एक्स्प्लोर

Suresh Dhas : बीडच्या आरोपींना मोक्का लावा, बिनभाड्याच्या खोलीत ठेवा, यांचा 'तेरे नाम'मधील सलमान झाला पाहिजे; सरपंच आंदोलनातून सुरेश धसांचा आसूड

Santosh Deshmukh Murder Case : या प्रकरणात उज्ज्वल निकम यांच्याकडे केस कशी जाईल यासाठी आपण प्रयत्न करत असल्याचं आमदार सुरेश धस म्हणाले. सर्व आरोपींना मोक्का लावला पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली. 

मुंबई : संतोष देशमुखचा गुन्हा काय होता? गावातील एक दलित वॉचमनला मारहाण होताना तो रोखायला गेला, खंडणी मागणाऱ्यांना विरोध केला म्हणून त्याची निर्घुण हत्या केल्याचा आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केला. संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना मोक्का लावा, त्यांना बिनभाड्याच्या खोलीत ठेवा अशी मागणी त्यांनी केली. या आरोपींना त्यांच्या नातेवाईकांना आणि मित्रमंडळींना भेटू देऊ नका, त्यांची तेरे नाम चित्रपटातील सलमान खान सारखी अवस्था झाली पाहिजे असा टोलाही सुरेश धस यांनी लगावला. मुंबईतील सरपंच आंदोलनात सुरेश धस बोलत होते. 

कोणताही सरपंच धाडस करणार नाही

गावासाठी चांगलं काम करणाऱ्या संतोष देशमुखची हत्या झाली. तो पुढे जाऊन जिल्हा परिषद सदस्यही झाला असता. पण त्याची निर्घुण हत्या केल्यामुळे कोणताही सरपंच समाजसेवेचं काम करण्यासाठी पुढे येणार नाही. त्यामुळे सर्वांनी मिळून संतोष देशमुखच्या कुटुंबीयांना न्याय मिळेल याची काळजी घ्यायला पाहिजे असं आवाहन आमदार सुरेश धस यांनी केलं. 

काळ गेल्यानंतर काही गोष्टी विसरल्या जातात. पण कितीही काळ गेला तरी संतोष देशमुखला विसरले जाऊ शकते. पण तसं करू नका. शेवटपर्यंत ही गोष्ट मनात ठेवा. देशमुख कुटुंबीयांना कायम पाठिंबा द्या अस आवाहनही सुरेश धस यांनी केलं. 

'तेरे नाम' सलमान खान झाला पाहिजे

सुरेश धस म्हणाले की, "या प्रकरणात उज्ज्वल निकम यांना केस कशी मिळेल यासाठी मी प्रयत्न करतोय. यांना बिनभाड्याच्या खोलीत ठेवलं पाहिजे. जवळचे नातेवाईक, मित्रमंडळ कुणालाही त्यांना भेटता आलं नाही पाहिजे. यांना एकटं पाडू द्या.  यांची तेरे नाम चित्रपटातील सलमान खानसारखी अवस्था झाली पाहिजे. हे खुळेच झाले पाहिजेत. 

सुरेश धस म्हणाले की, "सरपंचाचा गुन्हा काय होता? एका दलित वॉचमनना मारू नका सांगायला गेला, खंडणी घेऊ नका म्हणाला. त्यामुळेच त्याचा निर्घुण खून करण्यात आला. त्याच्या मारहाणीचं चित्रिकरण करण्यात आलं, व्हिडीओ कॉल करण्यात आला. या प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठी अनेक गोष्टी करण्यात आल्या. मध्येच सेलिब्रेटी आणण्यात आल्या आणि इतरही प्रकार करण्यात आले. पण या प्रकरणावरून आपलं लक्ष हटू देऊ नका."

