Manoj Jarange : मराठा आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईतून परत येणार नाही, बीडच्या रॅलीत मनोज जरांगेंची गर्जना, 10 मोठे मुद्दे!
Manoj Jarange Beed Sabha : सरकारने शहाणपणाची भूमिका घ्यावी आणि मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशी मागणी मनोज जरांगे यांनी बीडमधील सभेतून केली.
Manoj Jarange Beed Sabha Speech Highlights : तुम्ही नोटिसा देऊन ट्रॅक्टर जप्त करू शकाल पण मराठा समाजाला कसं दाबू शकाल असा प्रश्न विचारत मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी विचारत बीडमधील सभेत एक मोठी घोषणा केली आहे. अंतरवाली सराटीनंतर आता मराठा आरक्षणाचं (Maratha Reservation) वादळ मुंबई धडकणार असून 20 जानेवारी रोजी आझाद मैदानावर मनोज जरांगे आमरण उपोषण करणार आहेत. या आंदोलनासाठी राज्यभरातून मराठा समाजाने यावं असं आवाहनही त्यांनी केलं. आता देव जरी आडवा आला तरी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण घेणार, सरकार मराठा आरक्षण कसं देत नाही ते पाहू असा इशाराही त्यांनी दिला.
मनोज जरांगे यांच्या भाषणातील 10 मोठे मुद्दे (Manoj Jarange Beed Sabha Speech 10 Highlights)
1) अंतरवाली सराटीनंतर आता मराठ्यांचं वादळ मुंबईत धडकणार, 20 जानेवारी रोजी मुंबईत मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणार.
2) मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जे आमदार आणि खासदार समाजाची साथ देणार नाहीत त्यांना यापुढे दारातही उभे करून घेऊ नका.
3) मनोज जरांगे मराठा समाजाला आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईतून माघार येणार नाही.
4) बीडमध्ये मराठ्यांचं वादळ, मराठ्यांचा प्रलय, मुंगी शिरायला जागा नाही, या गर्दीला नतमस्तक, हा मराठ्यांच्या एकजुटीचा विजय.
5) बीडमध्ये घरं, हॉटेल जाळले, पण आपल्यावर डाग लावला, यांनीच स्वत:च्या घराला आग लावली, आमची पोरं त्यात गुंतवली. आतापर्यंत शांततेत मोर्चे काढणारा मराठा समाज कुणाची घरं जाळेल का?
6) मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांना विनंती आहे, सरकारने शहाणपणची भूमिका घ्यावी
7) देशातील सगळ्या मोठ्या जातींचा घात करण्याचा तुम्ही घाट घातला आहे असे वाटायला लागले आहे. पण आता मराठा समाज जागा झाला आहे.
8) आमच्या नादाला लागाल तर राजकीय अस्तित्व संपवू, आता आरक्षण नाही दिले तर सरकारला जड जाणार.
9) यांचा प्रॉब्लेम एकच आहे, मी यांना मॅनेजच होत नाही. मी जोपर्यंत आहे, तोपर्यंत मराठ्यांची एकजूट तुटू देणार नाही.
9) देव जरी आडवा आला तरी मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण घेणार. पोरांना अटक झाली तर आमदार आणि मंत्र्यांच्या घरी जावून बसा.
10) जातीपेक्षा मोठा नेता मानू नका, आपली मते घेण्यापुरता दारी आला तर त्याला चपलेने बडवा.
ही बातमी वाचा: