Car : Volvo XC40 Recharge VS Kia EV6 कोणती कार सर्वात भारी? वाचा संपूर्ण माहिती
Volvo XC40 Recharge VS Kia EV6 : इलेक्ट्रिक कारचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे कारचा रेंज. XC40 की Kia EV6 कोणत्या कारचा रेंज सर्वात जास्त आहे हे जाणून घ्या.
Volvo XC40 recharge VS Kia EV6 : Volvo ने कालच (26 जुलै रोजी) भारतात आपली पहिली इलेक्ट्रिक कार (EV) Volvo XC40 Recharge लॉंच केली. तर, 3 जून रोजी इलेक्ट्रिक कारच्याच्या सेगमेंटमध्ये सतत पुढे जात असलेल्या Kia india ने आपली नवीन इलेक्ट्रिक कार Kia EV6 भारतीय बाजारात लॉन्च केली. या दोन्ही इलेक्ट्रिक कार आहेत. आम्ही या दोन्ही कारची एकमेकांशी तुलना केली असता काही गोष्टी जाणवल्या. त्या कोणत्या हे जाणून घ्या.
Volvo XC40 Recharge आणि Kia EV6 श्रेणी
XC40 रिचार्जमध्ये दोन इलेक्ट्रिक मोटर्स आणि AWD सिस्टमसह 78kWh बॅटरी मिळते. या SUV ची एकूण पॉवर 408hp आणि 660Nm टॉर्क आहे. ज्यामुळे XC40 रिचार्ज फक्त 4.9 सेकंदात 0-100 किमी/ताशी वेग वाढवू शकतो. दुसरीकडे, Kia EV6 ची एकच मोटर व्हर्जन आहे, जी 340hp आणि 430Nm टॉर्क जनरेट करते तर दुहेरी मोटर व्हर्जन 325hp आणि 605Nm निर्माण करते. ते 5.2 सेकंदात 0-100 किमी/ताशी वेग वाढवते.
रेंज हे इलेक्ट्रिक वाहनाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. आणि येथे व्होल्वोचा दावा आहे की, XC40 रिचार्जची रेंज प्रति चार्ज 418km आहे आणि EV6 528km ची रेंज ऑफर करते. दोन्ही कारमध्ये प्रीमियम ऑडिओ सिस्टम, ADAS वैशिष्ट्ये, कनेक्टेड कार टेक आणि अनेक प्रगत वैशिष्ट्ये आहेत.
किंमत किती?
Volvo XC40 Recharge ची किंमत सुमारे 55.90 लाख रूपये आहे. तर, Kia EV6 ची किंमत 59.95 लाख रूपये आहे. GT लाईन AWD साठी पाहिल्यास ही किंमत 64.09 लाखांपर्यंत जाते. Kia EV6 ही एकमेव अशी कार आहे जी Volvo XC40 रिचार्जशी स्पर्धा करू शकते.
महत्वाच्या बातम्या :
- Volvo XC40 : क्लासिक फिचर्स, दमदार इंजिन आणि 78kWh बॅटरी पॅकसह वाचा 'Volvo XC40 Recharge'चा संपूर्ण रिव्ह्यू
- Grand Vitara : पॉवरफुल इंजिन आणि दमदार फिचर्स देणारी 'Grand Vitara'; वाचा फर्स्ट लूकचा संपूर्ण रिव्ह्यू
- Hero Super Splendor : Hero कंपनीचे लोकप्रिय Super Splendor नवे एडीशन लाँच, किंमत आणि मायलेज जाणून घ्या