एक्स्प्लोर

Ajit Pawar in Beed: अजित पवारांनी बीडमध्ये सगळ्यांची खरडपट्टी काढली, गुन्हेगारांना इशारा; धडाकेबाज भाषणाची जोरदार चर्चा

Beed News: गुन्हेगारांना वॉर्निंग, कुंडली मारुन बसलेल्या अधिकाऱ्यांच्या बदलीचे संकेत; अजित पवारांनी बीडचा चार्ज हाती घेताच सगळ्यांची खरडपट्टी काढली

बीड: बीड जिल्ह्यात कोणी कुठल्या गोष्टीसाठी जबाबदार असेल, जर कोणी वेडेवाकडे प्रकार करणार असेल किंवा कोणी विकासकामांच्या आड येत असेल तर मी ते खपवून घेणार नाही. वेळ पडल्यास अशा लोकांवर मकोका लावायला मागेपुढे पाहणार नाही. जिथे तथ्य असेल तिथे कारवाई केली जाईल, पण जिथे तथ्य नसेल त्या वेळी कारवाई केली जाणार नाही, अशा रोखठोक शब्दांत गुरुवारी बीडचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपली भूमिका मांडली. अजित पवार गुरुवारी सकाळी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी बीडमध्ये दाखल झाले. यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना बीड (Beed News) जिल्ह्यातील गुन्हेगारी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा दिला. 

अजित पवार हे कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना धनंजय मुंडे हाताची घडी घालून त्यांच्या बाजूला उभे होते. यावेळी अजित पवार यांनी बीडमधील गुन्हेगारांना निर्वाणीचा इशारा दिला. यापुढे बीडमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती आणि कृत्यांना थारा दिला जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. मी बीडचे पालकमंत्रीपद स्वीकारत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितले होते, याठिकाणी चांगले अधिकारी पाहिजेत. मी आता बीडमधील अधिकाऱ्यांकडे बघणार आहे. काही अधिकारी बरीच वर्षे याठिकाणी आहेत. मी त्यामध्ये दुरुस्ती करणार आहे. मी काम करताना भेदभाव करत नाही. बीड कष्टकरी समाज मोठ्याप्रमाणावर राहतो. मी काम करताना जातीपाती नात्यागोत्याचा विचार केलेला नाही. बीड जिल्ह्यात जातीय सलोखा कायम राहिला पाहिजे. जिल्ह्यात चुकीच्या गोष्टी पूर्वापार चालत आल्या असतील तर त्याला आळा घातला पाहिजे. मी बीडमधील काही लोकांचे रिव्हॉल्व्हर हवेत उंचावून, कंबरेला लावून फिरतानाचे रील सोशल मीडियावर पाहिले आहेत. पुन्हा अशा गोष्टी दिसल्या तर खपवून घेतले जाणार नाही, संबंधितांचे लायसन्स रद्द केले जाील. मी सगळ्यांना सारखा नियम लावणार. बीड जिल्ह्यात बदल झाला पाहिजे, तो मला आणि नागरिकांना जाणवला पाहिजे, असे अजित पवार यांनी ठणकावून सांगितले.

बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी हा गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात चर्चेचा विषय झाला आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी पालकमंत्री म्हणून बीड जिल्ह्याची प्रतिमा बदलण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना कदापी संरक्षण दिले जाणार नाही, असे त्यांनी सांगितले. मी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांना सांगतो की, आपलं चारित्र्य आणि प्रतिमा स्वच्छ ठेवा. चुकीच्या प्रवृत्तीची लोकं आपल्या आजुबाजूला राहता कामा नये, याची काळजी घ्या. यापुढे पोलिसांच्या कारवाईत राजकीय हस्तक्षेप चालणार नाही. मी कोणावरही अन्याय होऊ देणार नाही. हे नव्याचे नऊ दिवस समजू नका, असे अजित पवार यांनी सांगितले.

काहीजण मला इकडे आल्यावर भलामोठा हार, बुके किंवा पांडुरंगाची मूर्ती देतात. पण या लोकांना साधुसंतांचे विचारही लक्षात घेतले पाहिजेत. दादा आला तर आता काही काळजी नाही, असा विचार करत असाल तर तो मनातून काढून टाका. मी तुमच्या जवळचा असलो तरी चुकीचं वागू नका, असे अजित पवार यांनी खडसावून सांगितले.

आणखी वाचा

अजित पवारांनी बीडमध्ये पाऊल ठेवताच धनुभाऊ स्वागताला पोहोचले, डीपीडीसीच्या बैठकीकडे सर्वांच्या नजरा

