एक्स्प्लोर

भिवंडीत पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्याप्रकरणी सख्खा चुलत भावास अटक

आरोपी जवळचाच असेल या निष्कर्षावरुन पोलिसांनी पीडितेच्या 13 वर्षाच्या सख्या चुलत भावास ताब्यात घेतलं. पोलिसांनी विश्वासाने चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

भिवंडी : पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करत तिची हत्या केल्याची संतापजनक घटना भिवंडीतल्या सरवली गावात घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा नराधम पीडित मुलीचा सख्खा चुलत भाऊ आहे. चिमुकली घराबाहेर खेळत असताना या नराधमानं तिचं अपहरण केलं. त्यानंतर तिच्यावर अत्याचार करत तिची हत्या केली. मुलगी रात्री घरी न आल्याने कुटुंबीय चिंतेत पडले आणि त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. सकाळच्या सुमारास  सरवली गावात पीडित मुलगी रहात असलेल्या घरा पासून पाचशे मीटर अंतरावर पाईप लाईनच्या खाली पीडित मुलीचा मृतदेह आढळून आला. या घटनेने संपुर्ण परिसरात संताप व्यक्त केला जात असतानाच स्थानिक कोनगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात पाठवला असता पीडित बलिकेवर बलात्कार करुन तिचा गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाले. कोनगाव पोलिसांनी सुरवातीला अज्ञात आरोपींच्या विरोधात अपहरण बलात्कार व खुनाचा गुन्हा दाखल करतात या आरोपींचा कसून शोध घ्यायला सुरुवात केली असता पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सर्व पोलीस ठाण्यातील पोलीस पथकांसोबत गुन्हे शाखा यांनी या गुन्ह्याचा तपास गांभीर्याने करण्यास सुरुवात केली . आरोपी जवळचाच असेल या निष्कर्षावरुन पोलिसांनी पीडितेच्या 13 वर्षाच्या सख्या चुलत भावास ताब्यात घेतलं. पोलिसांनी विश्वासाने चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे . या विधीसंघर्ष ग्रस्त बालका विरोधात पीडितेवर बलात्कार करुन तिची हत्या केल्याप्रकरणी बालन्यायालायत हजर केले असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन कौसडीकर यांनी दिली आहे .

महत्त्वाच्या बातम्या

मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
पुणे पदवीधरची राष्ट्रवादीची जागा भाजपकडे, शशिकांत शिंदे म्हणाले, भाजप अॅनाकोंडा, तो मित्र पक्षाला गिळतोय
पुणे पदवीधरची राष्ट्रवादीची जागा भाजपकडे, शशिकांत शिंदे म्हणाले, भाजप अॅनाकोंडा, तो मित्र पक्षाला गिळतोय
नरेंद्र मोदींसोबत एक तास चर्चा, अर्धा तास महाराष्ट्राच्या दुष्काळाबाबत विचारलं; एकनाथ शिंदेंनी दिल्ली भेटीचा किस्सा सांगितला
नरेंद्र मोदींसोबत एक तास चर्चा, अर्धा तास महाराष्ट्राच्या दुष्काळाबाबत विचारलं; एकनाथ शिंदेंनी दिल्ली भेटीचा किस्सा सांगितला

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
Pune Police: पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
Embed widget