एक्स्प्लोर

Bhandara News : भंडाऱ्यात शक्तीवर्धक गोळ्यांच्या अतिसेवनाने तरुणाचा हार्ट अटॅकने मृत्यू, लॉजवर मैत्रिणीसोबत रात्र घालवताना घडली घटना

Bhandara News : शक्तीवर्धक गोळ्यांच्या अतिसेवनाने तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना भंडाऱ्यात घडली. लॉजवर मैत्रिणीसोबत रात्र घालवताना हा प्रकार घडला.

भंडारा : शक्तीवर्धक गोळ्यांच्या अतिसेवनाने तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना भंडाऱ्यात (Bhandara) घडली. लॉजवर मैत्रिणीसोबत रात्र घालवताना हा प्रकार घडला. तरुणीसोबत झालेल्या ओळखीनंतर दोघांमध्ये हळूहळू मोबाईलवर बोलणं सुरु झालं आणि त्यानंतर दोघांच्या बोलण्याचं प्रेमात रुपांतर झालं. यातूनच दोघेही भंडाऱ्यात भेटले आणि रात्र एकत्र घालवण्यासाठी एका लॉजवर थांबलेत. यावेळी तरुणाने "वायग्रा" (Viagra) गोळ्यांचं अतिसेवन केलं आणि त्यात तरुणाचा रक्तदाब (Blood Pressure) वाढल्याने हृदयविकाराने मृत्यू झाला.

आयुष्यभर साथ देण्याच्या आणाभाका घेतल्या, भंडाऱ्यात भेटण्याचं ठरलं  

मृत तरुण 27 वर्षीय असून तो नागपूर (Nagpur) जिल्ह्यातील आहे. तर, त्याची मैत्रीण 23 वर्षीय असून ती गोंदिया (Gondia) जिल्ह्यातील आहे. काही महिन्यांपूर्वी दोघांची एका ठिकाणी भेट झाली. त्यानंतर ओळखीचं रुपांतर हळूहळू मैत्रीत झालं. दोघांचं मोबाईलवर बोलणं वाढलं आणि कालांतराने मैत्री प्रेमात बदलली. दोघांनीही प्रेमाचं रुपांतर विवाहात करुन एकमेकांची आयुष्यभर साथ द्यायची अशा आणाभाका घातल्या. त्यामुळे एकदा भेटायचं असं दोघांनीही ठरवून तरुण नागपूर इथून तर तरुणी गोंदियातून भंडाऱ्यात पोहोचले. 

वायग्राच्या दोन गोळ्यांचं सेवनाने रक्तदाब वाढला आणि .... 

दिवसभर भंडाऱ्यात सोबत फिरले. शॉपिंग केली आणि रात्र एकत्र घालवायची म्हणून दोघांनीही भंडारा मध्यवर्ती बसस्थानका लगत असलेल्या हिरणवार लॉजवर मुक्काम करण्याचा बेत आखला. यावेळी तरुणाने मेडिकलमधून "वायग्रा" 100 mg शक्तीवर्धक गोळ्या खरेदी केल्या. मैत्रिणीसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी या तरुणाने चार पैकी दोन गोळ्यांचं म्हणजेच एकाचवेळी 200 mg गोळ्याचं सेवन केलं. गोळ्यांचं अतिसेवन केल्याने तरुणाचा अचानक रक्तदाब वाढला आणि त्यातच त्याला हृदयविकाराचा झटका झाल्याने तरुणाचं अंग थंडगार पडलं. त्यामुळे मैत्रिणीने लॉजच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने तरुणाला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या प्रकरणाची भंडारा पोलिसांनी नोंद केली असून अधिक तपास सुरु केला आहे.

शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होणार

मैत्रिणीसोबत रात्र घालवताना तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. तरुणाचा मृत्यू हा वायग्रा शक्तिवर्धक गोळ्यांच्या अतिसेवनाने झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे. मात्र, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच तरुणाच्या मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होणार आहे.

हेही वाचा

Bhandara: तीन वर्षीय चिमुकल्याला जमिनीवर आपटून ठार मारण्याचा प्रयत्न; मद्यपी बापाचा संतापजनक प्रकार

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jay Pawar Rutuja Patil Marriage : अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
Multibagger Stock : 50 पैशांचा स्टॉक पोहोचला 29.80 रुपयांवर, एक लाखांचे झाले 5.96 कोटी, जाणून घ्या मल्टीबॅगर स्टॉकबद्दल
50 पैशांचा स्टॉक पोहोचला 29.80 रुपयांवर, एक लाखांचे झाले 5.96 कोटी, जाणून घ्या मल्टीबॅगर स्टॉकबद्दल
Smriti Mandhana : स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...

व्हिडीओ

Special Report TET Exam : गुणवत्तेची परीक्षा का नकारताय सर? चांदा ते बांदा सर आणि मॅडम रस्त्यावर
Special Report Indigo Airline : इंडिगो जमिनीवर, प्रवासी गॅसवर, एअरपोर्टवर प्रवाशांची अलोट गर्दी
Special Report Ajit Pawar Dance  : जय की बारात, सेलिब्रेशन जोरात, बहारीनमध्ये विवाहसोहळा
Election Update : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय
Thackeray Sena Vs BJP Rada : ठाकरेंची शिवसेना, भाजपमध्ये कामगार युनियनवरुन राडा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jay Pawar Rutuja Patil Marriage : अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
Multibagger Stock : 50 पैशांचा स्टॉक पोहोचला 29.80 रुपयांवर, एक लाखांचे झाले 5.96 कोटी, जाणून घ्या मल्टीबॅगर स्टॉकबद्दल
50 पैशांचा स्टॉक पोहोचला 29.80 रुपयांवर, एक लाखांचे झाले 5.96 कोटी, जाणून घ्या मल्टीबॅगर स्टॉकबद्दल
Smriti Mandhana : स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
US Visa Social Media Policy : अमेरिकेला जायचंय, तुमच्या सोशल मीडियाची खात्यांची तपासणी होणार,  डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा नवा निर्णय
अमेरिकेचा व्हिसा हवाय, तुमचा सोशल मीडिया जपून वापरा, ट्रम्प प्रशासन तपासणी करणार
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
Embed widget