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 डिसेंबर 2025 | मंगळवार
BMC Election: इकडं राहुल नार्वेकरांच्या घरात तब्बल तिघांना भाजपची उमेदवारी अन् तिकडं थेट मुंबई भाजप उपाध्यक्षांनीच बंडाचं निशाण फडकावलं!
इकडं राहुल नार्वेकरांच्या घरात तब्बल तिघांना भाजपची उमेदवारी अन् तिकडं थेट मुंबई भाजप उपाध्यक्षांनीच बंडाचं निशाण फडकावलं!
Maharashtra Mahnagarpalika Election 2026: शेवटच्या दिवशी राज्यभरात उद्रेक, युती-आघाडींमध्ये बिघाडी, कोणत्या मनपात लढत कशी?
शेवटच्या दिवशी राज्यभरात उद्रेक, युती-आघाडींमध्ये बिघाडी, कोणत्या मनपात लढत कशी?
भाजपच्या चांदा ते बांदापर्यंत आयारामांना पायघड्या घालत रेड कार्पेट, नवनाथ बनना सुद्धा 'बक्षिसी'; सुषमा अंधारेंचा 'केशवराव' म्हणत फक्त आठच शब्दात खोचक टोला
भाजपच्या चांदा ते बांदापर्यंत आयारामांना पायघड्या घालत रेड कार्पेट, नवनाथ बनना सुद्धा 'बक्षिसी'; सुषमा अंधारेंचा 'केशवराव' म्हणत फक्त आठच शब्दात खोचक टोला!

व्हिडीओ

Sambhajinagar Angry Candidate : तिकीट नाकरलं, भाजप महिला पदाधिकाऱ्याचा संभाजीनगरमध्ये तुफान राडा
Sana Malik on BMC Election : आमच्या शिवाय मुंबईचा महापौर बसणार नाही,सना मलिकांचा दावा
Pune Mahapalika Election : एबी फॉर्मसाठी थंडीतही कार्यकर्त्यांनी ठोकला मुक्काम
Rahul Chavan On Eknath Shinde : पक्षाने माझा केसाने गळा कापला, शिंदेंसोबत गेलेल्या राहुल चव्हाणांची प्रतिक्रिया
Durgeshwari Kosekar Nagpur : भाजपकडून सिव्हिल इंजिनिअर दुर्गेश्वरी कोसेकरला उमेदवारी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 डिसेंबर 2025 | मंगळवार
BMC Election: इकडं राहुल नार्वेकरांच्या घरात तब्बल तिघांना भाजपची उमेदवारी अन् तिकडं थेट मुंबई भाजप उपाध्यक्षांनीच बंडाचं निशाण फडकावलं!
इकडं राहुल नार्वेकरांच्या घरात तब्बल तिघांना भाजपची उमेदवारी अन् तिकडं थेट मुंबई भाजप उपाध्यक्षांनीच बंडाचं निशाण फडकावलं!
Maharashtra Mahnagarpalika Election 2026: शेवटच्या दिवशी राज्यभरात उद्रेक, युती-आघाडींमध्ये बिघाडी, कोणत्या मनपात लढत कशी?
शेवटच्या दिवशी राज्यभरात उद्रेक, युती-आघाडींमध्ये बिघाडी, कोणत्या मनपात लढत कशी?
भाजपच्या चांदा ते बांदापर्यंत आयारामांना पायघड्या घालत रेड कार्पेट, नवनाथ बनना सुद्धा 'बक्षिसी'; सुषमा अंधारेंचा 'केशवराव' म्हणत फक्त आठच शब्दात खोचक टोला
भाजपच्या चांदा ते बांदापर्यंत आयारामांना पायघड्या घालत रेड कार्पेट, नवनाथ बनना सुद्धा 'बक्षिसी'; सुषमा अंधारेंचा 'केशवराव' म्हणत फक्त आठच शब्दात खोचक टोला!
PMC Election 2026 : पुणे महापालिकेत युती आघाडी कागदावरच, सर्व पक्ष रिंगणात उतरले, पुण्यात बहुरंगी लढतींचं चित्र
पुणे महापालिकेत युती आघाडी कागदावरच, सर्व पक्ष रिंगणात उतरले, पुण्यात बहुरंगी लढतींचं चित्र
BMC Election : मुंबईत प्रकाश सुर्वेंविरोधात शिवसैनिकांची निदर्शनं, वॉर्ड क्रमांक 3 भाजपकडे गेल्यानं सुर्वेंना काळे झेंडे दाखवले, प्रविण दरेकरांचा भाऊ रिंगणात
आमदार प्रकाश सुर्वेंविरोधात शिवसैनिकांची निदर्शनं, वॉर्ड क्रमांक 3 भाजपकडे गेल्यानं सुर्वेंना काळे झेंडे दाखवले
BMC Election: इकडं भाजपच्या आयारामांना पायघड्या घालून रेड कार्पेट, चेंबूरमध्ये निष्ठावंतांचा नाराजीचा स्फोट; तिकडं माजी खासदार राहुल शेवाळेंच्या निर्णयानं भूवया उंचावल्या!
इकडं भाजपच्या आयारामांना पायघड्या घालून रेड कार्पेट, चेंबूरमध्ये निष्ठावंतांचा नाराजीचा स्फोट; तिकडं माजी खासदार राहुल शेवाळेंच्या निर्णयानं भूवया उंचावल्या!
BMC Election 2026: रामदास आठवलेंचा भाजपला धक्का, मुंबईतील 39 वॉर्डात रिपाईचे उमेदवार रिंगणात उतरवले, कोणाला संधी?
रामदास आठवलेंचा भाजपला धक्का, मुंबईतील 39 वॉर्डात रिपाईचे उमेदवार रिंगणात उतरवले, कोणाला संधी?
Embed widget