Manoj Jarange : तयारीला लागा, 20 जानेवारी रोजी मुंबईत आमरण उपोषण; तुम्ही ट्रॅक्टर जप्त करू शकाल, मराठ्यांना दाबू शकणार नाही, मनोज जरांगे यांचा इशारा
Manoj Jarange Beed Sabha : अंतरवाली सराटीनंतर आता 20 जानेवारीपासून मुंबईत आमरण उपोषण करण्याचा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.
![Manoj Jarange : तयारीला लागा, 20 जानेवारी रोजी मुंबईत आमरण उपोषण; तुम्ही ट्रॅक्टर जप्त करू शकाल, मराठ्यांना दाबू शकणार नाही, मनोज जरांगे यांचा इशारा manoj jarange maratha reservation on 20 january at mumbai azad maidan maharashtra latest marathi news Manoj Jarange : तयारीला लागा, 20 जानेवारी रोजी मुंबईत आमरण उपोषण; तुम्ही ट्रॅक्टर जप्त करू शकाल, मराठ्यांना दाबू शकणार नाही, मनोज जरांगे यांचा इशारा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/22/4266a2a249fb8fcfc24d61827456a7231697968193483290_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
बीड: राज्य सरकार वेळकाढूपणा करत मराठ्यांची फसवणूक करतंय, आम्हालासुद्धा मर्यादा आहे, आम्ही तरी किती दिवस दम काढणार? मराठ्यांना विचारल्याशिवाय मी काही करणार नाही. आपण फक्त लढायचं नाही तर जिंकायचं सुद्धा आहे असं मनोज जरांगे (Manoj Jarange) म्हणाले. त्यामुळे अंतरवाली सराटीनंतर आता मुंबईत धडकायचं आहे असं म्हणत 20 जानेवारीपासून मुंबईत मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आमरण उपोषण करण्याची मोठी घोषणा मनोज जरांगे यांनी केली आहे.
मराठा आरक्षणालाठी लढणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी 18 जानेवारीपर्यंत नोटिस दिल्या आहेत. त्यावर बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, तुम्ही ट्रॅक्टर दाबू शकता, पण मराठ्यांना दाबू शकणार नाही. आतापर्यंत खूप झालं. आता मुंबईत 20 जानेवारी रोजी मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण करण्यात येईल. त्यासाठी मराठ्यांनी शांततेत मुंबईत यायचं.
मराठा आंदोलनात जाळपोळ करू नका, जो जाळपोळ करेल तो आपला नाही असं मनोज जरांगे म्हणाले.
त्या आमदारांना दारातसुद्धा उभा करू नका
जे आमदार आणि खासदार मराठा आंदोलनासाठी समाजाला साथ देत नाही, त्यांना यापुढे दारातही उभे करू नका असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं. मनोज जरांगे म्हणाले की, "आतापर्यंत मराठ्यांच्या जीवावर हे आमदार, खासदार झाले, पण मराठा आरक्षणाच्या विषयावर कितीजण पुढे आले. आता यापुढे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जे साथ देणार नाहीत त्या आमदारांना दारातही उभा करू नका. जो मराठा आरक्षणासाठी लढेल तो आपला."
शांततेत आंदोलन करा, ते ब्रह्मात्र आहे
सरकारने पुन्हा एकदा डाव रचला. मराठा समाजातील आंदोलकांना नोटिसा दिल्या. ट्रॅक्टर घेऊन सभेला गेला तर तो जप्त केला जाईल असं त्यात म्हटलंय. महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी आंदोलन करायचं पण शांततेत, ते ब्रह्मात्र आहे. शांततेत आंदोलन केल्यास ते थांबवायचं कुणाच्यात हिंमत नाही.
मी मॅनेज होत नाही हा सरकारचा प्रॉब्लेम
मी यांना मॅनेज होत नाही हाच यांचा प्रॉब्लेम आहे. मी जिवंत असेपर्यंत मराठा आरक्षण मिळवून देणारच. मराठा समाज आणि माझं नातं हे माय-लेकाचं आहे. मराठा समाजाच्या पुढच्या पीढीला आरक्षण मिळवून देणार. या आधीच्या पीढीचे आयुष्य आरक्षणाविना उद्ध्वस्त झालं. आता मराठा जागा झाला आहे.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)