OBC Reservations: ओबीसींच्या समर्थनार्थ हातोलामध्ये उपोषण करणाऱ्यांची तब्येत खालावली; भीमराव धोंडे यांची उपोषणाला भेट
OBC Reservations: ओबीसींच्या समर्थनार्थ आष्टी तालुक्यातील हातोला येथे गेल्या दोन दिवसांपासून उपोषण सुरू आहे.
OBC Reservations: ओबीसींच्या समर्थनार्थ आष्टी तालुक्यातील हातोला येथे गेल्या दोन दिवसांपासून उपोषण सुरू आहे. यावेळी उपोषणकर्त्याची तब्येत खालावली आहे. आज भाजपचे माजी आमदार भीमराव धोंडे यांनी भेट देऊन सरकारने तात्काळ ओबीसी समाजालाचे उपोषणस्थळी येऊन ओबीसींच्या मागण्या समजून घ्यावेत व उपोषण सोडावे आशी मागणी केली आहे.
जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके व वाघमारे हे उपोषणाला बसले असून त्यांच्या उपोषणास संपूर्ण महाराष्ट्रातून ओबीसी समाज पाठिंबा देत आहे. उपोषणाचा आज सहावा दिवस असून राज्यभरातून लाखो लोक वडीगोद्री येथे आपला पाठिंबा दर्शवण्यासाठी जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील सर्व ओबीसी बंधू यांनी एकच पर्व ओबीसी सर्व हाक दिली असून आज पाटोदा तालुक्यातील जवळजवळ दीडशे ते 100 गाड्या भरून ओबीसी समाजा वडीगोद्रीकडे रवाना झाल्या आहेत.
हिंगोलीमधून हजारो ओबीसी समाज बांधव वडीगोद्रीकडे रवाना-
मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देऊ नये यासाठी प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी उपोषण सुरू केला आहे आणि याच उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आता हिंगोली जिल्ह्यातून हजारो ओबीसी समाज बांधव जालना जिल्ह्यातील वडीगोद्री गावाच्या दिशेने निघाले आहेत लक्ष्मण हाके यांच्या मागण्या सरकारने मान्य कराव्यात आणि मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देऊ नये या मागणीसाठी हे ओबीसी समाज बांधव हिंगोलीकडे निघाले आहेत
ओबीसी आंदोलकांवर गुन्हे दाखल
वडीगोद्री जवळ धुळे सोलापूर महामार्गावर टायर जवळून रास्ता अडवल्याप्रकरणी आंदोलकावर गुन्हे दाखल, वडीगोद्री आणि जामखेड फाट्यावर आंदोलकांनी काल टायर जळून निषेध व्यक्त केला होता. गोंदी आणि अंबड पोलीस ठाण्यात 6 ज्ञात आणि 30 ते 31अज्ञात आरोपीवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गैर कायदा मंडळी जमा करणे, वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
57 लाख कुणबी प्रमाणपत्रांचा घोटाळा: हाके
लक्ष्मण हाके यांनी राज्यात कुणबी नोंदी असलेल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र वाटण्याच्या प्रक्रियेवर आक्षेप घेतला होता. गेल्या काही महिन्यांमध्ये राज्यात 57 लाख कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले आहे. हा एक मोठा घोटाळा आहे. कुणबी दाखले कोणत्या अधिकारात आणि कोणत्या निकषावर दिले हे आम्हाला शासनाने सांगावं. मनोज जरांगे पाटील म्हणतात की, मी 80 टक्के मराठ्यांना ओबीसीत घुसवले आहे. हे जर खरं असेल तर ओबीसींच्या आरक्षणावर अतिक्रमण झालेले आहे. मग राज्य सरकार ओबीसी आरक्षणाचे रक्षण कसे करणार, असा सवाल लक्ष्मण हाके यांनी उपस्थित केला होता.
आणखी वाचा-