एक्स्प्लोर
अल्पवयीन विद्यार्थिनीशी वर्गातच अश्लील चाळे, विकृत मुख्याध्यापकाला बेदम चोप
धक्कादायक बाब म्हणजे हा विकृत त्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर एकतर्फी प्रेम करत असल्याची देखील माहिती मिळाली आहे. गुरु शिष्याच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट पसरली असून या विकृत मुख्याधापकाला कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे.
भिवंडी : एका 14 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीशी वर्गातच विकृत मुख्याधापकाने अश्लील चाळे केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार भिवंडी तालुक्यातील शेलार-मिटपाडा भागातील एका शाळेत घडला आहे. घटनेची माहिती पीडितेच्या नातेवाईकांना मिळताच त्यांनी शाळेच्या आवारात धाव घेऊन त्या विकृत मुख्याधापकाला बेदम चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. भिवंडी तालुका पोलिसांनी घटनेचे गांभीर्य पाहून विकृत मुख्याधापकाला ताब्यात घेऊन त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. प्रमोद नायक असे विकृत मुख्याधापकाचे नाव आहे.
धक्कादायक बाब म्हणजे हा विकृत त्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर एकतर्फी प्रेम करत असल्याची देखील माहिती मिळाली आहे. गुरु शिष्याच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट पसरली असून या विकृत मुख्याधापकाला कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार भिवंडी-वाडा रोडवरील शेलार येथील मिटपाडा भागात एका संस्थेची माध्यमिक शाळा असून या शाळेत 14 वर्षाची विद्यार्थिनी शिक्षण घेत आहे. गेल्या काही महिन्यापासून आरोपी प्रमोद हा पीडितेवर एकतर्फी प्रेम करीत होता. तीन दिवसापूर्वीच त्याने तिला शाळेच्या मैदानात गाठून मुख्याधापक कार्यलयात यायला सांगितले. त्यांनतर आरोपीने पीडित मुलीसोबत अश्लील चाळे करायला सुरुवात केली. पीडित मुलीने त्यास नकार देत तिथून कशीबशी आपली सुटका करुन घेतली. या सर्व घृणास्पद प्रकाराने भयभीत होऊन पीडित मुलीने घरी येऊन घडलेल्या प्रसंगाची माहिती आपल्या आईला सांगितला.
भिवंडीत पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्याप्रकरणी सख्खा चुलत भावास अटक
आईने नातेवाईकांसह शाळेत धाव घेऊन त्याला गाठले आणि घडलेल्या प्रकारचा जाब प्रमोदला विचारला. मात्र यावेळी देखील त्याने उलटसुलट उत्तरं दिली. यानंतर नातेवाईकांचा संताप अनावर झाला. संतप्त नागरिकांनी त्याला चोप दिला. घटनेची माहिती मिळताच भिवंडी तालुका पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी दाखल होवून आरोपाला ताब्यात घेतले. दरम्यान आरोपी मुख्याधापकाला उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस ठाण्यातून देण्यात आली. अधिक तपास भिवंडी तालुका पोलीस करीत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
महाराष्ट्र
पर्सनल फायनान्स
Advertisement