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bacchu Kadu: ऐकलं तर ठीक नाही तर 'हटा सावन की घटा'; शेतकरी, मेंढपाळांच्या आंदोलनातून बच्चू कडूंचा सरकारवर 'प्रहार'   
ऐकलं तर ठीक नाही तर 'हटा सावन की घटा'; शेतकरी, मेंढपाळांच्या आंदोलनातून बच्चू कडूंचा सरकारवर 'प्रहार'   
Nashik News : सनई, चौघडे वाजणाऱ्या घरातून निघाल्या दोन अंत्ययात्रा; मुलाच्या लग्नाआधी आई-वडिलांनी संपवलं जीवन, रात्रीचं जेवण ठरलं शेवटचं
सनई, चौघडे वाजणाऱ्या घरातून निघाल्या दोन अंत्ययात्रा; मुलाच्या लग्नाआधी आई-वडिलांनी संपवलं जीवन, रात्रीचं जेवण ठरलं शेवटचं
मनोज जरांगे पाटील, अंजली दमानियांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; गुन्हा दाखल, नेमकं काय आहे कारण?
मनोज जरांगे पाटील, अंजली दमानियांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; गुन्हा दाखल, नेमकं काय आहे कारण?
धनंजय मुंडेंमध्ये इतकं काय की फडणवीस अन् अजितदादा कोणताच निर्णय घेत नाहीत? छत्रपती संभाजीराजे कडाडले
धनंजय मुंडेंमध्ये इतकं काय की फडणवीस अन् अजितदादा कोणताच निर्णय घेत नाहीत? छत्रपती संभाजीराजे कडाडले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Health Officer on HMPV : HMPV कोरोना व्हायरससारखा नाही, सामान्य माणसाने काय काळजी घ्यावी?Pankaja Munde Speech : अजित पवार,फडणवीस बीडमधील राजकीय पर्यावरण सुधारू शकतीलDhananjay Deshmukh : बीड सरपंच हत्याप्रकरणाला जातीय रंग देऊ नका, धनंजय देशमुखांची मागणीABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 07 January 2025 दुपारी 3 च्या हेडलाईन्स-

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bacchu Kadu: ऐकलं तर ठीक नाही तर 'हटा सावन की घटा'; शेतकरी, मेंढपाळांच्या आंदोलनातून बच्चू कडूंचा सरकारवर 'प्रहार'   
ऐकलं तर ठीक नाही तर 'हटा सावन की घटा'; शेतकरी, मेंढपाळांच्या आंदोलनातून बच्चू कडूंचा सरकारवर 'प्रहार'   
Nashik News : सनई, चौघडे वाजणाऱ्या घरातून निघाल्या दोन अंत्ययात्रा; मुलाच्या लग्नाआधी आई-वडिलांनी संपवलं जीवन, रात्रीचं जेवण ठरलं शेवटचं
सनई, चौघडे वाजणाऱ्या घरातून निघाल्या दोन अंत्ययात्रा; मुलाच्या लग्नाआधी आई-वडिलांनी संपवलं जीवन, रात्रीचं जेवण ठरलं शेवटचं
मनोज जरांगे पाटील, अंजली दमानियांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; गुन्हा दाखल, नेमकं काय आहे कारण?
मनोज जरांगे पाटील, अंजली दमानियांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; गुन्हा दाखल, नेमकं काय आहे कारण?
धनंजय मुंडेंमध्ये इतकं काय की फडणवीस अन् अजितदादा कोणताच निर्णय घेत नाहीत? छत्रपती संभाजीराजे कडाडले
धनंजय मुंडेंमध्ये इतकं काय की फडणवीस अन् अजितदादा कोणताच निर्णय घेत नाहीत? छत्रपती संभाजीराजे कडाडले
मोठी बातमी:  अंथरुणाला खिळलेल्या आसाराम बापूला सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर
मोठी बातमी: अंथरुणाला खिळलेल्या आसाराम बापूला सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर
Raj Thackeray MNS: राज ठाकरे मनसेत मोठे बदल करणार, बैठकीत उद्धव ठाकरेंसोबत युतीच्या मुद्द्यावरही महत्त्वाची चर्चा
राज ठाकरे मनसेत मोठे बदल करणार, बैठकीत उद्धव ठाकरेंसोबत युतीच्या मुद्द्यावरही महत्त्वाची चर्चा
मालेगावातील पैशांचा वापर 'व्होट जिहाद'साठीच, किरीट सोमय्यांचा आरोप; काँग्रेस खासदारांचा जोरदार पलटवार; म्हणाल्या, त्यांनी विनाकारण...
मालेगावातील पैशांचा वापर 'व्होट जिहाद'साठीच, किरीट सोमय्यांचा आरोप; काँग्रेस खासदारांचा जोरदार पलटवार; म्हणाल्या, त्यांनी विनाकारण...
दादरच्या पॉश एरियात ऑफिस, हिऱ्यांचा लखलखाट अन् घसघशीत रिटर्न्सचं आमिष दाखवून गंडवलं; 'टोरेस'चा मालक रातोरात दुबईला फरार?
दादरच्या पॉश एरियात ऑफिस, हिऱ्यांचा लखलखाट अन् घसघशीत रिटर्न्सचं आमिष दाखवून गंडवलं; 'टोरेस'चा मालक रातोरात दुबईला फरार?
Embed widget