केली आहे.

Buldhana News : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर जवळ जवळ सर्वच पक्षानी आपला जाहीरनामा प्रकाशित करत मतदारांना साद घातली आहे. अशातच भाजपनेही आपल्या पक्षाचा जाहीरनामा प्रकाशित केला असून या जाहीरनाम्यावरून राज्याच्या राजकारणात आरोपांच्या फैरी झाडल्या जात आहे. त्यातच आता महाविकास आघाडीचे (Maha Vikas Aghadi) ठाकरे गटाचे उमेदवार प्रा. नरेंद्र खेडेकर (Narendra Khedekar) यांना शिंदे गटावर घणाघाती टीका केली आहे. शिंदे गटाने भाजपचे पूर्णतः मांडलीकत्व पत्करलेल आहे. त्यामुळे शिंदे गट हा पूर्णपणे परावलंबी झालेला आहे. यांना मुख्यमंत्रीपद टिकवायचं असेल तर भाजपच ऐकावंच लागेल अशी टीका ही प्रा. नरेंद्र खेडेकर यांनी केलीय. 

काल, रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते त्यावेळी त्यांना भाजपच्या जाहीरनाम्या विषयी विचारले असता, भाजपने जाहीर केलेला जाहीरनामा म्हणजेच महायुतीचा जाहीरनामा असल्याच म्हटल होत. त्यावर भाष्य करताना  खेडेकर यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधलाय. 

शिवसैनिक विरुद्ध शिवसैनिक अशी लढत

शिवसेना फुटल्यानंतर लोकसभा निवडणुकीसाठी पाच लोकसभा मतदारसंघांमध्ये शिवसैनिक विरुद्ध शिवसैनिक अशी लढत होणार आहे. यामध्ये बुलढाणा लोकसभा (Buldhana Loksabha) मतदारसंघाचा सुद्धा समावेश आहे. शिंदे गटाकडून प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांनाच पुन्हा रिंगणात उतरवण्यात आलं आहे, तर त्यांच्याविरोधात शिवसेना ठाकरे गटाकडून नरेंद्र खेडेकर (Narendra Khedekar) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून बुलढाणा जागेवरून महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये सुद्धा जागा कोणाची यावरून वाद सुरु होता.आता मात्र फुटलेल्या शिवसेनेत पहिल्यांदाच बुलढाणामधील दोन  शिवसैनिक आमने-सामने आल्याने जनता कोणाला निवडून देणार याची सुद्धा उत्सुकता आहे. जे शिवसैनिक गेल्या तीन दशकांपासून आपलाच उमेदवार निवडून देण्यासाठी लढले, तेच आता आपल्यातील एका शिवसैनिकाला पराभूत करण्यासाठी या निवडणुकीत जीवाचे रान करत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.

गद्दारीचा फैसला मतदारच करणार 

पक्ष फुटीनंतरही आम्ही अनेक निवडणुका जिंकल्या आहेत. त्यामुळे आम्हाला ही निवडणूक काही आव्हानात्मक नाही. माझी पाटी कोरी आहे त्यामुळे मला निवडणूक सोपी आहे. तसेच गद्दारीचा कलंक असलेल्यांसोबत आमची लढत आहे. त्यामुळे मतदारच या गद्दारीचा फैसला करणार असल्याचे प्रा. नरेंद्र खेडेकर म्हणाले. काल मुख्यमंत्री बुलढण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी प्रतापराव जाधव याना मतदान करा अस म्हटलंच नाही किंवा प्रतापराव यांना  मत द्या, असा एकही शब्द म्हटला नाही. तर त्यांनी मोदींना मतदान करा, अस म्हटलं आहे. त्यावरून माझ्या समोर आव्हान कसं आहे ते ओळखून घ्या. तसेच पुढल्या आठवड्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची खामगाव येथे भव्य सभा आहे. त्यातच माझ्या विजयावर शिक्का मोर्तब होईल, असा विश्वासही  प्रा. नरेंद्र खेडेकर यांनी बोलतांना व्यक्त केलाय. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

