एक्स्प्लोर

Beed News: बीडच्या डीपीडीसीत नामनिर्देशित सदस्य म्हणून नमिता मुंदडा, विजयसिंह पंडित यांची वर्णी, सुरेश धस, प्रकाश सोळंकेंना टाळलं

Beed News: संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर सुरेश धस आणि प्रकाश सोळंके यांनी सातत्याने धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. अजितदादांचा विरोधकांना धक्का.

बीड: बीड जिल्ह्यात नियोजन समितीच्या बैठकीसाठी येत असताना पालकमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यातील राजकीय नियोजनाला सुरुवात केली आहे. बीड जिल्हा नियोजन समितीच्या विधीमंडळ सदस्यांमधून नामनिर्देशित करायच्या दोन सदस्यांमधून राष्ट्रवादीच्या कोट्यातून आमदार विजयसिंह पंडित तर भाजपच्या कोट्यातून आमदार नमिता मुंदडा (Namit Mundada) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा नियोजन सदस्य समितीमधून सुरेश धस (Suresh Dhas) आणि प्रकाश सोळंके यांना वगळण्यात आले आहे. हा सुरेश धस आणि प्रकाश सोळंके यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे हितसंबंध असल्याचा आरोप सुरेश धस आणि प्रकाश सोळंके सातत्याने करत होते. या नेत्यांनी धनंजय मुंडे यांच्या मंत्रि‍पदाच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यामुळेच अजित पवार या दोन्ही विरोधकांना धक्का दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. 

राज्यात महायुती सरकार आल्यानंतर राज्यातील सर्वच नियोजन समित्यांवरील नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे नियोजन समित्यांवर केवळ पालकमंत्री, जिल्हाधिकारी हेच राहिले होते. आता बीड जिल्हा नियोजन समितीवर विधीमंडळ सदस्यांमधून नामनिर्देशित करायच्या दोन जागांवर गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित, केजच्या आमदार नमिता मुंदडा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे आणि बीड जिल्हा नियोजन समितीवर नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. मात्र, बीड जिल्ह्यातील निर्णय हा भाजप आणि राष्ट्रवादीच्या जुन्या विधानमंडळ सदस्यांना हा धक्का मानला जात आहे. या निर्णयाचे महायुतीत काही पडसाद उमटणार का, हे बघावे लागेल.

दरम्यान, अजित पवार हे गुरुवारी सकाळी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी बीडमध्ये दाखल झाले. यावेळी परळीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात अजित पवार यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी मंत्री धनंजय मुंडे उपस्थित होते. यावेळी अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी, खंडणीखोरी खपवून घेतली जाणार नाही, असा रोखठोक इशारा दिला. जे लोक चुकीचे काम करतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. सातत्याने गुन्हे करणाऱ्यांना मकोका लावला जाईल. तसेच रिव्हॉल्व्हर दाखवून रील तयार करणाऱ्यांचे लायसन्स रद्द केले जाईल, असे अजित पवार यांनी सांगितले. 

पुण्यात जिल्हा नियोजन समितीची बैठक

पुण्यात आज जिल्हा नियोजन समितीची बैठक होतेय. उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली संध्याकाळी चार वाजता होणार असलेल्या या बैठकीत निधी वाटपावरुन सत्ताधारी महायुती आणि विरोधात असलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया उमटण्याची शक्यताय. जिल्हा प्रशासनाने पुण्याच्या विकासासाठी 1 हजार 91 कोटी 45 लाख रुपयांचा आराखडा तयार केलाय. पुण्यातील पायाभुत सुविधांच्या विकासासाठी हा आराखडा महत्वाचा असणार आहे. या बैठकीला आमदार - अजित पवार , चंद्रकांत पाटील,  दत्तात्रय भरणे, माधुरी मीसाळ , हेमंत रासने , बापू पठारे, विजय शिवतारे, राहूल कुल , शंकर मांडेकर , माऊली कटके, सुनिल कांबळे, चेतन तुपे, शरद सोनवणे, दिलीप वळसे पाटील , बाबाजी काळे, अन्ना बनसोडे , खासदार  सुप्रिया सुळे , मेधा कुलकर्णी हे लोकप्रतिनिधी उपस्थित असतील.

आणखी वाचा

अजित पवारांनी बीडमध्ये सगळ्यांची खरडपट्टी काढली, गुन्हेगारांना इशारा; धडाकेबाज भाषणाची जोरदार चर्चा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : ते तर आमचे मित्र...; उद्धव ठाकरे अन् चंद्रकांत पाटलांच्या भेटीनंतर राऊतांचा सूर बदलला!
ते तर आमचे मित्र...; उद्धव ठाकरे अन् चंद्रकांत पाटलांच्या भेटीनंतर राऊतांचा सूर बदलला!
Supriya Sule : अजितदादा बीडमध्ये असतानाच सुप्रिया सुळे आक्रमक; संतोष देशमुख प्रकरणावरून थेट दिल्लीत अमित शाहांच्या दरबारी धडकणार; म्हणाल्या...
अजितदादा बीडमध्ये असतानाच सुप्रिया सुळे आक्रमक; संतोष देशमुख प्रकरणावरून थेट दिल्लीत अमित शाहांच्या दरबारी धडकणार; म्हणाल्या...
Donald Trump : मामला तब्बल 432 कोटींचा! डोनाल्ड ट्रम्प यांनी आता कंडोम वाटपाचा निधी रोखला, जगात चर्चा रंगली, थेट एलाॅन मस्क चौकशी करणार, प्रकरण नेमकं काय?
मामला तब्बल 432 कोटींचा! डोनाल्ड ट्रम्प यांनी आता कंडोम वाटपाचा निधी रोखला, थेट एलाॅन मस्क चौकशी करणार, प्रकरण नेमकं काय?
Beed News: अजित पवारांचा बीडमध्ये मोठा निर्णय, सुरेश धस आणि प्रकाश सोळंकेंना जिल्हा नियोजन समितीमधून हटवलं
अजित पवारांचा बीडमध्ये मोठा निर्णय, सुरेश धस आणि प्रकाश सोळंकेंना जिल्हा नियोजन समितीमधून हटवलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Supriya Sule PC : दम देतात तर राजीनामा का घेत नाहीत याचं उत्तर दादांनी द्यावं : सुप्रिया सुळेSupriya Sule Pune : पुण्यातच नाही तर इतर ठिकाणीही पाणी प्रदूषणाचा प्रश्न : सुप्रिया सुळेAjit Pawar Beed Speech : सहन करणार नाही, मकोका लावेन !अजितदादांचा सज्जड दमABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 8 AM : 30 Jan 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : ते तर आमचे मित्र...; उद्धव ठाकरे अन् चंद्रकांत पाटलांच्या भेटीनंतर राऊतांचा सूर बदलला!
ते तर आमचे मित्र...; उद्धव ठाकरे अन् चंद्रकांत पाटलांच्या भेटीनंतर राऊतांचा सूर बदलला!
Supriya Sule : अजितदादा बीडमध्ये असतानाच सुप्रिया सुळे आक्रमक; संतोष देशमुख प्रकरणावरून थेट दिल्लीत अमित शाहांच्या दरबारी धडकणार; म्हणाल्या...
अजितदादा बीडमध्ये असतानाच सुप्रिया सुळे आक्रमक; संतोष देशमुख प्रकरणावरून थेट दिल्लीत अमित शाहांच्या दरबारी धडकणार; म्हणाल्या...
Donald Trump : मामला तब्बल 432 कोटींचा! डोनाल्ड ट्रम्प यांनी आता कंडोम वाटपाचा निधी रोखला, जगात चर्चा रंगली, थेट एलाॅन मस्क चौकशी करणार, प्रकरण नेमकं काय?
मामला तब्बल 432 कोटींचा! डोनाल्ड ट्रम्प यांनी आता कंडोम वाटपाचा निधी रोखला, थेट एलाॅन मस्क चौकशी करणार, प्रकरण नेमकं काय?
Beed News: अजित पवारांचा बीडमध्ये मोठा निर्णय, सुरेश धस आणि प्रकाश सोळंकेंना जिल्हा नियोजन समितीमधून हटवलं
अजित पवारांचा बीडमध्ये मोठा निर्णय, सुरेश धस आणि प्रकाश सोळंकेंना जिल्हा नियोजन समितीमधून हटवलं
GBS Outbreak : पुणे, कोल्हापूरनंतर आता सांगली जिल्ह्यातही जीबीएसचा शिरकाव; सहा रुग्णांना लागण
पुणे, कोल्हापूरनंतर आता सांगली जिल्ह्यातही जीबीएसचा शिरकाव; सहा रुग्णांना लागण
धक्कादायक! लाडकी बहीण योजनेत परराज्यातील लाभार्थ्यांची घुसखोरी, बोगस लॉगिन करत 1171 अर्ज आले, नक्की घोळ काय?
धक्कादायक! लाडकी बहीण योजनेत परराज्यातील लाभार्थ्यांची घुसखोरी, बोगस लॉगिन करत 1171 अर्ज आले, नक्की घोळ काय?
Ahilyanagar Crime : पुण्यातील अनाथ मुलीशी लग्न लावून देण्याचं आमिष, अहिल्यानगरच्या लग्नाळू मुलाकडून उकळले तब्बल 5 लाख
पुण्यातील अनाथ मुलीशी लग्न लावून देण्याचं आमिष, अहिल्यानगरच्या लग्नाळू मुलाकडून उकळले तब्बल 5 लाख
Ajit Pawar in Beed: तुमच्या चुकांवर पांघरुण घालून माझं पांघरुण अन् पदर फाटून गेलाय; बीडमध्ये अजित पवारांचं वक्तव्य
तुमच्या चुकांवर पांघरुण घालून माझं पांघरुण अन् पदर फाटून गेलाय; बीडमध्ये अजित पवारांचं वक्तव्य
Embed widget