प्रवासी विमान आणि अमेरिकन लष्कराचं हेलिकाॅप्टर भीषण धडकेत थेट नदीत कोसळले, 18 मृतदेह सापडले; हाड गोठवणाऱ्या थंडीत शोधकार्य सुरुच
प्रवासी विमान आणि अमेरिकन लष्कराचं हेलिकाॅप्टर भीषण धडकेत थेट नदीत कोसळले, 18 मृतदेह सापडले; हाड गोठवणाऱ्या थंडीत शोधकार्य सुरुच
आमदारांसह पोलिसांची कॉलेज परिसरातील कॅफेंवर धाड; पडद्याआड अश्लील चाळे, तरुण-तरुणी ताब्यात
आमदारांसह पोलिसांची कॉलेज परिसरातील कॅफेंवर धाड; पडद्याआड अश्लील चाळे, तरुण-तरुणी ताब्यात
Budget 2025 : आतापर्यंत दोन महिला अर्थमंत्र्यांनी केंद्रीय अर्थसंकल्प मांडला, पहिलं नाव इंदिरा गांधी यांचं, निर्मला सीतारामन आठव्यांदा बजेट मांडणार
आतापर्यंत दोन महिला अर्थमंत्र्यांनी देशाचं बजेट मांडलं, इंदिरा गांधींनंतर निर्मला सीतारामन यांना बहुमान
छावा सिनेमा, विधानसभा निकाल, चंद्रकात पाटील ते अजित पवार; राज ठाकरेंच्या भाषणातील 10 मुद्दे; मुंबईतून फटकेबाजी
छावा सिनेमा, विधानसभा निकाल, चंद्रकात पाटील ते अजित पवार; राज ठाकरेंच्या भाषणातील 10 मुद्दे; मुंबईतून फटकेबाजी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Mumbai Full Speech : विधानसभा निकालाची चिरफाड, पराभवानंतर राज ठाकरेंचं पहिलं भाषणBeed  DPDC Meeting : बीडमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक, अजित पवार, धनंजय मुंडे,पंकजा मुंडे उपस्थितRaj Thackeray On Balasaheb Thorat : 7 वेळा आमदार झालेले थोरात 10 हजार मतांनी पराभूत कसे?- ठाकरेRaj Thackeray Mumbai : 4-5 जागा येतील की नाही असं वाटत असताना अजित पवार 42 जागा मिळाल्या- ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
प्रवासी विमान आणि अमेरिकन लष्कराचं हेलिकाॅप्टर भीषण धडकेत थेट नदीत कोसळले, 18 मृतदेह सापडले; हाड गोठवणाऱ्या थंडीत शोधकार्य सुरुच
प्रवासी विमान आणि अमेरिकन लष्कराचं हेलिकाॅप्टर भीषण धडकेत थेट नदीत कोसळले, 18 मृतदेह सापडले; हाड गोठवणाऱ्या थंडीत शोधकार्य सुरुच
आमदारांसह पोलिसांची कॉलेज परिसरातील कॅफेंवर धाड; पडद्याआड अश्लील चाळे, तरुण-तरुणी ताब्यात
आमदारांसह पोलिसांची कॉलेज परिसरातील कॅफेंवर धाड; पडद्याआड अश्लील चाळे, तरुण-तरुणी ताब्यात
Budget 2025 : आतापर्यंत दोन महिला अर्थमंत्र्यांनी केंद्रीय अर्थसंकल्प मांडला, पहिलं नाव इंदिरा गांधी यांचं, निर्मला सीतारामन आठव्यांदा बजेट मांडणार
आतापर्यंत दोन महिला अर्थमंत्र्यांनी देशाचं बजेट मांडलं, इंदिरा गांधींनंतर निर्मला सीतारामन यांना बहुमान
छावा सिनेमा, विधानसभा निकाल, चंद्रकात पाटील ते अजित पवार; राज ठाकरेंच्या भाषणातील 10 मुद्दे; मुंबईतून फटकेबाजी
छावा सिनेमा, विधानसभा निकाल, चंद्रकात पाटील ते अजित पवार; राज ठाकरेंच्या भाषणातील 10 मुद्दे; मुंबईतून फटकेबाजी
Ajit Pawar in Beed: बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हायव्होल्टेज ड्रामा, अजित पवारांनी सुरेश धस यांना सुनावलं
लई मागचं बोलू नका; बीडमधील डीपीडीसीच्या बैठकीत अजित पवारांनी सुरेश धस यांना सुनावलं
उद्धव ठाकरेंच्या सेनेची लांगूलचालनाची भूमिका मतांच्या लाचारीसाठी, वक्फ बिलावरून देवेंद्र फडणवीसांचे प्रत्यूत्तर
उद्धव ठाकरेंच्या सेनेची लांगूलचालनाची भूमिका मतांच्या लाचारीसाठी, वक्फ बिलावरून देवेंद्र फडणवीसांचे प्रत्यूत्तर
Raj Thackeray : फडणवीसांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले नेते त्यांच्याच मंत्रीमंडळात; राज ठाकरेंनी आरोप होताच भाजपवासी झालेल्या राज्यातील नेत्यांची कुंडलीच मांडली!
फडणवीसांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले नेते त्यांच्याच मंत्रीमंडळात; राज ठाकरेंनी आरोप होताच भाजपवासी झालेल्या राज्यातील नेत्यांची कुंडलीच मांडली!
उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची भेट,  फडणवीस म्हणाले लग्नात भेटल्यामुळं युती होते इतका भाबडा विचार कोणाच्या डोक्यात येऊ नये
उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची भेट, फडणवीस म्हणाले लग्नात भेटल्यामुळं युती होते इतका भाबडा विचार कोणाच्या डोक्यात येऊ नये
Embed widget